Read in
रविवार 17 आँक्टोबर 2021 ते शनिवार 23 आँक्टोबर 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य
रविवार 17 चंद्ररास कुंभ 28:32 पर्यंत व नंतर मीन. चंद्रनक्षत्र शततारका 09:52 पर्यंत व नंतर पूर्वा भाद्रपदा.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे
सोमवार 18 चंद्ररास मीन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा 10:48 पर्यंत व नंतर उत्तरा भाद्रपदा. मंगळवार 19 चंद्ररास मीन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा 12:11 पर्यंत व नंतर रेवती. बुधवार 20 चंद्ररास मीन 14:01 पर्यंत व नंतर मेष. चंद्र नक्षत्र रेवती 14 :01 पर्यंत व नंतर अश्र्विनी. गुरूवार 21 चंद्ररास मेष दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अश्र्विनी 16 :16 पर्यंत व नंतर भरणी. शुक्रवार 22 चंद्ररास मेष 25:37 पर्यंत व नंतर वृषभ. चंद्रनक्षत्र भरणी 18:54 पर्यंत व नंतर कृतिका. शनिवार 23 चंद्ररास वृषभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र कृतिका 21:52 पर्यंत व नंतर रोहिणी.
रविवार 17 प्रदोष, क्षीरदान.
मंगळवार 19 कोजागरी पौर्णिमा., ईद – ए – मिलाद.
बुधवार 20 नवान्न पौर्णिमा, आकाश दीपदान.
मेष :–नवविवाहितांनी कोणत्याही कौटुंबिक विषयाला मोठे रूप देऊ नये. मित्रमंडळींबरोबर सल्ला मसलत करण्यापेक्षा प्रथम स्वत:च विचार करावा. हातहातात घेतलेल्या प्रोजेक्टमधील कामाची गती अत्यंत समाधानकारक राहील. मुलांचे व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वी झाल्याचे जाणवेल. घराचे सुशोभिकरण करणार्या वस्तूची खरेदी कराल.या सप्ताहात तुम्हाला कार्यक्षमतेपेक्षा जास्त काम करावे लागणार आहे.
वृषभ :–बर्याच दिवसांचे तुमचे व्यवसाय करण्याबाबतचे स्वप्न मित्रमंडळींच्या मदतीने साकार होणार आहे. अभ्यास न करता घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. न्यायालयातील कामकाजातील तुमच्या अती बोलण्यामुळे गुंता वाढेल. तरूणांनी प्रवासात सांभाळून वागल्यास पश्चात्तापाची वेळ येणार नाही. मनातील इच्छांना व विचारांना प्राधान्य द्या. संततीच्या आरोग्याबाबत जागरूक रहावे लागेल.
मिथुन :–ज्यांना प्रमोशन मिळण्यात अडचणी आलेल्या आहेत त्यांनी लगेच नोकरी सोडायचा विचार करू नये. स्वेच्छानिवृत्ती घेण्याने जर आर्थिक फायदा होत असेल तर नक्कीच विचार करा. मांड्यांचे स्नायु दुखणार्यांनी आता जरा व्यायामाची जोड दिल्यास बराच फरक पडेल. पूर्वी कधीतरी चोरिला गेलेल्या वस्तूचा सुगावा लागेल. लहान भावंडाच्या सासुरवाडीकडील मंडळींकडून व्यवसायासाठी विचारले जाईल. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना त्यांच्याप्रामाणिक योगदानाबद्दल सन्मान व प्रसिद्धी मिळेल.
कर्क :–गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक ती पैशाची मदत होणार आहे तसेच शिष्यवृत्तीच्या प्रयत्नात असलेल्यांना शिष्यवृत्ती मिळण्याचे मार्ग मोकळे होतील. सरकारी अधिकार्यांनी कोणत्याही आर्थिक व्वहारात सहभागी होऊ नये. पूर्वी झालेल्या अपघाताची भरपाई मिळणार असल्याचे कळेल. सर्वानीच विषबाधेच्या संकटापासून सावध रहावे. बाहेरील पदार्थ तसेच जूनी पुराणी औषधे डाँक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत. अध्यात्मिक उपासकांना अंत:स्फूर्तीने बर्याच गोष्टींचा उलगडा होईल.
सिंह :–वारसा हक्काने मिळणार्या गोष्टींविषयी फार हेकेखोरपणा करू नका. सर्वांच्या सहविचाराने होणारे व्यवहार तुम्हाला फारसे लाभदायक ठरणार नाही. दिवस भरत आलेल्या गर्भवती महिलांना सिझेरियन ची गरज लागेल. मासिक पाळीचा त्रास नेहेमीपेक्षा जास्त होणार आहे. तरूण मुलांना गुप्त चौकशीच्या कामासाठी बोलवले जाईल. या सप्ताहात उच्चशिक्षणाबाबतची कोणतीच महत्वाची कामे करू नका. धर्मबाह्य वर्तनात कोणिही मदत करू नये
कन्या :–या सप्ताहात तुमच्याकडून वडीलांना आनंद व समाधान देणारे कृत्य घडेल. महाविद्यालयात कार्यरत असलेल्यानी आपल्यावरील जबाबदारी ओळखून वागावे. कुटुंबातील महत्वाच्या कामाची जबाबदारी ज्येष्ठांकडून तुमच्यावर सोपवली जाईल. धर्मादाय संस्थेत काम करणार्याना अतिशय गुंतागुंतीच्या केससाठी अभ्यास करावा लागेल. ज्योतिषशास्त्र, संमोहन शास्त्र याचा अभ्यास करणार्यांना चांगले यश मिळत असल्याचे लक्षांत येईल.
तूळ :–पतीपत्नीमधील वादग्रस्त विषयात इतरांच्या हस्तक्षेपामुळे गुंता वाढेल व पतीपत्नीचा इगो आड येईल. मनापासून केलेल्या कुलदेवतेचा उपासनेमुळे सूचक स्वप्न द्वारे कांही गोष्टींची कल्पना येईल. महाविद्यालयातील प्राध्यापक मंडळीना इतरांना ट्रेनिंग देण्याची जबाबदारी सोपवली जाईल. प्रवासात भेटणारी अनोळखी व्यक्ती खूपच जवळच्या संबंधातील निघेल. प्रसुती जवळ आलेल्या स्रियांची प्रसुती सहज व सुलभपणे होईल. तीक्ष्ण हत्याराने अचानक जखम होईल.
वृश्र्चिक :–दैनंदिन हजेरी लावण्याच्या उद्योगाच्या ठिकाणी अचानक तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाईल. तरी पूर्ण विचार करूनच स्विकारा व कामाला सुरूवात करा. कोणत्याही प्रकारच्या शेअर मार्केटसाठी हा सप्ताह अजिबात चांगला नाही आहे तरी उगाच धाडस करू नये. नाटक कलावंत, नाटककार, कलाकार यांच्याकडून अतिशय महत्वपूर्ण कलाकृतीची निर्मिती होईल. तुमच्याकडून सुरू असलेल्या एकतर्फी प्रेमप्रकरणातून तुम्हाला काहीही साध्य होणार नाही उलट मनस्ताप व बदनामी होईल.
धनु :–प्रथम संततीकडून मानसन्मान मिळवून देणार्या घटना घडतील. कुटुंबात अचानक प्रथम संतती बाबतच्या विवाहाचा प्रश्र्न चर्चेला येईल. मैदानी खेळाची आवड असलेल्यांना लोकांकडून आदर मिळेल व मोठ्या लेवलवर खेळण्याची संधी मिळेल. पाळणाघर, बालसंगोपन केंद्र येथे काम करणार्यांचे सामाजिक स्तरातून खूप कौतुक होईल. बर्याच दिवसापासून रिकामे राहिलेल्या घराला भाडेकरू मिळणार आहे. योग्य ती माहिती तपासूनच व्यवहार करा.
मकर :–वाहन भाड्याने देण्याच्या व्यावसायिकांनी अतिशय जागरूकपणे व्यवहार करावा. अन्यथा तुमच्या मागे कायद्याचा बडगा लागेल. विजेवरील उपकरणांच्या दुरूस्तीच्या कामातून चांगली आर्थिक प्राप्ती होईल व मोठ्या प्रमाणात सुरू करण्याचा विचार कराल. वडीलोपार्जित मालमत्तेबाबत कुटुंबातील कोणाचीही काहीही तक्रार नसल्याचे सर्वांच्या लक्षात येईल. पत्रकार, बातमीदार यांना न पटणार्या आणि न रूचणार्या विषयावर लेखन करावे लागेल.
कुभ :– लहान भावंडाच्या नोकरीतील बदलासाठी तुमचा सल्ला महत्वाचा ठरेल. बोलण्यातील स्पष्टपणामुळे आज नोकरीच्या ठिकाणी जूना झालेला गैरसमज आज दूर होत असल्याचे जाणवेल. महत्वाच्या कागदपत्रांवर सह्या करताना प्रथम त्याविषयीच्या तज्ञांचा सल्ला घ्या. आजपर्यंत न केलेले व कधीच विचारात न घेतलेले धाडस करण्याची इच्छा होईल. परदेशी असलेल्या मुलांना अचानक घराची ओढ वाटू लागेल. पण भावनेच्या आहारी जाऊन नुकसान करून घ्याल.
मीन :–तुमच्या हाताखाली असलेल्या कामगार वर्गाला समजून घेताना व समजावून सांगताना मानसिक ताण येईल. ब्लडप्रेशर असलेल्यांनी औषधांकडे जराही दुर्लक्ष करू नये. अविवाहित तरूणांनी आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहाच्या बाबतीत अतिशय जागरूकपणे विचार करावा. फसगत होण्याचा धोका आहे. नोकरीतील गैरव्यवहाराबाबत न्यायालयातील केससाठी कंपनीच्या बाजूने तुमच्या वर जबाबदारी सोपवली जाईल. नाक, कान, घसा तज्ञ डाँक्टर्सना लोकांचा फार त्रास होईल.
||शुभं-भवतु ||