daily horoscope

शुक्रवार 15 आँक्टोबर 2021 विजयादशमी.

Read in

 

 

 

 

 

 

 

 

शुक्रवार  15 आँक्टोबर 2021 विजयादशमी.

शुक्रवार चंद्ररास मकर 21 : 15 पर्यंत व नंतर कुंभ. चंद्रनक्षत्र श्रवण 09:15 पर्यंत व नंतर धनिष्ठा.

आज अश्र्विन शुक्ल दशमी म्हणजेच विजयादशमीला  दिवस होय. गुरूवार 07 आँक्टोबरला सुरू झालेल्या नवरात्रातील बसवलेल्या देवीचे विसर्जन करण्याचा दिवस. याच अश्र्विन शुक्ल दशमीला श्रवण नक्षत्रावर  प्रभू रामचंद्रांनी प्रस्थान केले होते. म्हणूनच याच दिवशी मनुष्याने याच नत्क्षत्रावर आपल्या शहराच्या सीमेचे उल्लंघन करावे. संध्या होऊ लागल्यावर आकाशात कांही नक्षत्रे दिसू लागल्यानंतरचा कालावधी जो आहे त्यालाच  विजयकाल असे म्हंटले आहे. या कालावधीत सुरू केलेले कोणतेही काम असो ते सिद्ध होतेच होते. आजचा विजयकाल हा 14:21 ते 15:07  पर्यंत आहे. दशमीची तिथी पण संध्याकाळी  18:02  पर्यंत आहे. 

 “  विजयादशमीचे महत्व असे आहे की, देशाचे रक्षण करणार्या सैन्यवृद्धीकरीता अनुक्रमाने निराजनविधी  करून शुभकारक अशा खंजन पक्षाचे दर्शन, उदकाजवळ  किंवा गाईच्या गोठ्याजवळ करावे. ” ( इति गौडनिबंध) 

आता आपल्यासारख्या  सामान्य, गृहस्थधर्मीनी काय करावे ते बघुया. काल गुरूवारी सकाळी उत्तराषाढा नक्षत्र संपून  श्रवण नक्षत्र लागले व आजच्या सकाळी 09:15 पर्यंत श्रवण नक्षत्र आहे. तसेच अश्र्विन शुक्ल नवमीची तिथी ही काल 18:52 पर्यंत होती व त्यानंतर दशमीची तिथी सुरू झाली ती आज  शुक्रवारी 18:02 पर्यंत आहे. व विजयकाल मुहूर्त 14:21 ते 15:07  पर्यंत आहे. 

 देवीचे नवरात्र व त्यातील पूजपाठविधीचे महत्व सर्वानाच माहीत आहे. वाराहीतंत्रात असे म्हंटले आहे की,  

“ कोणतेही संकट प्राप्त झाले असता चिकित्सा करण्यास कठिण रोग असता, जातिभ्रंश ,  कुळाचा उच्छेद, आयुष्य आश शत्रुवृद्धी, धननाश, त्रिविध ताप ( दिव्य भौम व अंतरिक्ष.) उत्पात  अशाप्रकारच्या संकटातून मुक्त होण्याकरीता शंभर पाठ करावेत. शंभर पाठानी श्रेयोवृद्धी व राज्यवृद्धी होते. 108 पाठांनी मनातील चिंतीत कार्य सिद्ध होते. ”

वाराहीतंत्र

खरोखरच यावर्षी  या कोरोनाच्या महामारीच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी अनेकांनी अशाप्रकारे जपजाप्य   पाठवाचन  केले आहेनवचंडी, शतचंडीचा  विधी केला आहे

आता विजयादशमीच्या विधी बाबतची माहिती घेऊया

आज  “ शमीवृक्षाच्या आपट्याच्या  पूजनाला  अतिशय महत्व आहे.भक्तांना अभय देणार्‍या अशा शमीयुक्त भगवंताचे पूजन करून नंतर शमीवृक्षाचे सुद्धा पूजन करावे. ” 

