daily horoscope

शनिवार 02 आँक्टोबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

शनिवार 02 आँक्टोबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

शनिवार 2 ऑक्टोबर चंद रास कर्क 27:34 पर्यंत अंत व नंतर सिंह चंद्र नक्षत्र आश्लेषा 27:34 पर्यंत व नंतर तर  मघा.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश

वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

आज इंदिरा एकादशी असून एकादशी श्राद्धाचा दिवस आहे. 

मेष :–मुलांच्या शिक्षणासाठी अचानक मोठ्या खर्चाची सोय करावी लागेल. परदेशी असलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासाच्या विषयात चांगली प्रगती झाल्याचे जाणवेल. 

वृषभ :–आईच्या नावावर असलेल्या शेताबाबत विकण्याच्या चर्चा  सुरू होतील.  न्यायालयातील  कर्मचार्‍यांना  आपल्या कामात पारदर्शकता ठेवावी लागेल. 

मिथुन :– अचानक पगारातील मोठी रक्कम लहान भावंडाच्या घरासाठी द्यावी लागेल. आज तुम्हाला नोकरीबाबतच्या महत्वाच्या गोष्टी फोनवरून ठरवाव्यात लागतील. 

कर्क :–कुटुंबात पाहुण्यांचे आगमन झाल्याने कामाचा पसारा वाढेल. नवीन घराचे पझेशन मिळण्याचे मार्ग मोकळे होतील व मुले   आनंद  साजरा करतील. 

सिंह :–अनोळखी व्यक्तीच्या हस्तक्षेपाने कामातील अडथळा दूर होईल.  व्यवसायातील बँक अकाउंटमधे गडबड झाल्याचे निदर्शनास येईल. 

कन्या :–कुटुंबात अचानक  जवळची नातेवाईक मंडळी व शेजारी एकत्र  येऊन गेटटुगेदर होईल. तुमच्या प्रेमविवाहाच्या  गोष्टीना घरातून संमती मिळेल. 

तूळ :–आज तुम्हाला तुमचा फोन सांभाळावा लागेल हरवण्याचा धोका आहे. गर्भवती महिलांनी शारिरीक कष्ट फार होणार नाहीत याची काळजी घ्यावी. 

वृश्र्चिक :–व्यापार्यांना अचानक एखादा दंड वेळेत न भरल्यामुळे नोटीस येईल. वडीलांच्या प्रतिष्ठेमुळे कांही गोष्टी सोप्या होतील. 

धनु :– तरूण  मुलींना आपल्या घरगुती व्यवसायात नवीन गणिते बसवताना ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा लागेल. सूचक स्वप्नाचा अर्थ लावण्याचा ओढून ताणून प्रयत्न करू नका. 

मकर :– आजचा दिवस अतिशय कष्टाचा जाणार आहे. रोजच्याच कामातसुद्धा कष्ट वाढल्याचे जाणवेल. लहान मुलांना पडण्या  धडपडण्यापासून सांभाळा. 

कुंभ :–कामगार वर्गाने आपल्या  कौशल्याचा फायदा करून घेण्याचा आजचा दिवस आहे. चित्रकार व पेंटींग्ज  करणार्यांच्या कल्पनाशक्तीतून चाागले कला सादर होईल. 

मीन :–पूर्वी गुंतवलेल्या शेअर्समधून अचानक लाभ होत असल्याचे लक्षांत येईल. तरी चौकशी करावी. स्कीन डिसीजचा त्रास असलेल्यांनी दुर्लक्ष करू नये. 

|| शुभं-भवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *