Read in
रविवार 24 आँक्टोबर 2021 ते शनिवार 30 आँक्टोबर 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य
रविवार 24 आँक्टोबर चंद्ररास वृषभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र रोहिणी 25:00.सोमवार 25 चंद्ररास वृषभ 14:35 पर्यंत व नंतर मिथुन.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे
चंद्रनक्षत्र मृगशीर्ष 28:09 पर्यंत व नंतर आर्द्रा. मंगळवार 26 चंद्ररास मिथुन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र आर्द्रा अहोरात्र. बुधवार 27 चंद्ररास मिथुन 27:04 पर्यंत व नंतर कर्क. चंद्रनक्षत्र आर्द्रा 07:07 पर्यंत व नंतर पुनर्वसु. गुरूवार 28 चंद्ररास कर्क दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पुनर्वसु 09:40 पर्यंत व नंतर पुष्य. शुक्रवार 29 चंद्ररास कर्क दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पुष्य 11:37 पर्यंत व नंतर आश्लेषा. शनिवार चंद्ररास कर्क 12:50 पर्यंत व नंतर सिंह. चंद्रनक्षत्र आश्लेषा 12:50 पर्यंत व नंतर मघा.
सोमवार 24 संकष्ट चतुर्थी चंद्रोदय20:45.
गुरूवार 28 गुरूपुष्यामृतयोग 09:40 ते 30:40 पर्यंत.
मेष :–या सप्ताहात तुम्हाला तुमचे विचार इतरांपर्यंत पोहोचवता येणार आहेत त्यासाठी वेबिनार, आँन लाईन ची मदत घ्या. वरीष्ठ मंडळींच्या आशिर्वादाने कुटुंबातील लहानग्यांसाठी मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. गृह निर्माण मंडळावरील नियुक्त केलेल्याना कामातील गुंतागुंत सोडवता येणार आहे. नाट्यकलाकारांना नवीन संधी मिळण्याचे संकेत मिळतील. गुरूतुल्य व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळण्यासाठी प्रयत्न केल्यास त्यात चांगले यश येईल.
वृषभ :–प्रेमाच्या व्यवहारातील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्यास नाते संबंध पुन: जोडले जातील. आईवडीलांच्या मदतीने विवाहाबाबतचा रेंगाळलेला प्रश्र्न मार्गी लावण्यात यशस्वी व्हाल. डिझायनिंग, अँनिमेशन च्या व्यावसायिकांनी आपल्या मनातील योजनाना संधी दिल्यास मोठे एक्स्पोजर मिळेल. महिलांना त्यांच्या आवडत्या विषयात बाजी मारता येणार आहे. घरातील, बागेतील फुलझाडांच्या तुम्ही राखत असलेल्या निगेबाबत इतरांकडून कौतुक होईल.
मिथुन :–तुमच्या स्वकष्टार्जित धनाचा वापर धार्मिक कार्यासाठी करण्याचा आईवडीलांकडून आदेश मिळेल. बुद्धीच्या क्षेत्रातील, संशोधन क्षेत्रातील मंडळीना नवीन संधी मिळण्याचा योग आहे. या सप्ताहात तुम्ही तुमच्या सहनशील स्वभावामुळे इतरांकडून दुखावले जाणार आहात. पत्नीकडील मंडळींच्या न्यायालयातील कामकाजासाठी वकीलांच्या नेमणूकीची जबाबदारी घ्यावी लागेल. शालेय विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्याची जबाबदारी स्विकाराल.
कर्क :– आईवडीलां पासून व भावापासून विभक्त झालेल्यांना परत कुटुंबात सामावून घेण्यात येणार असल्यामुळे कुटुंबात आनंद निर्माण होईल. घरगुती व्यवसायात कांही प्रमाणात झालेले नुकसान भरून निघत असल्याचे लक्षांत येईल. घरगुती खाण्याच्या पदार्थांच्या व्यवसायात एकदम लाभ होऊ लागेल. तरूणांच्या विवाहाचे प्रस्ताव आता पुढे सरकायला लागतील. विजेवर चालणार्या खेळण्याना मोठी मागणी मिळेल. वस्तू घरपोच देणार्यांना नवीन कस्टमर्स मिळणार आहेत.
सिंह :–नोकरी न मिळत असलेल्यांनी सणासुदीसाठी लागणार्या वस्तूंचा व्यवसाय करावा उत्तम चालणार आहे. भांडवलाची चिंता करू नका आपोआप सर्व मिळत जाईल. बर्याच दिवसापासून असलेल्या आजारातून मुक्तता होणार असल्याचे डाँक्टरांकडून कळेल. लहान मुलांना अचानक कान दुखण्याचा त्रास होणार आहे तरी त्यांचे रडणे ओळखून घ्या. वडीलांकडून जर शेअर्समधे गुंतवणूक होत असेल तर या सप्ताहात अजिबात करू नका असे त्यांना सांगा नुकसान होईल.
कन्या :–मानसोपचार तज्ञांना तसेत मनोविकार तज्ञांना अत्यंत अवघड केसमधील गुंतागुंत सोडावी लागेल. सामाजिक पातळीवर तुमचा गौरव होणार आहे. वडीलबहिणीकडून घेतलेल्या प्रेरणेमुळे या सप्ताहाचा उपयोग तुम्ही तुमच्या कलेसाठी करणार आहात. कलाकार मंडळीना आपली कला फेसबुक, युटुबच्या माध्यमातून सादर करण्याची संधी मिळणार आहे. डोक्यावर असलेल्या कर्जाबाबत अचानक मनामध्ये भीती निर्माण होईल.
तूळ :–सार्वजनिक मंडळ किंवा हाऊसिंग सोसायटीमधील सदस्यांना सल्लागार या पदावर नियुक्त केले जाणार आहे. नोकरीतील प्रमोशनच्या विषयाबाबत तुम्ही सध्या अवाक्षरही काढू नका. सरकारी कामासाठी किंवा न्यायालयातील कामासाठी ओळख लावण्याचा प्रयत्न करू नका. कामात बिघाड निर्माण होईल. वैयक्तिक मानसन्मानास अती महत्व दिल्यास प्रतिस्पर्धी मुद्धमहून अपमानास्पद वागणूक देतील.
वृश्र्चिक :–व्यवसायातील तुमचे यश हे तुमच्या भगिदारामुळे असल्याची जाणिव होईल. या सप्ताहात भागिदाराच्या विश्वासाचा व मदतीचा उत्तम अनुभव येईल. राजकीय क्षेत्रातील मंडळीनी प्रतिस्पर्ध्याच्या विरोधात चालवलेले धोरण त्यानाच अडचणीत आणणार आहे. उच्चशिक्षण घेऊ इच्छिणार्याना संधी उपलब्ध झाल्याचे कळवले जाईल किंवा लवकरच उपलब्ध होईल. संततीकडून मिळणार्या आदराने व प्रेमाने भारावून जाल.
धनु :–विवाहाची बोलणी पुढे सरकणे अवघड जाणार आहे तरी आईवडीलांच्या सल्ल्याशिवाय तुम्ही स्वत: निर्णय घेऊ नये. विद्यार्थ्यांनी आपल्या नियोजित रूटीन परिक्षांना महत्व देऊन अभ्यास केल्यासच यश मिळेल. स्पर्धा परिक्षा साठीच्या मेहनतीत खंड पडू देऊ नका. जूनाट घराच्या डाव्या बाजूकडील भिंत किंवा जिना अचानक पडण्याचा धोका आहे. तरी काळजी घ्यावी.
मकर :–प्रेमप्रकरणात समझ गैरसमजांचा गोंधळ वाढणार आहे. ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवून कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका. घरातील नात्यात प्रेमाचे वातावरण राहणार आहे. त्यांत कोणताही संशय आणू नये. कुटुंबातील खरेदीच्या विषयात, तरूणांच्या व्यवहारात वयस्कर मंडळीनी हस्तक्षेप करू नये. इलेक्ट्रीक उपकरणांत अचानक बिघाड निर्माण होईल. गुंतवणूकी करीता मागिल महिन्यातील आर्थिक नुकसानीसारखाच हा पण सप्ताह असणार आहे.
कुंभ :–बँकेचे व्यवहार एकदा तपासून पहावेत. हा सप्ताह तुमचे आर्थिक नुकसान करणारा आहे. तरी हातउसने दिलेले पैसेपण परत मिळण्याची अपेक्षा करू नका. वयस्कर मंडळींच्या प्रकृतीची कांहीतरी तक्रार निर्माण होईल. विद्यार्थ्यांनी आपले विचार लिखित स्वरूपात इतरांकरीता जाहीर करावेत त्यासाठी फेसबुक, यु ट्युब यांची मदत घ्यावी. विवाह सल्लागारांना त्यांच्या कामाचे श्रेय झाल्याचे जाणवेल.
मीन :–तरूणांनी, शिकाऊ मुलांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ देऊ नये. मित्रमंडळींबरोबर चर्चा करून सल्ला घेण्यापेक्षा ज्येष्ठांचा, शिक्षण तज्ञांचा सल्ला घ्यावा. नोकरदार वर्गाला त्यांची बदली होणार असल्याचे कानावर येईल. आईकडील नातेवाईकांच्या चर्चेत माहित नसलेल्या बाबींवर हो ला हो करू नका. वडीलांच्या सल्ल्यानेच व्यवहारातील खाचाखोचा समजून घ्याल.महिलांच्या मनावरील दडपण वाढणार आहे तरी संयम राखावा.
||शुभं-भवतु ||