Read in
मंगळवार 28 सप्टेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य
मंगळवार 28 सप्टेंबर चंद्ररास वृषभ 07:13 पर्यंत व नंतर मिथुन. चंद्रनक्षत्र मृगशीर्ष 20:42 पर्यंत व नंतर आर्द्रा.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
वरील राशीचा व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
सप्तमी श्राद्धाचा दिवस.
गजगौरी व्रत (हादगा – भोंडला).
मेष :–वजन कमी करण्याच्या नादाने कमी खाणार्यांना अचानक त्रास होऊ लागेल. कोणाशीही स्पर्धा करण्याचे मनातही आणू नका..व्यवसायातील त्रुटी भरून काढण्यासाठी प्रयत्नशील रहाल.
वृषभ :– कुटुंबातील मंडळींसाठी वेळ काढावा लागेल. लहान मुलांबरोबर न खेळल्याने मुलांची चिडचिड वाढेल.नोकरीतील कामाचा व्याप वाढणार आहे.
मिथुन :–आज तुम्हाला शारिरीक व मानसिक ताण सोसणार नाही. तरी स्वत:विषयीची काळजी घ्या. शैक्षणिक क्षेत्रातील मंडळीना रिसोर्स पर्सन म्हणून निवडले जाईल.
कर्क :–आज कोणत्याही प्रकारची खरेदी करण्याचे टाळा कारण आजच्या नंतर पैसे खर्च होण्याचे स्पीड कमी न होता अचानक वाढेल. अचानक निर्णय घेऊ नका.
सिंह :–जवळचे नातेवाईक तुमच्या प्रेमाखातर खूप कष्ट घेतील. पाळीव प्राण्याच्या बाबतीत जागरूक रहावे लागेल. बोलताना संयम राखण्याची गरज आहे.
कन्या :– नोकरीतील पेंडींग कामाना आज सुरूवात कराल तर लवकर कामाचा निचरा होईल. घरामधील वातावरण अतिशय आनंदाचे व प्रसन्न राहील.
तूळ :–आर्थिक बाबतीत तुमचे स्वत:चे विचारच महत्वाचे ठरतील. कलाकारांनी आपल्या कलागुणांना वाव कसा मिळेल याचा विचार करूनच उडी मारावी.
वृश्र्चिक :– सार्वजनिक क्षेत्रात स्वत:ची ओळख तयार करण्याकडे विशेष कल राहील. आरोग्याच्या दृष्टीने तरूणांना अतिशय चोखंदळ रहावे लागेल.
धनु :–कोणाचे म्हणणे खरे आहे हे तुम्हाला ठरवणे अवघड जाणार आहे. प्रमोशनच्या बाबतीत स्वत : हून तुमचे मत व्यक्त करू नका.
मकर :– नियमबाह्य केलेल्या कामामुळे तुम्ही अडचणीत येण्याचा धोखा आहे. पत्रकार मंडळीनी बातमीतील खरे खोटेपणा तपासून घ्यावा.
कुंभ :– लहान मुलांच्या डाव्या डोळ्याला आज दुपारनंतर दुखापत होण्याची घटना घडेल. लहानशा गोष्टीवरून कुटुंबातील वादविवाद वाढतील.
मीन :–कुटुंबियांना तुमच्याविषयी अतीव प्रेम निर्माण होईल. तसेच कामाच्या ठिकाणीही तुमचा आदर वाढल्याचे लक्षांत येईल.