daily horoscope

मंगळवार 12 आँक्टोबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

 मंगळवार   12 आँक्टोबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे

मंगळवार 12 आँक्टोबर चंद्ररास धनु दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मूळ 11:25 पर्यंत व नंतर पूर्वाषाढा.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश

वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत.

सरस्वती पूजन त्रिरात्रोत्सवास सुरूवात होत आहे. महलक्ष्मी पूजन, घागरी फुंकणे. 

मेष :–आज तुमच्या हातून होणार्या  कामापासून तुम्हाला तुमच्या भाग्योदयाचा  रस्ता  सापडेल. विद्यार्थ्यानी आपल्या उज्वल यशासाठी श्री सरस्वतीची प्रार्थना करावी.

वृषभ :– बँकेसारख्या ठिकाणी काम करणार्या  अधिकार्‍यांनी अती महत्वाचे काम आज करू नये. पोलीस  खात्यातील  अधिकार्यांनी नियमाच्या बाहेर जाऊन काम करू नये.

मिथुन :–समाजकार्याची आवड असलेल्यांना लोकांकडून आदर मिळेल. वकीलांनी आपल्या बोलण्यावर संयम ठेवावा अन्यथा  समाजाकडून टिका सहन करावी लागेल.

कर्क :–ध्यान धारणा करण्याच्या दृष्टीने मान्यवर गुरूंकडूनच मार्गदर्शन होईल. तरूण मंडळीना आज देवीच्या उपासनेतून  सकारात्मक उर्जा मिळेल. लहान मुलांच्या कडून झालेल्या चुकांबद्धल त्यांना समजावून सांगा.

सिंह :–शिक्षकांना  त्यांच्या सेवाभावी कार्याबद्दल पुरस्कार जाहीर होणार असल्याचे संकेत मिळतील. संततीसाठी केलेल्या गुंतवणुकीवर  चांगला परतावा मिळणार आहे.

कन्या :–स्कष्टाने मिळवलेल्या पैशातून आईवडीलांसाठी त्यांच्या  आवडत्या वस्तूची खरेदी कराल. धार्मिक कार्य करणार्याना  आजच्या पूजा कार्यासाठी मानाचे स्थान मिळेल.

तूळ :–शत्रूपक्षावर विजय मिळवण्यासाठी राजकीय क्षेत्रात तुमची चढाओढ लागेल. शाळकरी विद्यार्थ्यांनी आपले उद्धीष्ट निश्चित करावे त्यादृष्टीने मार्गदर्शन घेण्यास आजचा दिवस अतिशय लाभदायक आहे.

वृश्र्चिक :–डोकेदुखीच्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी डाँक्टरांनी दिलेल्या तपासण्या करून घेणे आवश्यक आहे. बाल सुधार गृहासाठी तुमच्या उत्पन्नातील कांही रक्कम खुशीने द्याल.

धनु :–मोठेपणाच्या खोट्या कल्पनेसाठी विनाकारण मोठा खर्च कराल. विद्यार्थी नाविन्याकडे  आपणहून वळणार आहेत तरी पालकांनी त्यांना सपोर्ट करावा.

मकर :–आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळाल्याने तुमच्या कामातील अडथळे आपोआप दूर होतील. वकिलांकरीता  आजची कसोटीची वेळ असणार आहे.

कुंभ :– व्यवसायात  घडणार्‍या लहान सहान गोष्टी मनाला लावून घेऊ नका. महिलांनी आपल्या मनातील गोष्टी इतरांना सांगू  नयेत. नवीन ओळखीतून आनंद मिळेल.

मीन :–मागिल अनुभवाचा विचार करून आज कोणताही नवीन निर्णय घेऊ नका. कलाकार गायकांना आजचा दिवस मान सन्मानाचा राहणार आहे

||शुभं-भवतु ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *