Read in
गुरूवार 21 आँक्टोबर 2021 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे
गुरूवार 21 आँक्टोबर चंद्ररास मेष दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अश्र्विनी.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
वरील दोन्ही राशी व नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :– बर्याच दिवसापासून तुमच्या मनात अडकलेले काम आज तुम्हाला मार्गी लावता येणार आहे. व्यवसाय उद्योगातील नव्या मार्गाचा अवलंब कराल तर हातात सोनेच सोने राहणार आहे.
वृषभ :–नव्या जुन्याचा मेळ घालताना तुमची त्रेधा तिरपीट होणार आहे. समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तीच्या पुढाकाराने कुटुंबातील रखडलेला विवाहाला किंवा इतरही कार्याला मार्गस्थ करता येईल.
मिथुन :–विवाहापूर्वीच्या बिघडलेल्या गोष्टींवर विचार करूनच योग्य तो निर्णय घ्यावा लागेल. दवाख्न्यान्याशी संबंधीत असलेल्या बाबीत जराही हलगर्जीपणा करू नका.
कर्क :–व्यवसायासाठी काढलेल्या कर्जाबाबत बँकेच्या तगादयाचा विचार करून त्यावर उपाय काढावा लागेल. बहिणीच्या सासरकडील अडचणीसाठी धावून जाल.
सिंह :–कुटुंबातील पूर्वजांच्या कृपेने आज मोठ्या अडचणीच्या प्रसंगात कोणतरी देवासारखे धावून येईल. आईवडीलांची पुण्याई संकटातून बाहेर काढेल पण प्रश्न श्रद्धेचा आहे.
कन्या :–आज सकाळपासूनच तुमच्या वैयक्तिक न होणार्या, रेंगाळलेल्या कामाच्या मागे रहाल. कोणत्याही परिस्थितीत लाच देण्याघेण्याचे प्रकार करू नका.
तूळ :–तुमच्या मनातील प्रबळ इच्छेपुढे इतर कोणाचेही काहीही चालणार नाही. विवाह कार्यालयाच्या जागेबाबत आलेल्या नोटिशीला तातडीने उत्तर द्यावे लागेल.
वृश्र्चिक :–आज तुमच्याकडून तोडीस तोड उत्तर देण्याऐवजी संयमाने प्रश्न हाताळल्यास वाद वाढणार नाहीत. वयस्कर मंडळीनी आपल्या पायाच्या दुखण्यांकडे विशेष लक्ष द्यावे.
धनु :–आज कोणत्याही प्रकारच्या गुप्त गोष्टींसाठी तिसर्या व्यक्तीची मदत घेऊ नका. आईवडीलांच्या आशिर्वादाने तुमचा प्रश्न आपोआप सुटून मानसिक स्वास्थ्य मिळेल.
मकर :–अचानक बदलणारी शिक्षणाची दिशा तुम्हाला फार मोठ्या यशाकडे घेऊन जाणार आहे. नोकरीतील प्रमोशनच्या बाबतीत तुम्हालाच अग्रक्रमाने महत्व दिले जाणार असल्याचे कळेल.
कुंभ :–परदेशी शिक्षणासाठी जाऊ इछ्छिणार्यांना आता आपला मार्ग मोकळा झाल्याचे जाणवेल. शिक्षकांना नवीन संधी मिळणार आहेत तरी त्यांनी मनाची तयारी ठेवावी.
मीन :–तुमच्या पगारातील आकड्यांमुळे जवळ आलेले नातेवाईकांचा मानस आज तुमच्या लक्षात येणार आहे. कुटुंबातील महत्वाच्या कामातील तुमचा सहभाग उल्लेखनीय राहील.
||शुभं-भवतु ||