Read in
शनिवार 16 आँक्टोबर 2021 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे
शनिवार 16 आँक्टोबर चंद्ररास कुंभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र धनिष्ठा 09:21 पर्यंत व नंतर शततारका.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज पाशांकुशा एकादशी आहे.
मेष :–आत्मपरीक्षण केल्यास कोणत्याही निर्णयावर येणे शक्य होईल. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या विचारांवर नियंत्रण ठेवावे व इतरांच्या सल्ल्यानेच कोणताही निर्णय घ्यावा.
वृषभ :–संततीच्या कोणत्याही डिमांडसाठी व्यवहारी दृष्टीकोनातून विचार करा. भावनेच्या आहारी जाऊन कोणताही व्यवहार करू नका. अचानक नोकरीतील पेंडिंग अमाऊंट लवकरच मिळणार असल्याचे कळेल.
मिथुन. :–आज कुटुंबातील तुमच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतील. राजकीय मंडळींचे विरोधकांवर अंकुश ठेवण्याचे प्रयत्न यशस्वी होणार असल्याचे जाणवेल.
कर्क :–अध्यात्मिक क्षेत्रातील अभ्यासकांना आपल्या अभ्यासातील प्रगतीचा आढावा घेता येणार आहे. आज तुमच्यकडून अतिशय आनंदी वृत्तीने कामे होतील.
सिंह :–सरकारी नियमांचे पालन करण्यासाठी तुमच्या कामात बरेच बदल करावे लागणार आहेत हे लक्षात घ्या. कोणत्याही महत्वाच्या कागदपत्रांवर वाचल्याशिवाय सही करू नका.
कन्या :–तरूणांनी गोड युक्तीने बोलून प्रश्र्न सोडवण्याचा प्रयत्न करावा. व्यावसायिक क्षेत्रातील प्रगतीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल याची प्रचिती येईल.
तूळ :–संततीच्या आरोग्याबाबत काळजीपूर्वक रहावे लागेल. आज शत्रू, विरोधक यांच्या विचारांचा तुमच्यापुढे टिकाव लागणार नाही. लहानांनी मोठ्यांसमोर अदबीने वागावे.
वृश्र्चिक :–आजारी मंडळीनी आपल्या आहारात बदल करावा लागणार आहे हे समझून घ्यावे. गर्भवती महिलांनी अनावश्यक प्रवास किंवा कष्टाची कामे करू नयेत.
धनु :–आज तुमच्या मनाला लागेल अशी घटना घडेल पण त्याला कारणही तुम्हीच असणार आहात. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या विचाराने तु च्या विचारात बदल होणार आहे.
मकर :–वयस्कर मंडळीनी अनावश्यक प्रवास करू नये. अपेक्षित आर्थिक खर्चावर अचानक उपाय सापडेल. मैत्रीच्या संबंधातून मानसिक आनंद मिळेल.
कुंभ :– सांधेदुखीचा किंवा पाय मान दुखण्याचा त्रास अचानक वाढेल. पँनिक न होता आज तुम्हाला आराम करणे गरजेचे आहे हे लक्षांत घ्या. वैचारिक संघर्ष संभवतो.
मीन :–समोरच्या व्यक्तीचे पूर्ण ऐकल्याशिवाय तुम्ही बोलू नका. कुटुंबातील वादग्रस्त विषयाची चिंता करण्यापेक्षा चर्चेने प्रश्र्न सोडवण्याचा प्रयत्न करा.
|| शुभं-भवतु ||