Read in
गुरूवार 07 आँक्टोबर 2021 चे दैनिक राशीभविष्य
गुरूवार 07 आँक्टोबर चंद्ररास कन्या 10:17 पर्यंत व नंतर तूळ. चंद्रनक्षत्र चित्रा 21:12 पर्यंत व नंतर स्वाती.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज घटस्थापना नवरात्राचा पहिला दिवस.
मेष :–कुटुंबात जोडीदाराबरोबर अचानक खटाखटी चा प्रसंग येईल. वयस्कर मंडळीना सांधेदुखीचा त्रास वाढल्याचे जाणवेल व दवाखान्यात जाणे भाग पडेल.
वृषभ :– मुलीला नवीन नोकरी मिळाल्याची आनंदाची बातमी कळेल. बदली होऊन लांब गेलेला मुलगा, मुलगी यांना परत होम टाऊनला येण्याची संधी मिळेल.
मिथुन :– आईच्या माहेरकडील ज्येष्ठ व्यक्तीचा मोठा पाठींबा मिळाल्याने अडलेले राजकीय काम मार्गी लागेल. पोलीस खात्यातील मंडळीना अचानक कामाचा ताण कमी होईल.
कर्क :– आईच्या इच्छेसाठी उच्चशिक्षणाच्या अभ्यास करणार्यांना चांगले यश मिळाल्याचे कळेल. ज्येष्ठांच्या विचाराने घेतलेल्या निर्णयाचा आदर करा.
सिंह :–तुम्ही केलेल्या मनाच्या निश्चयापुढे कोणाचेही काहीही चालणार नाही. न्यायप्रविष्ट असलेल्या बाबतीत तुम्ही एकांगी विचाराने निर्णय घेऊ नका.
कन्या :– गर्भवती महिलांनी आज विशेष काळजी घ्यावी, आरामच करावा. अपत्य प्राप्तीच्या इच्छुकांना आपल्या इच्छा लवकरच पूर्ण होणार असल्याचे जाणवेल.
तूळ :–आज तुमच्यातील कामाचा जोर वाखाणण्यासारखा असेल. अवघड काम तुम्ही आज अगदी सहजपणे करून दाखवाल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कौतुकच होणार आहे.
वृश्र्चिक :– कामातील क्लीष्टपणा ओळखून कामाचे चँलेंज स्विकाराल. विद्यार्थ्यांना आपल्या नियोजित शिक्षणापेक्षा वेगळेच शिक्षण घेण्याची इच्छा निर्माण होईल.
धनु :– नोकरी नसलेल्यांनी या नवरात्रापासून लहानशा उद्योग सुरू करण्याचे ठरवावे त्याबाबतची मदत तुम्हाला आपोआप मिळणार आहे. कोणापुढेही हात पसरावे लागणार नाहीत.
मकर :–आज तुमच्या मदतीने कुटुंबात नवरात्राची साग्रसंगीत सुरूवात होणार आहे. चित्रकार मंडळीना त्यानी काढलेल्या चित्रांना चांगली मागणी असल्याचे जाणवेल.
कुंभ :–आर्थिक नुकसान भरून काढण्याकरता माल चढ्या दराने विकण्याचा विचार कराल. सौंदर्यप्रसाधनाच्या उद्योगातून आज अचानक चांगली प्राप्ती होणार आहे.
मीन :– खेळाडूंनी आपल्या आवडत्या खेळाकडे जास्त लक्ष दिल्यास एखादी स्पर्धा जिंकू शकाल. नोकरीत रेंगाळलेल्या कामाबाबतचा स्पष्टीकरण देणारा अहवाल सादर करावा लागेल.
||शुभं-भवतु ||