Read In
श्री दुर्गायै नम:
श्री सप्तशती ग्रंथातील सिद्ध मंत्रांची माहिती
मंगळवार 20 आँक्टोबर 2020.
मंत्र सहावा :–
देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखम्
रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ||
अर्थ :–सध्याच्या धावपळीच्या जगात मनुष्याला धनदौलत कमवण्यासाठी अतिशय कष्ट करावे लागतात. त्यामुळे यशाच्या व धनाच्या मागे धावताना आरोग्य टिकवता येत नाही. म्हणून यश, जय, सुख समृद्धी व त्याचबरोबर आरोग्याची प्राप्ती होण्यासाठी वरील मंत्रांचा रोज 108 वेळा संकल्प करून जप करावा. प्रथम आई जगदंबेची प्रार्थना करावी व ठरावीक वेळी एकांतात हा जप करावा. हा जप रूद्राक्षाच्या माळेवर फक्त स्वत:लाच ऐकू येईल अशा हळू आवाजात करावा. महिन्याभरातच याचा अनुभव येऊ लागतो.
मंत्र सातवा :– जूना शारिरीक रोग बरा होण्यासाठी
मंत्र :–रोगानशेषानपहंसी तुष्टा
रूष्टा तु कामान् सकलानभीष्टान् |
त्वामाश्रितानां न विपन्नराणां
त्वामाश्रिता ह्याश्रयतां प्रयान्ति ||
अर्थ :–या मंत्राचे वैशिष्ट्य असे आहे किं या मंत्राचा उपयोग आपण दुसर्या माणसासाठी करू शकतो. आजारी असलेल्या व्यक्तीसाठी, दवाखान्यात असलेल्यांसाठी त्यांच्या नातेवाइकांनी ह्या मंत्राचा जप करताना आजारी माणसाच्या नावाचा उच्चार करून करावा. प्रथम आई जगदंबेला नमस्कार करून या मंत्राचा जप रूद्राक्षाच्या माळेवर 108 वेळा करावा.
मंत्र आठवा :–विविध जीवजंतू व वाईट शक्तींपासून रक्षण होण्यासाठी
मंत्र :–रक्षांसि यत्रोग्रविषाश्र्च नागा
दस्युबलानि यत्र | यत्रारयो
दावानलो यत्र तथाब्धिमध्ये
तत्र स्थितात्वं परिपासि विश्र्वम् ||
अर्थ :– मनुष्याला पृथ्वीतलावर राहताना अनेक प्रकारच्या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांशी सामना करावा लागतो. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे जीवजंतूपासूनही त्रास होत असतो. या सर्व उपद्रवांचा नाश होऊन त्यांच्या त्रासापासून आपले रक्षण होण्यासाठी या मंत्राचा जप वैयक्तिक करावा. सामूहिक पद्धतीने केल्यास जास्त फलदायी होते. प्रथम श्री आईजगदंबेला नमस्कार करून, संकल्प करून देवीला नमस्कार करावा. नंतर जप करावा.
मंत्र नववा :–शारिरीक व मानसिक शक्ती प्राप्त होण्याकरीता.
मंत्र :–सृष्टीस्थितिविनशानां शक्तिभूते सनातनी |
गुणाश्रये गुणमये नारायणि नमोस्तुते ||
अर्थ :– सध्याच्या जगात जगताना कामाचा ताण व मानसिक चिंता यामुळे शरीरामध्ये अशक्तपणा येऊन मानसिक दुबळेपणा जाणवू लागला आहे. हा अशक्तपणा व दुबळेपणा जाऊन शरीर व मनाचे आरोग्य संतुलित राहण्यासाठी या मंत्राचा जप रोज 12 वेळा करावा. प्रत्येक वेळी जप म्हणताना साष्टांग नमस्कार घालावा. कोणतेही आजारपण दूर होण्यासाठी हा जप उपयोगी पडतो. प्रथम संकल्प करून आई जगदंबेला प्रार्थना करावी व आई जगदंबेच्या प्रतिमेसमोर उभे राहून रोज हा जप करावा.
*********×*****************************************************************
मंत्र दहावा:- विश्वातील त्रासदायक घटनांचे निवारण करण्यासाठी.
मंत्र:- देवी प्रसीद परिपालय नोsरिभितेर्नित्यं
यथासुरवधादधुनैव सद्ध: |
पापानि सर्वजगतां प्रशमं नयाशु
उत्पातपाकजनितांश्र्च महोपसर्गान् ||
अर्थ :–विश्र्वातील पापाचा, हिंसाचार व एकमेकात चाललेला दुष्टपणा व यामूळे निर्माण होणारा त्रास या पासून सर्वांचे रक्षण होण्यासाठी हा मंत्र वैयक्तिक व सामूहिक करता येतो. पण सामूहिक केल्यास या मंत्राची शक्ती वाढते व इंद्रशक्ती ऐंद्रीची कृपा होईल. प्रथम आई जगदंबेला नमस्कार करून संकल्प करून या मंत्राचा जप करावा.
||शुभं – भवतु ||