daily horoscope

शनिवार 09 आँक्टोबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

शनिवार 09 आँक्टोबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

शनिवार 09 आँक्टोबर चंद्ररास तूळ 11:19 पर्यंत व नंतर वृश्चिक. चंद्रनक्षत्र विशाखा 16:47 पर्यंत व नंतर अनुराधा.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश

वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

आज विनायक चतुर्थी आहे.

सप्तरात्रोत्सवास आरंभ होत आहे.

मेष :–तुमच्या आवडत्या विषयावर  लोकांना प्रबोधन करण्याची  संधी मिळेल. तज्ञांच्या सल्ल्याला महत्व प्राप्त  होईल. रिसर्च वर्क करणार्यांना आजचा दिवस अत्यंत महत्वाचा राहील.

वृषभ :– आईस्क्रिम आणि सरबतांच्या उद्योगातून  चांगली प्राप्ती होऊ  लागेल.डेकोरेशनचे साहित्याच्या विक्रेत्यांनी आता आज नवीन माल भरण्याचा विचार करावा.

मिथुन :–लहान मुलांच्या खेळण्याच्या व्यावसायिकांना लहान मुलांना आकर्षित करणारी खेळणी व वस्तु ठेवाव्या लागतील. विजेवरच्या खेळण्यांची जास्त विक्री होणार नाही.

कर्क :–किराणा मालाच्या व्यापार्यांना  नेहमीपेक्षा जास्तच  प्रमाणात विक्री होत असल्याचे जाणवेल. जनतासंपर्क अधिकार्यांना मोठ्या दिव्यातून जावे लागेल.

सिंह :–औषध विक्रेत्यांनी सरकारी नियम काटेकोरपणे न पाळल्याबद्धल दंड भरावा लागेल.  आहारतज्ञांना  मोठ्या सेलिब्रीटीच्या कामाची जबाबदारी स्विकारावी लागेल.

कन्या :–न्यायालय, पासपोर्ट आँफिसयेथे काम करणार्यांना कामाचे प्रेशर सहन होणार नाही. दूध व मिठाईच्या व्यापार्यांना  अचानक नुकसानीस सहन करावे लागेल.

तूळ :–वकील, न्यायाधीश यांना एखाद्या दबाब तंत्राला सहन करावे लागेल. प्रगल्भ बुद्धीच्या व संशोधन वृत्तीच्या विद्यार्थ्यांना  मनासारख्या कंपनीत काम  करायला मिळणार आहे. 

वृश्र्चिक :–कामकरी, कष्टकरी व औद्योगिक क्षेत्रात काम करणार्यांना चांगली संधी चालून येईल. सिमेंट तसेच खताच्या कारखान्यांना सरकारी नियम कठोरपणे पाळावे लागतील. 

धनु :–आज तुमच्या भोवती वायफळ बडबड करणारे गोळा होणार आहेत. सहसा आजारी न पडणार्‍याना उष्णतेचा त्रास सुरू होईल. मुळव्याधीचा त्रास वाढेल. 

मकर :–धार्मिक गोष्टींचे वाचन करणार्यांना  वयस्कर मंडळींसाठी सेवाभावी काम करता येणार आहे. कुटुंबात नवरात्राच्या निमीत्ताने किर्तानाचे नियोजन केले जाईल. 

कुंभ :–अभ्यासा ऐवजी इतर कलाकुसर शिकण्याची गोडी वाढेल व त्यातच करीयर करण्याची इच्छा होईल. प्रेमविवाहाचा विचार करणार्यांनी  आज कोणतीही मोठी उडी घेऊ नका. 

मीन :–नोकरीमध्ये आज तुमच्याकडून  अपेक्षित असलेल्या महत्वाच्या कामाला सुरूवात होईल. कोणत्याही संकटाला न भिता काम करण्याची प्रवृत्ती बळावेल. 

||शुभं-भवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *