Read in
सोमवार 25 आँक्टोबर 2021 चे दैनिक राशीभविष्य
सोमवार 25 आँक्टोबर चंद्ररास वृषभ 14:35 पर्यंत व नंतर मिथुन. चंद्रनक्षत्र मृगशीर्ष 28:09 पर्यंत व नंतर आर्द्रा.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
वरील दोन्ही राशीचा व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–महिलांच्या सौंदर्याोविषयीच्या वस्तू व मोत्याच्या दागदागिन्याच्या विक्रीला चांगला भाव येईल. फोटोग्राफर्सच्या वैशिष्ट्यपूर्ण फोटोजना चांगली मागणी येईल.
वृषभ :–आईस्क्रिम, सरबते, फळांचे रस यांच्या लहानशा उद्योगालाही मोठी मागणी मिळेल. विद्यार्थी डेकोरेशन साहित्याचा उपयोगाने सुंदर निर्मिती करतील.
मिथुन. :–आज तुमच्याकडून कृतीपेक्षा बोलण्यावर जास्त भर राहणार आहे. लेखकांना नवीन गूढ विषयावर पुस्तक लेखन सुरू करता येणार आहे.
कर्क:–भावनेच्या आहारी जाऊन कोणताही व्यवहार करू नका नुकसान संभवते व अडचणीत ही याल. महिलांनी मिठाईच्या पदार्थांचा घरगुती उद्योग करण्याचा विचार करावा.
सिंह :–वैद्यकीय सेवेसाठी प्रवास करावा लागणार आहे. संस्था, क्लब अशा ठिकाणी तुम्हाला आरोग्याबाबत ओरिएंटेशन द्यावे लागणार आहे.
कन्या :–सिक्युरिटी आँफिसर्स, सुरक्षा रक्षक यांना दैनंदिन कामकाजात अडचणीं सोसाव्या लागतील. तरूण मार्केटींगच्या मुलांच्या बोलण्याची चांगली छाप पडेल.
तूळ :–धान्ये कडधान्याबाबत कांही प्रमाणात नुकसान होणार आहे. कंबरदुखीचा त्रास असलेल्या महिलांना अचानक त्रास होऊ लागेल. तुमच्या चिकीत्सक वृत्तीत आज वाढ होणार आहे.
वृश्र्चिक :–नोकरीत इतरांच्या चुका शोधण्यापेक्षा, त्याच्यावर टीका करण्यापेक्षा वस्तुस्थितीला धरून चर्चेची तयारी ठेवा. चित्रकार व कलाकारांचे आज कौतुक होईल.
धनु :– मनातील चळवळी वृत्तीत वाढ होईल. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे आपण आजारी असल्याची भावना राहील. महिलांना युरीन इन्फेक्शनचा त्रास संभवतो.
मकर :–चैनीच्या वस्तूंची खरेदी कराल.खर्चाचा विचार न केल्याने अचानक मोठा खर्च होईल. कायदेशास्त्र शिकवणार्याना एखाद्या सेशन मधे बोलावे लागणार आहे.
कुंभ :–जबरदस्त इच्छाशक्तीमुळे अवघड कामात प्रगती होत असल्याचे दिसेल. नोकरीत वरीष्ठ खूष होणार आहेत. अधिकारी वर्ग नियम सोडून स्वतंत्र विचाराने वागतील.
मीन :–किडनीचा विकार असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी. महिलांना मासिक पाळीचा , मोनोपाँजचा त्रास होईल. आज कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका.
||शुभं-भवतु ||