Read in
शुक्रवार 1 ऑक्टोबर 2021 चे दैनिक राशिभविष्य
शुक्रवार 1 ऑक्टोबर चंद्र रास कर्क दिवस-रात्र व नंतरही कडकच आहे ये चंद्र नक्षत्र पुष्य 26 56 पर्यंत व नंतर अश्लेषा
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडलीनुसार कृष्णमुर्ती पद्धतीने नक्षत्र फलादेश देत आहे
दशमी श्राद्धाचा दिवस आहे
मेष:– आज नोकरीतील मागिल पगारातील राहिलेली रक्कम मिळण्याचे निरोप मिळतील. यातूनही अचानक लाभ होतील वडिलाबाबत काळजी वाढवणार्या घटना घडतील .
वृषभ:– व्यवसायातील ज्या गोष्टीच्या परवानगी साठी प्रयत्न करत आहात ती परवानगी लवकरच मिळणार आहे. तुम्हाला एखाद्या पुस्तक प्रकाशनाला हजर राहण्याची संधी मिळेल.
मिथुन:– राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यां वर एखादा फौजदारी खटला भरला जाण्याचा धोका आहे. तरी जपून राहावे लागेल. अंधश्रद्धेच्या विचाराने उगाच आज साप साप म्हणून भूई धोपटू नका.
कर्क :– बऱ्याच दिवसापासून मनातील रेंगाळलेल्या विचारांना मोकळी वाट करून देणे आज तुम्हाला कामाच्या लिस्टमधील कोणते काम महत्वाचे तुम्हाला ठरवावे लागेल.
सिंह :– मित्राच्या कामासाठी पोलीस टेशनला जाण्याचा योग येईल व्यवसायात झालेल्या दिवाळखोरी बाबत बँकेचे कर्ज घेणे हाच शेवटचा उपाय आहे हे लक्षात येईल.
कन्या :– शिक्षणाच्या बाबतीत जराही हलगर्जीपणा न केल्याने मिळालेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होईल. सार्वजनिक क्षेत्रातील अंतर्गत निवडणुकीला उभे राहण्याची तीव्र इच्छा निर्माण होईल होईल.
तूळ :– प्रथम संततीच्या या जुन्या आजारपणावर योग्य तो डॉक्टरी उपाय सापडेल. वयस्कर मंडळीना अचानक राजकीय मंडळींनी विषयी प्रेम वाटू लागेल.
वृश्चिक:– कुटुंबामध्ये ज्येष्ठांच्या सल्ल्याने कुळधर्म म्हणून पूजा करण्याचे ठरेल. हातात घेतलेल्या कामात दिरंगाई केल्यास काम हातातून निसटून जाईल.
धनु:– ज्योतिष शास्त्राचा गूढ अभ्यास करणाऱ्याना अतिशय योग्य अशा शिक्षकाची किंवा गुरुची भेट होईल. ज्यांना द्वितीय संतती ची अपेक्षा आहे त्यांना गोड बातमी कळेल.
मकर :– कॉलेजमधील प्रवेशाबाबत मनातील द्विधा परिस्थितीतून बाहेर पडण्या करिता ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा . कफ प्रवृत्तीच्या मंडळीने थंड पाणी पिणे टाळावे.
कुंभ:– जुन्या आजारावर उपचारासाठी आयुर्वेदिक औषधांची मदत घ्यावी लागेल. तरुणांना अचानक अपचनाचा व ऍसिडिटीचा त्रास होईल.
मीन:– नेमबाजी शिकणाऱ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी दुसऱ्या ठिकाणे जाण्याची संधी मिळेल. स्टेशनरीच्या दुकानदारांना अचानक मोठे नुकसान सोसावे लागेल.
|| शुभं-भवतु ||