Read in
शुक्रवार 08 आँक्टोबर 2021 चे दैनिक राशीभविष्य
शुक्रवार 08 आँक्टोबर चंद्ररास तूळ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र स्वाती 18:59 पर्यंत व नंतर विशाखा.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–कलाकार मंडळीना आपली कला सादर करण्याची योग्य संधी मिळेल. लेखक व कवी मंडळीना आपले अनुभव कथन करण्याची संधी मिळेल.
वृषभ :–आज तुम्हाला शांत राहून परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येणार आहे. आर्थिक देण्याघेण्याच्या व्यवहारात अतिशय सावध रहावे लागेल.
मिथुन :–तुमच्या हातातील कामाबद्दलची माहिती जाणून घेतल्यास तुमचा आत्मविश्वास वाढेल. अपरिचित व्यक्तीबरोबर बोलताना जागरूक रहावे लागेल.
कर्क :–आज तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीचा विश्वास मिळवाल व प्रेमाचा अनुभव पण घ्याल. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीचा योग्य तो वापर करावा.
सिंह :–कोणत्याही व्यसनाच्या नादाला लागू नका. मानसिक आनंद मिळण्यासाठी नातेवाईक मंडळींमधे रमण्यास शिकावे लागेल. मनातील विचारांमधे बदल होईल.
कन्या :– चुकीच्या मार्गाने पैसे मिळवण्याचा मोह आवरावा लागेल. तुमच्या व्यवसायात तुम्हाला अनेकांचे सहकार्य मिळेल. कुळाचाराच्या निमीत्ताने कुटुंबात पूजा होईल.
तूळ :–कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळूनच बाकीच्या कार्याचे नियोजन कराल. मित्रांच्या संगतीने चांगल्या व सकारात्मक गोष्टी घडत असल्याचे जाणवेल.
वृश्र्चिक :– स्वत:विषयीचा विचार करताना त्याचबरोबर इतरांचाही विचार करा. महत्वाच्या बाबतीत तडजोड करावी लागेल. न टाळता येणारी जबाबदारी स्विकारावी लागेल.
धनु :–आज कोर्टातील कामांचे महत्व ओळखून लवकर संपवण्याबाबतची चर्चा फलद्रूप होईल. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या विचारांवर नियंत्रण ठेवावे व इतरांच्या सल्ल्यांचा विचार करावा.
मकर :–व्यसनापासून दूर राहण्यासाठीचा तुमचा प्रयत्न मित्र हाणून पाडण्याचा प्रयत्न करतील. बांधकाम क्षेत्रातील कर्मचार्यांना नवीन काँन्ट्रक्टचा विचार करावा लागेल.
कुंभ :–घराची दुरूस्ती करण्याचा विचार आज पुढे सरकेल व सर्वांची त्याला मान्यता मिळेल. महिलांना आपल्या आवडत्या छंदाबाबत अभ्यास वाढवण्याची तीव्र इच्छा होईल.
मीन :– आज तुमच्या मनात असलेल्या विचारांना मोकळीक देता येणार आहे. कुटुंबात नवरात्राच्या निमीत्ताने एखादा समारंभ ठरवाल. आज नवीन धाडस करताना प्रथम त्यातील जबाबदारीचा विचार करा.
||शुभं-भवतु ||