या वृक्षाच्या मुळाशी अपराजिता देवीची पुजा करावयाची असते. हे पण एक आदिशक्तीचेच रूप आहे. अपराजिता म्हणजे कधीही कोठेही पराजय होऊ नये म्हणून मुख्य देवीच्या बाजूला ज्या  विजया या दोन देवतांची स्थापना करून त्यांची पुजा केली जाते. पुरूषांनी ईशान्य दिशेस जाऊन अपराजिता देवीचे पूजन करावे. या पूजनामुळे  देवी सतत विजयच देते. अपराजिता देवीचे स्थान हे शमीच्या मुळाशी आहे म्हणूनच तेथील ओली माती घरी आणून त्याची पूजा करावयाची आहे

या अपराजिता देवीपुजनाचा अर्थ असा आहे की

हे देवी मी माझ्या मार्गात कितीही संकटे आली तरी मी पुन: पुन: नव्या दमाने प्रयत्न करेन. विजयाची, यशाची नवनवीन क्षेत्रे पादाक्रांत करेन. उत्कर्षासाठी मी सतत उद्धोगात राहीन त्यामुळे पराजय पाहण्याची वेळ माझ्यावर कधीच आणू नकोस. म्हणून हे अपराजिता देवी तू  नेहमीच यशस्वी कर. ”

आजच्या काळात आपण शमीवृक्षापर्यंत पोहोचू शकत नसल्याने घरीच शमीची आपट्याच्या पानांची  पूजा करावीजेथे शक्य असेल त्यांनी शमीवृक्षाच्या पूजनानंतर त्याच्या  मुळाजवळील  ओली माती अक्षतासहित घेऊन गीत वाद्ध्ये वाजवीत आपल्या घरी आणावी. नवीन कपडे परिधान करून आप्तजनांसह  आनंद साजरा करावा

(भार्गवार्चनदीपिका

शमीच्या पूजनाचा मंत्र :–

                                    “ अमंगलानां शमनीं शमनीं दुष्कृतस्य ||

                                    दु: स्वप्ननाशिनीं  धन्यां प्रपद्धेs हं  शमीं शुभा ||”

( हेमाद्रींत गोपथ ब्राह्मण.) 

दशमीचंया दिवशीच म्हणजे आजच देवीमातेचे विसर्जन करावे. सकाळी यथाविधी पूजन करून  गायन, वाद्ध्ये यांच्या  शब्दांनी देवीचे विसर्जन करावे

प्रार्थना :– 

               “ रूपं देही  यशो देहि भगं भगवति देहि मे ||

                पुत्रान  देहि  धनं देहि सर्वकामाच्छ देहि मे ||

                 महिषघ्नी महामाये चामुंडे मुंडमालिनी||

                 आयुरारोग्यमैश्र्वर्यं देहि देवि नमोस्तुते ||”

   (  दुर्गाभक्तितरंगिणी देवीपुराण  ) 

 

अशी देवीची प्रार्थना करून नंतर उत्थापन करावे

उत्थापनाचा मंत्र :–

              “ उत्तिष्ठ देवि चंडेशि शुभां पूजां प्रगृह्य   ||

                कुरूष्व मम कल्याणमष्टाभि: शक्तिभि: सह ||

                 गच्छ गच्छ परं स्थानं स्वस्थानं देवि चंडिके ||

                 व्रज स्रोतोजलं वृद्ध्यै स्थीयतां जले त्विह ||”

   (  दुर्गाभक्तितरंगिणी देवीपुराण

अशा प्रकारे उत्थापन करून जलाजवळ नेऊन पुढील मंत्र म्हणून उदकांत वाहवावी

              “  दुर्गेदेवी जग्नमात: स्वस्थानं गच्छ पूजिते ||

                  संवत्सरे व्यतीते तु पुनरागमनाय वै. ||

                   इमां पूजां म्या देवि यथाशक्त्योपपादितां ||

 

                   रक्षार्थ त्वं समादाय व्रज स्वस्थानमुत्तमं ||  ”

   ( दुर्गाभक्तितरंगिणी देवीपुराण

 ||  शुभं-भवतु ||

**********************************************************

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *