Read in
मंगळवार 19 आँक्टोबर 2021 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे
मंगळवार 19 आँक्टोबर चंद्ररास मीन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा 12:11 पर्यंत व नंतर रेवती.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज कोजागरी पौर्णिमा व ईद -ए-मिलाद आहे
मेष :–आज तुमचे लक्ष स्वार्थाकडे जराही लागणार नाही तर फक्त तुमच्या हातून आज परमार्थच घडेल. सेवाभावनेने आजारी व्यक्तीची सेवा कराल.
वृषभ :–लोकांच्या हिताचा विचार करून इतरांना मदत कराल. नोकरीमधील स्वत:च्या कामाबरभरच इतरांच्या कामातही सहभागी व्हाल. आईच्या प्रकृतीची काळजी वाढेल.
मिथुन :–अतीचिकीत्सकपणामुळे हातातील संधी गमवणंय्चा संभव आहे तरी विचार करा. व्यसनाच्या बाबतीत कोणाचीही भीड ठेवू नका व तेथून आय काढता घ्या.
कर्क :–आजचे तुमचे बोलणे अतिशय मुद्धेसुद होणार आहे. फँशनेबल कपड्याचा व्यवसायात अचानक मोठी डिमांड येईल. महिलांना आर्थिक पाठबळ मिळणार आहे.
सिंह :–अडगळीच्या खोलीतून किंवा जागेतून महत्वाची वस्तू सापडेल. निवृत्त झालेल्या ज्येष्ठ मंडळींना सेवाभावी कामासाठी विचारले जाईल. मानसिक स्वास्थाचा दिवस आहे.
कन्या :–मनाचा चंचलपणा वाढेल. आज तुमच्या बाबतीत मनाला आनंद देणार्या घटना घडतील. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या मदतीने एखादा मोठा निर्णय घ्याल.
तूळ :– कायदेशीर बाबींवर ज्येष्ठांचे मत घेण्याची गरज आहे. सामाजिक कामातील तुमचा सहभाग व तुम्ही केलेल्या आर्थिक मदतीची इतरांकडून विशेष दखल घेतली जाईल.
वृश्र्चिक :–कामापेक्षा आज पसाराच जास्त कराल. विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासाचे योग्य नियोजन न केल्याचा मनस्ताप होईल. स्वभावातील रागीटपणात आज वाढ होईल.
धनु :– इतरांच्या मदतीवर अवलंबून राहिल्याने काम वेळेत पूर्ण होणार नाही. आजचा दिवस कांही प्रमाणात आनंदाचा व तुमच्या मनासारखे घडवणारा राहील.
मकर :– कामाशिवाय वायफळ बडबड करणार्या लोकांचा आज तुम्हाला त्रास होणार आहे. तुम्ही सांगत असलेल्या सल्ल्याविषयी समोरील व्यक्ती फारसे महत्व देणार नाही.
कुंभ :–नवीन घराबाबतचे निर्णय फार घाईने घेऊ नका. न्यायालयातील कामाविषयीचा तुमचा अंदाज आज खरा ठरेल. बोलण्यातील स्पष्टपणामुळे आज इतरांना तुमचे विचार स्पष्ट कळतील.
मीन :– तुम्ही मनातील विचार उघडपणे न सांगितल्याने मानसिक दडपण येईल. मधुमेही मंडळीनी आज कोणत्याही प्रकारे खाण्यात अतिरेक करू नये.
||शुभं-भवतु ||