weekly-horoscope-2020

रविवार 03 आँक्टोबर 2021 ते शनिवार 09 आँक्टोबर 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य.

Read in

रविवार 03  आँक्टोबर 2021 ते शनिवार 09 आँक्टोबर 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य.

03  रविवार चंद्ररास सिंह दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मघा 27:25 पर्यंत व नंतर कन्या. 04 सोमवार चंद्ररास सिंह दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पूर्वा फाल्गुनी 26:34 पर्यंत व नंतर उत्तरा फाल्गुनी.

weekly-horoscope-2020

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

05 मंगळवार चंद्ररास 08:16 पर्यंत व नंतर कन्या. चंद्रनक्षत्र उत्तरा फाल्गुनी 25:09 पर्यंत व नंतर हस्त. 06 बुधवार चंद्ररास कन्या दिवसरात्र व चंद्र नक्षत्र हस्त 23:19 पर्यंत व नंतर चित्रा. 07 गुरूवार चंद्ररास कन्या 10:17 पर्यंत नंतर तूळ. चंद्रनक्षत्र चित्रा 21:12 पर्यंत व नंतर स्वाती. 08 शुक्रवार  चंद्ररास तूळ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र स्वाती 18:59 नंतर विशाखा.  09 शनिवार चंद्ररास तूळ 11:19 पर्यंत व नंतर वृश्चिक. चंद्र नक्षत्र विशाखा 16:47 पर्यंत व नंतर अनुराधा.

03 रविवार महालय श्राद्ध. द्वादशी त्श्राद्ध.

04 त्रयोदशी श्राद्ध , शिवरात्री सोमप्रदोष. ( युगादी

05 चतुर्दशी श्राद्ध, शस्त्रादिहत् पितृ श्राद्ध

06  सर्वपित्री अमावास्या. अमावास्या श्राद्ध

07 घटस्थापना नवरात्रारंभ. ( पहिली माळ.) 

08 दुसरी माळ

 09शनिवार  विनायक चतुर्थी, सप्तरात्रोत्सव आरंभ

मेष :–या सप्ताहाची सुरूवात तुम्हाला अध्यात्मिक उपासना सुरू करण्यास अतिशय लाभदायक आहे. हे नवरात्र तुम्हाला नौकरी, न्यायालयातील कामकाज व्यवसाय या क्षेत्रात चांगल्या यशाच्या मार्गाकडे घेऊन जाणार आहे. जी कर्जवसुली आजपर्यंत होत नव्हती त्याच्या मागे आता लागायला हरकत नाही. स्पर्धात्मक परिक्षेच्या अभ्यासाला  सुरूवात करण्यापूर्वी श्री सरस्वतीची मनोभावे प्रार्थना करून जोमाने सुरूवात करा. 06 07 तारखेला कोणत्याही रेंगाळलेल्या सरकारी कामाला सुरूवात करायला हरकत नाही काम पुढे सरकेल

वृषभ :–व्यवसायातील अडचणींवर  06 07 तारखेपर्यंत आवश्यक तो उपाय सापडेल. ओढून ताणून कोणासही जबरदस्ती  करू नका. बालसंगोपन केंद्र चालवणार्‍यांना खाजगी संस्थेकडून मोलाची मदत मिळेल. अंतर्गत आर्थिक अडचणींवर मार्ग सापडेल. कोणत्याही प्रकारात वा क्षेत्रात गुंतवणूक करत असाल तर तत्पूर्वी अतिशय बारकाईने विचार करावा लागेल. फसव्या लोकांपासून, संस्थांपासून सावध रहा. मंत्रविद्या, गूढविद्ध्या यांच्या अभ्यासकांनी या नवरात्रात आपला अभ्यास वाढवावा देवीमातेच्या आशिर्वादासाठी उपासना वाढवावी

मिथुन :–पोस्ट, टेलिफोन तसेच दळणवळण क्षेत्रात काम करणार्‍यांनी आपले बोलणे सौम्य ठेवल्यास वाद निर्माण होण्याच्या दाट शक्यता आहेत. नोकरीतील प्रमोशनच्या प्रतिक्षेत राहून नवीन आलेली संधी घालवू नका. व्यावहारिक विचाराने वागा. कोणत्याही क्षेत्रातील  निवडणूकीच्या विषयावर तुम्हाला तुमचे विचार मांडण्याची खूप मोठी संधी मिळणार आहे ती घालवू नका. नाटक सिनेमाच्या पटकथा लेखकांना आता परत नव्याने जागे होण्याची  वेळ आलेली आहे हे लक्षांत ठेवावे लागेल

कर्क :–बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा तगादा आता फारच प्रमाणात त्रास देणार आहे. हातातील प्रोजेक्टवरील इतरांचा विश्वास वाढवण्याकरीता  मेहनत घ्यावी लागेल. वयोवृद्ध मंडळीनी अतिचिकित्सेने हातातील संधी घालवू नये. तसेच तरूणानाही नकारात्मकतेकडे ओढू नये. तरूण मुलांकडून त्याच्या मात्यापित्यांना  अतिशय आनंदाच्या सुखावह बातम्या ऐकावयास मिळतील. नोकरीत इतरांची प्रेरणा वाढवण्यासाठी तुम्हाला आमंत्रित केले जाईल

सिंह :–मित्राच्या घराकडून आलेल्या बातम्यांमुळे मानसिक त्रास होईल. मित्राला मदत करण्याकरीता जीवाचे रान कराल. 08 09 रोजी आईला सुख समाधान देणार्‍या गोष्टी तुमच्या कडून घडणार आहेत. सामाजिक पातळीवर काम करणार्‍यांना अतिशय जागरूक राहून काम करावे लागेल. कोर्टकचेरीच्या कामात घाईने किंवा  अविचाराने कोणताही निर्णय घेऊ नका. तुम्ही मिळवलेल्या यशाचे वर्णन करत असताना  जराही आत्मप्रौढी करू नका

कन्या :–नव्याने झालेल्या परिचयांच्या व्यक्तींकडे महत्वाच्या कामासाठी मदत मागू नका. या सप्ताहात तुम्हाला तुमच्या कामात चिकाटी वाढवावी लागणार आहे. नोकरीच्या ठिकाणी पुरूष मंडळीनी महिलांबरोबर वागताना सौजन्याने वागावे नकळतही त्यांना दुखवू नये. अपत्याच्या प्राप्तीच्या इच्छुकांनी या सप्ताहात जराही विचार करू नये. निदान  03   04 रोजी तुमचे  नकारात्मक उर्जेचे दिवस असल्याने कोणत्याही नव्याने करावयाच्या गोष्टी करू नयेत.  08 09  रोजी पतीपत्नीनी एकमेकांवर अवलंबून कोणतेही कार्य करू नका

तूळ :–खेळात प्राविण्य मिळवलेल्या खेळाडूना आता आपले राज्य प्रस्थापित करता येणार आहे. वडिल भावंडांच्या मदतीने मोठी उडी घेता येणार आहे. घरासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याकरीता निवृत्त मंडळीना आपल्या प्राँव्हीडंट फंडाचा वापर करावा लागेल. खाजगी नोकरीतील कर्मचार्‍यांना नव्याने नोकरी मिळण्याची संधी आहे तरी डोळसपणे चौकशी करा. कुटुंबात महिलांच्या कुरबुरी वरून  वाद निर्माण होतील तरी सावध रहावे

वृश्र्चिक :–प्रथम संततीच्या आजारपणावर उपचार करण्याकरीता दुसरा दवाखाना, किंवा दुसर्या शहरात जावे लागेल. बरेच दिवस दवाखान्यात अँडमिट असलेल्यांसाठी या नवरात्राचा फायदा घेऊन देवीची उपासना करावी. वडिलांच्या व्यवसायातून तुमच्यावर आलेली जबाबदारी योग्य तर्‍हेने सांभाळल्याबद्दल कुटुंबियांकडून कौतुक होईल. न्यायालयातील वाद न्यायालयाच्या बाहेर सुटणार असल्याने  तुम्ही तुमच्या योजना तज्ञांच्या सल्ल्याने तयार करून ठेवा

धनु :–सरकारी नोकरीत असलेल्यांना राजकीय क्षेत्रातील मंडळींबरोबर संबंध येणार आहे. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या विचाराने घरातील महत्वाचे प्रश्र्न सोडवता येणार आहेत. उगाच  त्या बाबतची भीती मनात धरू नकाअध्यात्मिक  प्रवृत्तीच्या व्यक्तीनी   अध्यात्माचा  अभ्यास करणार्यांनी नवरात्राच्या दिवसात आपली उपासना वाढवावी. कुटुंबातील कुलदेवतेबाबतच्या प्रथा रितीरिवाज पद्धतशीरपणे पूर्ण करावेत

मकर :–सप्ताहाच्या सुरूवातीलाच सरकारी अधिकार्‍यांनी आपल्या कामकाजात इतर व्यवहारात अत्यंत जागरूक रहावे. पोलीस खात्यातील मंडळीना अचानक मानहानीला सामोरे जावे लागेल. पुरूष मंडळीना आपल्या सासुरवाडीकडील जबाबदारी अतिशय  काळजीपूर्वक हाताळावी लागणार आहे. कुटुंबात नवरात्राच्या निमीत्ताने भजन, किर्तनाचा आनंद घेता येणार आहे. व्यवसायातील  होणार्या लाभातील कांही रक्कम दानधर्मासाठी वापराल

कुंभ :–वकिलीचे शिक्षण घेऊ इच्छिणार्यांना अपेक्षित  काँलेजमध्ये प्रवेश मिळेल. महिलांना अध्यात्मिक क्षेत्राविषयी कुतूहल निर्माण  होऊन कुळाचाराच्या मदतीने उपासना करावी अशी ओढ निर्माण होईल. तरूणांना कोणत्याही क्षेत्रातील प्रतिस्पर्धींचा त्रास होणार नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे मनोबल वाढेल. दत्तक पुत्राच्या कतृत्वाने आईवडीलांचे  मन भारावून जाईललेखक संपादक यांच्यामध्ये करार करण्याबाबतचे बोलणे होईल. नोकरीत प्रमोशन मिळणार असल्याच्या बातम्या कानावर येथील

मीन :–बर्‍याच कालावधीपासून नोकरीच्या प्रतिक्षेतील मंडळीना हा सप्ताह आशादायी राहील. त्वचारोगाचा त्रास असणार्‍यांनी  नव्याने डाँक्टर बदलता त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार जावे, मनाने काहीही करू नये. विद्यार्थ्यांना अचानक नवीन विषयात आवड निर्माण होईल. महिलांनी कोणत्याही कामात भावनेपेक्षा कर्तव्याला जास्त महत्व द्यावे. राजकीय क्षेत्रातील विरोधकांच्या बोलण्याचा विचार करून त्याप्रमाणे आवश्यक त्या सुधारणा किंवा  बदल करावा

|| शुभं-भवतु ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *