daily horoscope

शुक्रवार 22 आँक्टोबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

शुक्रवार 22 आँक्टोबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

शुक्रवार 22 आँक्टोबर चंद्ररास मेष 25 37 पर्यंत व नंतर वृषभ. चंद्रनक्षत्र भरणी 18:54 पर्यंत व नंतर कृतिका.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश

वरील दोन्ही राशी व नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :–नेहमीच स्वत:चेच मत बरोबर असते हा गैरसमज मनातून काढून टाका. आज याच गैरसमजामुळे तुमचे नुकसान होणार आहे.

वृषभ :–तुमच्या व्यवहारकुशल स्वभावामुळे सर्व नातेवाईकात व मित्रमंडळीतही आदरणीय आहात याची प्रचिती येईल. लहान मुलींना अचानक डोकेदुखीचा त्रास होईल.

मिथुन :–कौटुंबिक खर्चावर नियंत्रणाची गरज आहे हे लक्षांत घ्या. व्यवहारी प्रश्र्न सोडवताना वस्तुस्थितीला जास्त महत्व द्यावे लागेल. आज कष्ट वाढणार आहेत.

कर्क :– परोपकारी स्वभावामुळे या महिन्यातील दान धर्म आज एकाच दिवसात करून टाकाल. कोणावरही अतिविश्र्वास ठेवून अंधपणाने आर्थिक व्यवहार करू नका.

सिंह :–कामाच्या योग्य नियोजनामुळे हातातील कामात चांगले यश मिळू लागेल. घरातील वातावरण आनंदाचे व समाधानाचे राहील. आरोग्याच्या बाबतीत बेफिकीरीने वागू नका.

कन्या :–विवाहाच्या प्रतिक्षेत असलेल्यांना ओळखीतून बरीच स्थळे येऊ लागतील. स्वत:च्या विचारात व मतात बदल केल्यास चांगली संधी हातातून जाणार नाही.

तूळ :–नव्या ओळखीतून महत्वाच्या कामाचा धागादोरा सापडेल. तरूणांना सायेटिकाच्या दुखण्याचा त्रास सोसणार नाही. तरूणांच्या मनातील इच्छा पूर्ण करणारा दिवस आहे.

वृश्र्चिक :–स्पर्धात्मक वृत्तीमुळे लहान थोर सर्वांबरोबर स्पर्धा करण्याची इच्छा निर्माण होईल. महत्वाकांक्षा वाढेल व व प्रयत्नात ही प्रचंड वाढ कराल व जिंकलही.

धनु :–तुमच्या बुद्धीला पटत नसलेल्या बाबींवर चर्चा करून त्याचा गुंता सोडवून घ्या. आई वडीलांबरोबर वैयक्तिक प्रश्र्नांची ही चर्चा करावी असे वाटेल.

मकर :– स्नो, पावडर व सुगंधी द्रव्याच्या घरगुती व्यावसायिकांना चांगला लाभ होणार आहे. कुटुंबात वयस्कर मंडळींच्या मताला महत्व देऊनच आज गोष्टी घडणार आहेत.

कुंभ :–बुद्धीचा वापर न करता अंदाजाने विचार करून घेतलेल्या निर्णयामुळे फसगत होईल. मनावर कोणत्याही प्रकारचे दडपण न घेता कामाला सुरूवात करा.

मीन :–आज तुम्ही खंबीर मनाने परिस्थितीला सामोरे जाल. आईवडीलांची बाजारपेठेतील प्रतिष्ठेमुळे तुम्हाला आज व्यवसायात स्थिर होता येणार आहे. धावपळ करू नका.

 

॥शुभं-भवतु ॥

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *