daily horoscope

बुधवार 13 आँक्टोबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

बुधवार 13 आँक्टोबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे

बुधवार 13 आँक्टोबर चंद्ररास धनु 16:05  पर्यंत व नंतर मकर चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा 10:18 पर्यंत व नंतर उत्तरा षाढा.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश

वरील दोन्ही राशी व नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

आज दुर्गाष्टमी, एकरात्रोत्सवारंभ, महाष्टमी उपवास, सरस्वती बलिदान.

मेष :– ही दुर्गाष्टमी तुम्हाला तुमच्या भाग्योदयाकडे घेऊन जाणारी आहे. व्यवसायात उद्योगातील कोणत्याही कामात हात घालण्यास आजचा दिवस तुम च्यासाठी लाभदायक आहे.

वृषभ :–महत्वाच्या कामासाठी तुम्हाला ठरलेल्या रकमेपेक्षा जास्त खर्च करावा लागेल. कोणतेही धाडस करू नका. कौटुंबिक वातावरण क्षुल्लक कारणांमुळे बिघडण्याचा धोका आहे. 

मिथुन :–हातात आलेल्या संधीचे सोने कराल पण आत्मविश्वासात कोठेही कमी पडू नका. मानापमानाच्या कल्पनाना फार महत्व देऊ  दिल्यास अडचणीत याल

कर्क :–अचानक रागाचा पारा चढेल  त्यामुळे  इतरांकडून अचानक दुर्लक्षित व्हायची वेळ येईल. व्यावहारिक प्रश्न सोडवताना भावनेच्या आहारी अडकू नका

सिंह :–नुकत्याच झालेल्या ओळखींवर  अती विश्वास टाकून आर्थिक व्यवहार करू नका. हाथ उसने दिलेले पैसे परत मिळू लागतील. पूर्वनियोजित कार्यक्रमात अचानक  बदल होईल. 

कन्या :– आईवडीलांसाठीचा प्रवासाचा बेत त्यांना  एकदम  आश्र्चर्यचकीत करेल. आज तुम्हाला तुमच्या वृत्तीत कणखरपणा आणावा लागेल अन्यथा लोक गैरफायदा घेतील. 

तूळ :–बोलताना शब्द जपून वापरा. सरकारी उच्च अधिकारी व राजकीय मंडळी, बरोबर संबंध येईल. शासकीय कागदपत्रांवर मंजूरी आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. 

वृश्र्चिक :– सतत इतरांना कोंडीत पकडण्याच्या  पावित्र्यात  राहिल्याने आज प्रतिस्पर्धी तुमच्या विरोधात जातील. मोठेपणाच्या खोट्या प्रतिष्ठेसाठी खर्च वाढेल. 

धनु :–चाणाक्ष बुद्धीचा वापर करून  ‘ता’  वरून  ‘ताकभात ’ ओळखाल. राजकारणातील मंडळीना अचानक मान खाली घालण्याची वेळ येईल. आज मोठे धाडस नको. 

मकर :– पूर्वीच्या गुंतवणूकीतून आज मोठा लाभ होणार असल्याचे कळेल तुमच्या स्वत:च्या  दाताच्या  तपासणी वेळ द्यावा लागेल. कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका

कुंभ :–नोकरीत खोटे गोड बोलणार्‍यांच्या मनातील ओळखायला शिका तरच तुमचा टिकाव लागेल. तरूणांना आपल्या कार्यक्षेत्रात स्थिर होण्याकरीता चा  मूलमंत्र सापडेल

मीन :–आज तुमच्यासाठी आत्मपरिक्षणाचा दिवस आहे. महिलांनी नातेवाईकांकडून अती अपेक्षा ठेवू नयेतआईवडीलांना मानसिक आनंद देणार्‍या घटना तुमच्या कडून घडतील

|| शुभं-भवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *