daily horoscope

शनिवार 23 आँक्टोबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

शनिवार 23 आँक्टोबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

शनिवार 23 आँक्टोबर चंद्ररास वृषभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र कृतिका 21:52 पर्यंत व नंतर रोहिणी.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश

वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :–कुटुंबात नवीन सुनबाई येण्याचे संकेत  मिळतील. संततीसाठी केलेल्या आर्थिक गुंतवणुकीवर  चांगला परतावा मिळणार आहे. तरूणांना मनावर संयम घालावा लागेल.

वृषभ :–आज तुम्ही स्वत:ला आवडणार्‍या गोष्टी कराल.  आईवडीलांसाठी त्यांच्या आवडीच्या वस्तु आणण्याचे ठरवूनही आज आणता न आल्यामुळे मनाला वाईट वाटेल. 

मिथुन :– मैत्रिणींबरोबरचे हितगुज चांगलेच जमणार आहे त्यामुळे मनाला हलकेपणा वाटेल. भावंडांबरोबरचा संवाद  मनासारखा  झाल्यामुळे आईवडीलांना आनंद होईल.

कर्क :–नव्याने हातात घेतलेल्या कामात चांगली प्रगती होत असल्याचे जाणवेल. महत्वाच्या कोणत्याही कागदपत्रांवर सही करताना पूर्ण वाचूनच करा.बँकेचे व्यवहार स्वत: करावेत. 

सिंह :– तुम्ही ज्या गोष्टीच्या प्रतिक्षेत आहात ती गोष्ट लवकरच मिळणार असल्याचे संकेत मिळतील.  वयस्कर मंडळीनी आज जास्त दगदग करू नये.आराम करावा. ोो

कन्या :–आज तुम्हाला नोकरीतील प्रश्र्नांना  प्राधान्य द्यावे लागेल. कोर्टाच्या कामावरील जबाबदारीतून मुक्त होण्याची  संधी मिळेल. मनावरील दडपण दूर होईल. 

तूळ :–महिलांना उजव्या डोळ्याला दुखापत होण्याचा धोका आहे. घर सुशोभित करण्याच्या विचारात सर्वांकडून एकवाक्यता होणार नाही. ज्येष्ठांकडून नाराजी ओढवून घ्याल. 

वृश्र्चिक :–नोकरीत महत्वाच्या कामात स्वयंस्फूर्तीने सहभाग घ्यावा लागेल. महिलांना ठरवूनही  नियोजित कामाकडे लक्ष देणे जमणार नाही. नियोजन बिघडणार आहे. 

धनु :– हातातील कोणतेच काम पूर्णत्वाला जाण्यापूर्वी अर्धवट अवस्थेत सोडाल.कुटुंबातील भावंडांच्या  व इतर आप्तेष्टांच्या  आगमनामुळे  सर्वांना आनंद होईल. 

मकर :– व्यावसायिकांनी  महत्वाच्या गोष्टीचा अंदाज आल्याशिवाय नियोजन करू नये. अचानक अनावश्यक खरेदीवर पैसे खर्च कराल. लहान मुलांच्या हाताला इजा होण्याचा धोका आहे. 

कुंभ :–नातेवाईकांच्या आजारपणासाठी मदत करावी लागेल व प्रसंगी भेटही घ्यावी लागेल. किडनीचा त्रास असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी. दुर्लक्ष करू नये. े

मीन :–नोकरीच्या ठिकाणी हाताखालील कर्मचार्‍यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाईल. आज वेळेचे बंधन न पाळल्याने नुकसान संभवते. 

||शुभं-भवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *