daily horoscope

मंगळवार 05 आँक्टोबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

मंगळवार 05 आँक्टोबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

मंगळवार 05 आँक्टोबर चंद्ररास सिंह 08:16 व नंतर कन्या चंद्रनक्षत्र उत्तरा
फाल्गुनी 25:09 पर्यंत व नंतर हस्त.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश

वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व
आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय
फलादेश देत आहे.
आज चतुर्दशी श्राद्धाचा दिवस आहे.
याबाबतचा लेख तुम्ही वाचलाच असणार आहे. वाचला नसल्यास नक्की
वाचा. कारण हा दिवस पुन्हा वर्षभर मिळत नाही.

मेष :– अगदी जवळच्या दोस्तमंडळींवर जबाबदारी टाकून स्वत:चे हात
झटकल्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत तरी आधीच दक्षता घ्या.

वृषभ :– कोणत्याही कामाशिवाय तुम्हाला फोनसुद्धा न करणारे आज
त्यांच्या स्वार्थासाठी तुमची पाठ सोडणार नाहीत. न झेपणारा शब्द देऊ नका.

मिथुन :–एकदा केलेल्या मदतीमुळे तुम्हाला कर्तव्याची जाणीव होईल.
सकाळी उठल्यापासून आज कामाची घाई गडबड होणार आहे तरी शांततेने
घ्यावे लागेल.

कर्क :–आज अचानक पगारातील मोठी रक्कम मित्रांच्या गरजेसाठी द्यावी
लागेल. लहान मुलीच्या पायाच्या दुखण्यासाठी नवीन डाँक्टरांचा शोध
लागेल.

सिंह :–मनातील इच्छा प्रत्यक्षात उतरवण्याकरीता प्रथम तुम्ही केलेले
नियोजन तपासून पहा.इतरांवर इंप्रेशन पाडण्याकरीता न झेपणारी मोठी उडी
घेऊ नका.

कन्या :–कोणत्याही सरकारी कामाला सुरूवात केल्यास ते तुमच्याकडून पूर्ण
होण्याची खात्री पटेल. आज तुमच्या बोलण्यात अचानक कडकपणा असेल
तरी विचारानेच व्यक्त व्हा.

तूळ :–आगीपासून स्वत:ला सांभाळावे लागेल. सरकारी कामातील अडचणीत
अचानक वाढ होईल तरी तुमच्या विचाराने चालण्याऐवजी ज्येष्ठांचा सल्ला
घ्या.

वृश्र्चिक :–मित्रांच्या नादाने आज तुम्ही तुमचा निर्णय बदलाल पण आज व
उद्या कोणताच निर्णय घेऊ नका. ऐकावे जनाचे करावे मनाचे याची आठवण
ठेवा.
धनु :–आज सकाळपासूनच वाद घालण्याचा मुड राहील व तसे प्रसंगही
येतील. आज तुम्हाला इतरांबरोबर जुळवून घ्यावे लागेल. कुटुंबात प्रेमाने
वागा.

मकर :– तुमचे सर्वच प्रश्र्न गुरूमाऊलीने सोडवावेत या अपेक्षेने अंगावरील
जबाबदारी झटकू नका. कुटुंबातील महत्वाच्या निर्णयात तुम्हाला तुमचे मत
पटवून द्यावे लागेल.

कुंभ :–आज कोणतेही काम करून घेण्याकरिता आधीच पैसे द्यावे लागतील.
वाहन चालवताना नियमांचे पालन करा जराही हलगर्जीपणा करू नका. दंड
भरावा लागणार आहे.

मीन :–व्यवसायातील तुमच्या भागिदारांबरोबर शाब्दिक बाचाबाची झाल्याने
मन नाराज होईल. सरकारी कामातून मिळणारे उत्पन्न अचानक कमी
होईल.

|| शुभं-भवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *