daily horoscope

बुधवार 29 सप्टेंबर 2021 चे दैनिक राशिभविष्य

Read in

बुधवार 29 सप्टेंबर 2021 चे दैनिक राशिभविष्य

बुधवार 29 सप्टेंबर चंद्र रास मिथुन दिवस-रात्र, नक्षत्र आर्द्रा 23 :24 पर्यंत व नंतर पुनर्वसु.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश

वरील राशीचा व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

आज कालाष्टमी असून अष्टमी श्राद्धाचा दिवस आहे.

मेष :– आज बऱ्याच दिवसापासून मनात असलेले एखादे धाडसाचे काम करायला हरकत नाही. योग्य नियोजनाने आज सुरुवात केलेले काम खात्रीने वेळेत पूर्ण होईल. भावंडाच्या मदतीने केल्यास जराही चूक राहणार नाही आईच्या प्रकृतीची चौकशी करावी लागेल.

वृषभ :–हातातील पैशाला बऱ्याच वाटा फुटतील. खर्च करायचा नाही असे ठरवूनही आज हमखास खर्च होईल नको त्या गोष्टी विकत घेण्याचा मोह आवरणार नाही वडिलांकडील नातेवाईक घरी भेटीसाठी येतील.

मिथुन :–आज सर्व काही तुमच्या मनासारखे होणार आहे कोणत्याही गोष्टीत आज हात घातलात तरी यशस्वी व्हाल. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित केले असेल तर आज त्यावर शिक्का मोर्तब करावे अवघड विषयासाठी वेगळी शिकवणे लावण्याची गरज असेल.

कर्क:–  आजचा दिवस तुमचा इतरांची काळजी करण्याचा दिवस आहे जे आजारी नाहीत त्यांचीही तुम्ही काळजी करणार आहात प्रवासात आपल्या महत्वाच्या सामानाची काळजी घ्यावी लागेल. 

सिंह:– मित्र-मैत्रिणींच्या नादाने मोठ्या कामाची सुरुवात कराल. आई वडील व भावंडांबरोबर आजचा दिवस अतिशय आनंदात जाईल लोकांना दिलेले पैसे उसने पैसे परत मिळतील. 

कन्या: व्यवसाय उद्योगातील  क्लिष्ट कामे सोडवताना सासुरवाडीच्या व  महिलांनी सासरच्या ज्येष्ठ मंडळींची मदत घ्यावी अचानक नवीन धाडसाने सुरुवात करू नये. 

तूळ:– आज भेटणारी व्यक्ती जुनी कोणीतरी ओळखीची आहे असे वाटेल मित्रांच्या मदतीसाठी पोलीस स्टेशनला ओळख काढावी लागेल बँकेचे व्यवहार इतर कोणाच्याही हातात देऊ नका. 

वृश्चिक:– मित्रमंडळींबरोबर आजचा दिवस आनंदाचा व मौजमजेचा जाईल. लहानसा घडणारा प्रवास आनंददायी राहील खाण्यापिण्याची रेलचेल होऊ मनाला समाधान मिळेल. 

धनु:– नोकरीत जुने राहिलेले काम हातात घेऊन लवकर संपवण्याची इच्छा निर्माण होईल काटकसरीने जमवलेले पैसे आवडत्या नात्यासाठी खर्च करण्यात आनंद वाटेल प्रकृती एकदम ठणठणीत असल्याचे जाणवेल. 

मकर:– आई-वडिलांबरोबर आजचा दिवस जुन्या आठवणींवर चर्चा करण्यात जाईल शेजारील मंडळींसाठी खर्च कराल खरेदीचा विषय आज टाळावा हे चांगले. 

कुभ :– महिलांना आज डोकेदुखीचा त्रास कमी झाल्याचे जाणवेल मुला आवडते पदार्थ करण्यात करण्याचे कष्ट वाटणार नाहीत आजी आजोबा यांच्याबरोबर आजचा दिवस अतिशय आनंदात जाईल. 

मीन:– आजच्या दिवसाच्या प्रवासातील आठवणी अविस्मरणीय ठरतील नोकरीत वरिष्ठांच्या आदेशानुसार कामात केलेला बदल हा कौतुकाचा विषय ठरेल पुरुष मंडळींना आजचा दिवस सन्मान व सत्काराचा राहील. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *