daily horoscope

गुरूवार 14 आँक्टोबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

 गुरूवार 14 आँक्टोबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे

गुरूवार 14 आँक्टोबर चंद्ररास मकर दिवसरात्र व चंद्र नक्षत्र उत्तरा षाढा 09:34 पर्यंत व नंतर श्रवण.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश

वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे. 

महानवमी,  नवरात्रोत्थापन व देवीला बलिदान देण्याचा दिवस आहे.

मेष :– तुमच्याबरोबर स्पर्धेत असलेले अचानक मागे पडतील व तुम्ही मात्र यशाच्या मार्गावर रहाल. हितचिंतकांच्या सल्ल्याचा विचार करूनच निर्णय घ्या.

वृषभ :– उत्तम व्यक्तिमत्वासाठी केलेल्या उपायांना मूर्त स्वरूप आल्याचे जाणवेल. आवड व आत्मविश्वासाच्या बळावर स्पर्धा जिंकला. 

मिथुन. :–दुसर्यांतील उणीवांकडे आज प्रकर्षाने लक्ष जाईल पण त्याला महत्व न देता  सामंजस्य राखायचा प्रयत्न करा. प्रकृतीतील सुधारणेमुळे मानसिक समाधान मिळेल.

कर्क :– नोकरीच्या ठिकाणी अचानक जून्या  मित्रांची भेट होईल व  आंतरिक उर्जा वाढेल. शेजारच्यांकडून तुमच्या विषयीची समाधान देणारी बातमी कळेल.

सिंह :–कर्तव्य पार पाडताना तुम्हालाच लुटून नेल्याचे जाणवेल. महत्वाच्या व्यवहारासाठी  तज्ञांचा सल्ला घ्या अन्यथा नुकसान संभवते. 

 कन्या  :–आज तुमच्या प्रत्येक कृतीत हिशेबीपणा ठेवावा लागेल. असंबद्ध वागण्या बोलण्यातून अचानक गैरसमज वाढतील. वागण्यात स्पष्टपणा ठेवा.

तूळ :–मनातील विचारांच्या गोंधळाला वाट करून द्या. ब्लडप्रेशरचा त्रास संभवतो तरी काळजी घ्या. शैक्षणिक संस्थेमधील कर्मचार्‍यांनी स्वत:चा हेका चालवू नये.

वृश्र्चिक :– प्रतिस्पर्ध्यांबरोबर सुद्धा मनाचा मोठेपणा दाखवा.. व्यवसायातील त्रुटी भरून न काढता त्याबाबत शिरजोरी करू नका. अडचणीत याल.

धनु :– कौटुंबिक प्रश्नावरील चर्चा तुमच्या पुढाकारामुळे यशस्वी होईल.  विद्यार्थ्यांनी त्यांना  मिळालेल्या  अपयशाकडे सकारात्मकतेने विचार करावा. 

मकर :–प्रकृतीस्वास्थ्यासाठी साधा व  सकस आहार घेण्याकडे मानसिक कल ठेवा. तुमच्याकडील नकारात्मक विचारांचा पगडा, प्रभाव इतरांवर पाडू नका. 

कुंभ :–न्यायालयातील  कामातील घडामोडींवर तुम्हाला लक्ष ठेवावे लागेल. तरूणांच्या चैनी वृत्तीत व चंगळवादाच्या स्वभावात चांगलीच वाढ होईल. 

मीन :– संततीच्या प्रश्नांना प्राधान्यक्रम दिल्यास पुढील सर्वच प्रश्न सहजतेने सुटतील. ज्येष्ठ पुरूष मंडळीना मानसिक आनंदाचा व समाधानाचा दिवस आहे. 

||शुभं-भवतु ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *