daily horoscope

बुधवार 20 आँक्टोबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

बुधवार  20  आँक्टोबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे

बुधवार 20 आँक्टोबर चंद्ररास मीन 14:01 पर्यंत व नंतर मेष. चंद्र नक्षत्र रेवती 14 :01 पर्यंत व नंतर अश्र्विनी..

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश

वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

नवान्न पौर्णिमा, कार्तिक स्नानारंभ, आकाश दीपदान. 

मेष :– राजकीय क्षेत्रातील मंडळीना अचानक वेगळ्याच गोष्टींचा सुगावा लागेल. फँक्टरी वर्कर्सना अचानक पगारात वाढ मिळणार असल्याचे कळेल.

 

वृषभ :– शेजारील मंडळींच्या मदतीने एखाद्या गूढ गोष्टींचा उलगडा होईल. शिक्षणातील यशाच्या दृष्टीने तरूणांनी, विद्यार्थ्यांनी आपल्या दिशा नक्की कराव्यात.

 

मिथुन :– वकीली  व्यवसायातील मान्यवरांकडून  समाजाला आछ्चर्य चकीत करणारी घटना घडेल व रातोरात प्रसिद्धी मिळेल. महिलांचा त्यांच्या  चाणाक्षपणामुळे  इतरांवर प्रभाव पडेल.

 

कर्क :–प्रवचन व किर्तनकार  यांना  आपल्या कलेचे सादरीकरण करण्यात धन्यता वाटेल. धार्मिक  व आध्यात्मिक गोष्टींचे महत्व समाजाला समजावून सांगणे सोपे जाणार आहे. 

 

सिंह :–आज अचानक प्रकृतीच्या लहान सहान तक्रारी सुरू होतील व आज म्हणावा तितका उत्साह  राहणार नाही. नोकरीतील अपेक्षित बदलाची बातमी येईल तरीही थांबावे लागणार आहे.

 

कन्या :–अपत्यप्राप्तीच्या प्रतिक्षेतील जोडप्यांनी आता  दत्तक  संततीचा विचार करायला हरकत नाही. आजचा दिवस तुमच्यासाठी  महत्वाच्या निर्णयासाठी  चांगला आहे.

 

तूळ :–घरगुती व्यवसायासाठी काढलेल्या कर्जफेडीबाबतचा विचार जरा वेगळ्या मार्गाने केल्यास त्यातून उपाय सापडेल. महिलांच्या घरगुती उद्धोगाची चांगली वाढ होत असल्याचे जाणवेल.

 

वृश्र्चिक :– डोकेदुखी तसेच मायग्रेनच्या त्रासावर दुर्लक्ष न करता डाँक्टरी उपाय करा. कोणत्याही व्यक्तीवर क्षुल्लक गोष्टीतून लगेच हातघाईवर येऊ नका. मनाला संयम घाला.

 

धनु :–सार्वजनिक ठिकाणी तुमच्या हाताखालील व्यक्तीकडून आक्षेपार्ह कृत्य घडेल. नोकरीतही अनवधानाने समोरील व्यक्तीचा  तुमच्याकडून  अपमान होण्याचे प्रसंग येतील. 

 

मकर :– मुलांनी आपल्या आईवडीलांना  विचारल्याशिवाय महत्वाच्या कार्यातील निर्णय घेऊ नये. तरूणांच्या मनातील गोष्टींचा आज जराही वरीष्ठांना अंदाज येणार नाही.

 

कुंभ :–माहीत नसलेल्या क्षेत्रातील कामातील तुमच्या  हस्तक्षेपामुळे कामात बिघाड निर्माण होईल.  सरकारी कामातील दुर्लक्षित राहिलेल्या कामाकडे आज लक्ष दिल्यास दंड टळेल.

 

मीन :–आरोग्याच्या बाबतीत आज अगदी काटेकोर रहावे लागेल. विरोधकांच्या कोणत्याही कृत्याबाबत  तुम्ही  आज  लगेचच तुमचे विचार व्यक्त केल्यास अडचणीत याल. 

 

||शुभं-भवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *