Read in
गुरूवार 28 आँक्टोबर 2021 चे दैनिक राशीभविष्य
गुरूवार 28 आँक्टोबर चंद्ररास कर्क दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पुनर्वसु 09:40 पर्यंत व नंतर पुष्य.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज गुरूपुष्यामृतयोग आहे. 09:40 ते 30:40 पर्यंत.
मेष :–आईच्या ओळखी कडून तुमच्या अडलेल्या कामात मार्ग सापडेल. मित्रमैत्रिणींकडून न मागताही अचानकपणे गूढरित्या मदत होईल.
वृषभ :– आज चिमुटभर पैशे खर्च करून ओंजळभर समाधान मिळणार आहे. लेखकांना आपल्या मनातील गूढ विषयांचे लेखनाची सुरूवात लवकरच करता येणार असल्याचा आनंद होईल.
मिथुन :–मित्रमंडळींच्याबरोबर सुटीतील कार्यक्रम ठरून प्रवासाचा बेत पक्का होईल. निवृत मंडळीना आपल्या कर्तृत्ववान कारकिर्दीचा लेखाजोखा मांडता येणार आहे.
कर्क :–फ्रीज, वातानुकूलीत यंत्रांच्या दुरूस्तीवर अचानक खर्च करावा लागेल. शोधक व संशोधन वृत्तीच्या विद्यार्थ्यांना मनासारख्या कंपनीत काम करायला मिळणार असल्याचे कळेल.
सिंह :– हाताखालील नौकर हातातील काम अर्धवट सोडण्याची धमकी देतील. उत्पादनाच्या लहान युनिटमधील तुमचे लक्ष जराही कमी करू नका, नुकसान संभवते.
कन्या :–आज अतिशय सांभाळून मनाची ताकद एकवटून काम केल्यास नक्कीच काम यशस्वी होणार आहे. अडचणीचा प्रसंग हुषारीने निभावून न्याल.
तूळ :–अती हिशोबी स्वभावामुळे आज अडचणीत याल व प्रसंगी नुकसानही होईल. सरकारी कामासाठी स्वत:चा वेळ द्यावा लागेल इतरांवर विसंबून राहू नका.
वृश्र्चिक :– मित्रमैत्रिणींच्या आग्रहाखातर व्यसनांचा अनुभव घ्याल. आईवडीलांच्या व्यवसायातून आज तुम्हाला प्रतिष्ठा व ओळख मिळेल.
धनु :– आईवडीलांना समाधान देण्याच्या हेतुने तुम्ही स्वत:च्या मताला मुरड घालाल. नोकरदार महिलांना मुलांच्या खर्चिक डिमांडचा व कुरबुरींचा त्रास होईल.
मकर :–तुमच्या चौकसपणाच्या स्वभावामुळे कामातील धोका नजरेसमोर येईल व नुकसान टळेल. वयस्कर मंडळीना आज एकांतात शांतपणे बसावेसे वाटेल.
कुंभ :–तुमच्या काटकसरी स्वभावाची चुणूक मित्रमंडळीना आल्यामुळे तुमची टींगल होईल. तरूणांना आजच्या धावपळीत पाय लचकण्याचा धोका आहे. सावधतेने रहा.
मीन :–उष्णतेच्या विकाराचा त्रास संभवतो. ज्या वयस्कर मंडळीना किडनीचा त्रास आहे त्यांनी विशेष काळजी घ्यावी. इतरांच्या आर्थिक भानगडींपासून दूर रहावे.
||शुभं-भवतु ||