Read in
बुधवार 06 आँक्टोबर 2021 चे दैनिक राशीभविष्य
बुधवार 06 आँक्टोबर चंद्ररास कन्या दिवसरात्र व चंद्र नक्षत्र हस्त 23:19 पर्यंत व नंतर चित्रा.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज सर्वपित्री अमावास्या. अमावास्येच्या श्राद्धाचा दिवस.
मेष :–व्यवसायातील मोठी न जाणवलेली समस्या समोर येऊन उभी राहील. कुटुंबात जोडीदाराकडून कटु अनुभव येतील पण त्याला समजून घेण्याची गरज आहे हे लक्षांत घ्या.
वृषभ :–कुटुंबातील पतीपत्नींचे आजवरचे झालेले गैरसमज आज अचानक दूर होत असल्याचे संकेत मिळतील. संततीबरोबर अतिशय प्रेमळ व्यवहार राहील
मिथुन. :–आज तुम्हाला नोकरीत सहकार्यावर अवलंबून राहता येणार नाही. सगळ्या कामाचे बारा वाजतील. तुमच्या जबाबदारीवर कामाला सुरूवात करा.
कर्क :–आज स्वादिष्ट भोजनातून आनंद मिळेल. सामाजिक पातळीवर इतरांना तुमच्याकडून आर्थिक मदत मिळेल. व्यवसायात नवीन योजनांची आखणी कराल.
सिंह :– कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून ताणतणाव निर्माण होईल. तरूणांच्या प्रेमप्रकरणात अचानक नकारात्मक वारे वाहू आतील तरी धीर धरा लगेच रिअँक्ट होऊ नका.
कन्या :–आज तुम्हाला एका प्रतिष्ठीत व्यक्तीला भेटण्याची संधी मिळेल. व त्यामुळे तुमचा भाव वाढेल. शेजारील वयस्कर व्यक्तीसाठी लहानसा प्रवास करावा लागेल.
तूळ :–आज गँसेसचा इतका त्रास होईल की जाीव घाबरा होईल. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करणे आज टाळा म्हणजे नुकसान होणार नाही.
वृश्र्चिक :–तुम्हाला नको असलेल्या जबाबदार्या तुमच्याच अंगावर सोपवल्या जातील. महिलां कायदेशीर बाबी हाताळण्याचे कौशल्य करून दाखवतील.
धनु :–कुटुंबात तुमच्या आवडीला महत्व देऊन नवीन खरेदी केली जाईल. विजेवर चालणार्या घरगुती उपकरणांच्या बाबतीत काळजीपूर्वक हाताळावी लागतील.
मकर :–प्रेम विवाहासाठी कुटुंबाकडून परवानगी मिळण्याचे चान्सेस कमी आहेत तरी आज बोलणे करू नका. नोकरीत तुम्ही करत असलेल्या कामाचे वरिष्ठांकडून कौतुक होईल.
कुंभ :–कुटुंबातील प्रत्येकाचे म्हणणे आज तुम्हाला शांतपणे ऐकून घ्यावे लागणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस नरम गरम राहील.
मीन :–इतरांचे ऐकून तुम्ही घेतलेला निर्णय बदलता आला तर आवश्य बदला. कोणत्याही गोष्टीत प्रत्यक्ष वस्तुस्थितीवर विश्वास ठेवूनच विचार करा.
||शुभं-भवतु ||