Read in
बुधवार 27 आँक्टोबर 2021 चे दैनिक राशीभविष्य
बुधवार 27 आँक्टोबर चंद्ररास मिथुन 27:04 पर्यंत व नंतर कर्क. चंद्रनक्षत्र आर्द्रा 07:07 पर्यंत व नंतर पुनर्वसु.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05 :30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–मनाशी पक्का निश्चय करून धाडसाने काम कराल. सेवाभावी संस्थेत काम करणार्यांनी नियमांच्या अधिन राहूनच काम करावे. आजचा दिवस आनंदात व उत्साहात जाईल.
वृषभ :–तुमच्या पगारा कडे लक्ष देऊन बसलेल्यांना तुम्हाला वेळीच समज द्यायला पाहिजे. नवीन वास्तुच्या कारणाने घरी पाहुणे येतील.
मिथुन :– आज जो तुम्हाला मार्ग सापडणार आहे तो फक्त तुमच्या तीव्र इच्छाशक्तीमुळे. वयस्कर मंडळींच्या मानसिक शक्तीची प्रचिती येईल त्यांचे आशिर्वाद घ्या.
कर्क :– घरगुती व्यवसायातील आर्थिक वाढ चांगली होईल. भांडवलाची काळजी करू का. आपोआप सोय होणार आहे. तुमच्या हातातील कलेचा समाजाकडून सन्मान होईल.
सिंह :–दवाखान्याची मनातील भीती काढून टाका तरच उपाय सापडेल. मैत्रीच्या नात्यामुळे व्यवहारात फार मोठा आधार मिळेल व मदतही होईल.
कन्या :– परदेशी असलेल्या मुलांकडून गोड बातमी कळेल. तरूणांना वैवाहिक विषयावरील आपल्या मतात, विचारात बदल करावा लागेल तरच पुढील मार्ग सोपा होईल.
तूळ :–प्रथम संततीच्या विवाहाच्या प्रश्र्नांचा मानसिक ताण येईल. मनासारखी खरेदी करता येणार असल्याने महिलांना आज खूप आनंद होणार आहे. प्रेमाच्या नात्यातून समाधान मिळेल.
वृश्र्चिक :– मैत्रिणींच्या एकत्रित व्यवसायात मतभेदांची शक्यता आहे तरी समंजसपणे विचार व चर्चा केल्यास व्यवसायावर परिणाम होणार नाही. शांतपणाने घ्या.
धनु :– तुमच्यावर असलेली जबाबदारी अतिशय चोखपणे पूर्ण कराल. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या बदलत्या विचारांमुळे तुमचा गोंधळ उडणार आहे.
मकर :– आवडत्या व्यक्तीची भेट होऊन मन मोकळे केल्याचे समाधान मिळेल. मुलांच्या आवडी निवडी तुम्हाला पटणार नाहीत व वाद निर्माण होतील. रागावर संयम पाळा.
कुंभ :–कुटुंबातील महत्वाच्या विषयावर एकवाक्यता न झाल्याने कोणताच मार्ग निघणार नाही. तरूणांना पिढीजात व्यवसाय सोडून नवीनच काम करण्याची इच्छा निर्माण होईल.
मीन :–नोकरीत इतरांच्या मताला हो म्हणताना विचार करावा लागेल. आज तुमच्या सद्सद्विवेकबुद्धीला कोणताच विचार पटणार नाही. ज्येष्ठांचा सल्ला घ्या.
||शुभं-भवतु ||