Read in
सोमवार 11 आँक्टोबर 2021 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे
सोमवार 11 आँक्टोबर चंद्ररास वृश्र्चिक 12:55 पर्यंत व नंतर धनु. चंद्रनक्षत्र ज्येष्ठा 12:55 पर्यंत व नंतर मूळ.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज सरस्वती आवाहनाची वेळ 12:55 नंतर आहे.
मेष :– तुमच्या मनातील हळव्या कप्प्याला इतरांकडून दुखावले जाणार आहे. अती भावनाविवश होऊन मन दुखी: करू नका. रेंगाळलेले काम तडीस नेण्याकरता चिकाटी वाढवावी लागेल.
वृषभ :–ब्युटीपार्लरच्या व्यावसायिकांना आज होम विझीटस् मधून चांगली प्राप्ती होईल. नोकरीतील तुमचे सहकारी तुमच्याकडून काम करून घेण्यासाठी गोड बोलतील.
मिथुन :–आज तुमच्या हातून फक्त परमार्थ घडणार आहे. दुसर्यांना मदत करताना आज तुमचे कष्ट वाढणार आहेत. लहान सहान गोष्टी मनाला लावून घेऊ नका.
कर्क:–व्यापारी प्रवृत्तीच्या मंडळीना नवीन व्यापाराची दिशा सापडेल. दोन कुटुंबातील मैत्रीच्या संबंधातून नातेसंबंध जुळण्याचे चान्सेस जास्त आहेत.
सिंह :– आज तुमच्या मित्रमंडळीना तुमच्या मनात काय चालले आहे याचा पत्ता लागेल. आज तुम्हाला कोणतीही गोष्ट लपवून ठेवता येणार नाही तरी लपवाछपवी करू नका.
कन्या :–अचानक वजन कमी झालेल्यानी डाँक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक ती तपासणी करून घ्यावी. वयस्कर मंडळीनी पायाच्या जखमेची विशेष काळजी घ्यावी.
तूळ :–गळ्यातील दागिने तसेच सिल्क व रेशीमच्या वस्तूंचा व्यवसाय करणार्यांना आज चांगला लाभ होईल. वातप्रकृतीच्या मंडळीना अचानक वाताचा त्रास होऊ लागेल.
वृश्र्चिक :–ज्युडो, कराटे, कबड्डी च्या प्रशिक्षकांना नव्याने मार्गदर्शनाचा वर्ग सुरू करता येणार आहे. तुमच्या जबरदस्त इच्छाशक्तीने अवघड कामही मार्गी लावाल.
धनु :–आज तुमच्या स्वभावातील सेवाभावीपणा उफाळून आल्याने खिसा रिकामा होईल. लोकांच्या हिताचा विचार करण्यापूर्वी वस्तुस्थितीची माहिती करून घ्या.
मकर :–काम्पुटरच्या क्षेत्रातील उच्चशिक्षितांना नवीन नोकरीची चांगली संधी मिळणार आहे तरी त्या दिशेने प्रयत्न करावेत. साथीच्या व संसर्गजन्य रोगापासून काळजी घ्यावी.
कुंभ :–आटोमोबाइल क्षेत्रातील कर्मचार्यांच्या बाबतीत प्रतिष्ठा वाढवणार्या घटना घडतील. कुटुंबात अचानक प्रथम संतती बाबतच्या विवाहाचा प्रश्र्न चर्चेला येईल.
मीन :–गायक व वादक मंडळीना त्यांच्या उत्तम कलेसाठी कौतुक केले जाईल. सर्वच क्षेत्रांत आजचा दिवस तुमच्यासाठी रेड कार्पेटचा राहील.
|| शुभं-भवतु ||