daily horoscope

सोमवार 18 आँक्टोबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

सोमवार 18 आँक्टोबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे

सोमवार 18 आँक्टोबर चंद्ररास मीन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा 10 :48 पर्यंत व नंतर उत्तरा भाद्रपदा.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश

वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :–आज अचानक खर्चाची नवनवीन कारणे समोर पुढे उभे राहतील. आजारपणातून बरे झालेल्यांसाठी  फार मोठा सुस्कारा सोडावा लागणार आहे. मानसिक रिलँक्स व्हाल.

 

वृषभ :–मोठ्या भावंडाबरोबर व मित्रपरिवाराबरोबर  एकत्र येऊन गेटटुगेदर होईल. खूप जवळच्या व्यक्ती तुमच्या चांगल्या पाठिराख्या असल्याचे जाणवेल.

 

मिथुन :–अचानक येणारे नोकरीतील बालंट तुम्हाला मानसिक ताण वाढवणारे राहील. राजकारण व राजकीय व्यवहारातील तुमच्यावर येणारी जबाबदारी  विचार न करता स्विकारून नका.

 

कर्क :–मोठ्या प्रमाणातील जाहिरातीला भुलून खर्चाचा बोजा वाढवून घ्याल. वकील, बँरीस्टर , सालिसिटर यांना गुंतागुंतीच्या कामासाठी निवडले जाईल.

 

सिंह :–वयस्कर मंडळीना पाय घसरून पडण्याचा धोका आहे तरी सावध रहा. गर्भवती महिलांनी  फार कष्ट  करू नयेत. एखाद्या महत्वाच्या वस्तूची चोरी होण्याची शक्यता आहे.

 

कन्या :–वैवाहिक जीवनात आनंदाच्या क्षणांची पुनरावृत्ती होईल. ज्यांच्याबरोबर कायदेशीर वाद आहेत  त्यांच्याबरोबर बोलून नवीन हेल्दी  नाते तयार होणार आहे.

 

तूळ :–कामगार वर्गाच्या प्रश्र्नांची  जबाबदारी पेलताना तुम्हाला खूप गुंतागुंतीच्या प्रश्र्नांचा विचार करावा लागेल. बँकेकडून मिळणारे कर्ज लवकरच. मिळणार असल्याचे कळवले जाईल.

 

वृश्र्चिक :–पतीपत्नीच्या व्यावसायिक क्षेत्रातील प्रगतीसाठी नव्याने कांही विचार करावा लागेल. नोकरीतील तुमची काम करण्याची तळमळ वाढेल. 

 

धनु :–शेतकी व्यवसायात असलेल्यांना नवीन फंडे सुचतील. संततीच्या कांही गैरकामामुळे आईवडीलांची अपकिर्ती होईल. विद्यार्थ्यांच्या महत्त्वाकांक्षेला सलाम करावा लागेल. 

 

मकर :–महिलांना माहेरच्या घराची ओढ लागेल व लवकरच भेटण्याचे ठरेल. विद्यार्थ्यांचा बौद्धीक कल वाढल्याचे लक्षात येईल. सरकारी होणारे काम आज होणार नाही तरी नाराज होऊ नका. 

 

कुंभ :– नोकरीसाठी  फार पूर्वी दिलेल्या मुलाखतीतून नव्याने बोलावणे येईल. कुटुंबातील ज्येष्ठांच्या सल्ल्याशिवाय नोकरीचा विषयात निर्णय घेऊ नका. 

 

मीन :–मित्राकडील अकस्मात घडणार्‍या गोष्टीसाठी तुम्हाला कांहीही करता न आल्याने हतबल व्हाल. आईच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. 

 

||शुभं-भवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *