Read in
मंगळवार 26 आँक्टोबर 2021 चे दैनिक राशीभविष्य
मंगळवार 26 आँक्टोबर चंद्ररास मिथुन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र आर्द्रा अहोरात्र.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–फोटोग्राफी व चित्रकलेची आवड असलेल्यांनी आपला अभ्यासाचा उपयोग अर्थार्जनासाठी करायला हरकत नाही. गायक व किर्तनकार यांना चांगली संधी मिळणार आहे.
वृषभ :–अचानक गळा व घसा, घशाच्या आतील बाजूचा त्रास सुरू होऊन गिळता येणार नाही. हाँटेलमधील कर्मचार्यांनी नवीन नोकरीच्या लोभापायी चालू नोकरी सोडू नये.
मिथुन. :–आज नोकरीच्या ठिकाणी हातातील प्रत्येक काम शांततेने करा. इतरांवर तुमचे मत लादू नका. नवीन ओळीच्या व्यक्तीला तुमची कोणतीही माहिती देऊ नका.
कर्क :–आज तुम्हाला तुमच्या हातातील कामाच्या मदतीसाठी इतरांकडे मदत मागावी लागणार आहे. मिटींगमध्ये आज तुम्हाला नेहेमीपेक्षा जास्त महत्व दिले जाणार आहे.
सिंह :–प्रवासी खात्यात काम करणार्यांना अचानक मोठे काम मिळेल.तरूणांना ऐहिक सुखाची व उपभोगाची तीव्र इच्छा वाढेल. घरामधील वाद घरातच मिटवायचा प्रयत्न करा.
कन्या :– प्रकृतीची काळजी घ्या. सर्दी, कफ याचा त्रास झाल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता उपाय करा. कोणत्याही व्यक्तीवर आरोप करण्यापूर्वी दहा वेळा विचार करा.
तूळ :–दुपारनंतरचा कालावधी स्वत:च्या कामासाठी राखून ठेवावा लागेल. सामाजिक प्रश्र्नात आज फार अडकू नका. कुटुंबातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कराल.
वृश्र्चिक :–नात्यातील मंडळींकडून तुमच्या वर टीका होतील. त्वचाविकार असलेल्यांना अचानक विकार वाढल्याचे कळेल. मानसिक शांतीसाठी मेडीटेशनचा चांगला उपयोग होईल.
धनु :–आज दिवसभर तुम्हाला उत्साहाचे भरते येईल. हातातील रेंगाळलेल्या कामांवर लक्ष दिल्यास कामे मार्गी लावता येतील. कोणतीही घाई करू नका. शांततेने घ्यावे लागेल.
मकर :–सर्दी सदृश्य त्रासाला किरकोळ न समजता वेळीच उपचार करा. भावनेच्या भरात आपले विचार चुकीच्या पद्धतीने व्यक्त केले जातील तरी आधीच मनावर संयम ठेवा.
कुंभ :–व्यवसायातील तुमच्या वाढलेल्या व्यापामुळे आज तुम्हाला काय करावे हे ठरवता येणार नाही. सर्वानीच आज प्रत्यक्ष काम करण्यापेक्षा फक्त नियोजन करावे.
मीन :–व्यवसायातील अडचणींवर सापडलेला उपाय लागू न केल्याने आपण अडचणीत आल्याचे जाणवेल. आज उधार उसनवार कोणतेच व्यवहार करू नका.
||शुभं-भवतु ||