daily horoscope

गुरूवार 30 सप्टेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

गुरूवार 30  सप्टेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

गुरूवार 30  सप्टेंबर चंद्ररास मिथुन 19:03 पर्यंत व नंतर कर्क. चंद्रनक्षत्र पुनर्वसु 25 :32 पर्यंत व नंतर पुष्य.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश

वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

अविधवा नवमी. नवमी श्राद्धाचा दिवस.

मेष :– घराच्या जागेत किंवा अंतर्गत सजावटीत करायचा बदल आज नक्की ठरवाल. पोस्ट आणि टेलिफोन खात्यात काम करणाऱ्यांनी कोणतेही आर्थिक व्यवहार करताना अतिशय जपून करावेत. 

वृषभ:– हातातील रक्कम परतफेडीसाठी वापरणार आहात हे नक्की ठरवाल व त्याप्रमाणे वागालही.. गायक मंडळीना घसा दुखण्याचा त्रास होईल. महिलांना डाव्या डोळ्याची काळजी घ्यावी लागेल. 

मिथुन:– काहीही न करता आराम करण्याचा दिवस आहे. मनातील छंद किंवा आवडीच्या गोष्टी करण्याचा आजचा दिवस आहे. आज तुम्ही तुमची विचार करण्याची पद्धत बदललीत तर मानसिक ताण कमी होईल. 

कर्क:– शेजाऱ्यांच्या मदतीने कुटुंबातील आजारी व्यक्तीस दवाखान्यात अँडमिट करण्यासाठी घेऊन जाल. प्रकृती अस्वास्थ्य वाटल्याने नोकरीच्या ठिकाणाहून लवकर घरी परत याल. 

सिंह:– नवीन घर किंवा शेत जमीन घेण्याची इच्छा असलेल्यांनी अचानक ड कोणावरही विश्वास ठेवून व्यवहार ठरवू नयेत.  न्यायालयात वकिलानी  कागदपत्रे अतिशय काळजीपूर्वक तपासावी. 

कन्या:– संततीकडून आज मानसन्मान मिळणाऱ्या गोष्टी घडतील महिलांना त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल सत्काराचा निरोप येईल व आजचा दिवस आनंदात जाईल. 

तूळ:– नोकरदारांना आज प्रमोशन च्या बाबतीतच्या चर्चेत भाग घ्यावा लागेल. बदली बाबतच्या तुमच्या मनातील असलेल्या गोंधळलेल्या विचारांना ज्येष्ठांच्या सल्याने मार्गस्थ करा. 

वृश्चिक:– सायटिकाचा त्रास असलेल्यांनी आता लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वयस्कर व  तरुण मंडळींनी  धोक्याची सूचना समजून घ्यावी व दुर्लक्ष करू नये. 

धनु:– पायाचा त्रास अंगावर न काढता योग्य तो उपाय तातडीने करावा नोकरीतील तुमच्यावर असलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी दिरंगाई न केल्याबद्दल वरिष्ठांकडून कौतुक होईल. 

मकर:– आज तरुण वयस्कर सर्वच मंडळीनी पाणी पिताना शांतपणाने प्यावे ठसका लागण्याचा धोका आहे. घरातील जुन्या वस्तू मध्ये हरवलेली मौल्यवान वस्तू सापडेल. घराची किंवा गाडीची किल्ली जागेवर सापडणार नाही शोधावी लागेल. 

कुंभ:– अवघड वाटणाऱ्या गोष्टीही आज अतिशय सहजपणे व सोप्या पद्धतीने करता येणार आहेत. विद्यार्थ्यांना अवघड विषय सहजपणे आकलन झाल्याचे जाणवेल. 

मीन:– कुटुंबात आज एखाद्या धार्मिक पूजेचे नियोजन होईल. तरुणांना पाठ दुखीचा व पाय दुखीचा त्रास जाणवेल. तळे किंवा पाण्याच्या ठिकाणचे व्यवहार काळजीपूर्वक  करा.

||शुभं-भवतु ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *