daily horoscope

भाद्रपद कृष्ण पक्षातील पितृपक्ष व श्राद्धाचा संबंध

Read in

मंगळवार 21 सप्टेंबर ते बुधवार 06 आँक्टोबर 2021.

भाद्रपद कृष्ण पक्षातील पितृपक्ष श्राद्धाचा संबंध

ज्योतिषशास्राप्रमाणे  “ ज्या दिवशी सूर्य कन्या राशीला जातो त्या दिवसापासून पितर पितृलोकांतून पृथ्वीलोकात येतात  त्याच  पितृपक्षात आपल्याला त्यांना संतुष्ट करण्यासाठी श्राद्ध करता येते. ‘’ आपले पूर्वज ज्या तिथीला गेले आहेत त्याच तिथीला श्राद्ध केले असता ते  संतुष्ट होऊन आशिर्वाद देऊन जातात. वर्षभरात कोणत्याही महिन्यात कोणत्याही तिथीला गेलेल्या व्यक्तीचे श्राद्ध या पितृपक्षातील त्याच तिथीला करावयाचे असते त्यामुळे पितृलोकांतून आलेले पितर संतुष्ट होऊन त्यांच्याकडून श्राद्ध करणार्याला उत्तम आशिर्वादाची प्राप्ती होते. श्राद्धाच्या महिन्यात मृतात्मे त्यांच्या वंशातील व्यक्तीनी अर्पण केलेल्या अन्नपदार्थ जलाचे ग्रहण करून संतुष्ट होतात. ज्या क्षणी हे सूक्ष्म आत्मे संतुष्ट होतात त्यावेळी हे आत्मे मुक्त होऊन त्यांना अमरत्व प्राप्त होते. त्यामुळे तुम्ही तुमच्या मनापासून श्रद्धेने  केलेले कार्य महान ठरते तुम्हाला आशिर्वाद मिळतात. आपल्या शास्त्रात असे सांगितले आहे की, “ पितृपक्षातील मृत्युतिथीला जो पिंडदानाने श्राद्ध करतो त्याला ऐहिक, भौतिक पारिवारिक सर्वच सुखे प्राप्त होतात. सर्व प्रकारचे सुख, वंशवृद्धी यश यांच्यात कधीही कमतरता येत नाही. ”

परंतु हे श्राद्ध   करण्याने अतृप्त आत्म्याकडून शाप मात्र मिळतात असे बर्याच कुंडल्या पाहताना दिसून आले आहे.’’ 

बुधवार 29  सप्टेंबर तिथी अष्टमी. या पितृपक्षातील अष्टमीस माघ्यावर्ष श्राद्धाचा दिवस असे म्हंटले आहे. हें माघ्यावर्ष सप्तमी, अष्टमी, नवमी या तीन दिवशी करावयाचे असते. वर्षाऋतूंत होणारे हे माघ्यावर्ष म्हणजे त्रयोदशीश्राद्धच आहे असे मानले आहे. आषाढीपासून पांचव्या पक्षातील मधली अष्टमी गया म्हटली आहे. आणि त्रयोदशी गजच्छाया होय. म्हणून ही गजच्छाया पितृकर्मासाठी गयातुल्य फल देणारी आहे

गुरूवार 30 सप्टेंबर रोजी अविधवा नवमी आहे. या दिवशी सवाष्णपणी मृत्यु झालेल्या मातांच्या श्राद्धाचा दिवस आहे. याच दिवसाला अष्टका कींवा अन्वष्टका श्राद्ध असे म्हणतात. अन्वष्टक्य तसेच अष्टका  श्राद्धावर   पिण्डपितृयज्ञ आधारित आहे. यामधील विशिष्ट गोष्ट अशी आहे कीं, या श्राद्धात फक्त  ` स्रीपितरांनाच आवाहन केले जाते. या श्राद्धात दुधामधे तांदुळ शिजवून केलेल्या भाताचे पिण्ड बनवले जातात ते बनवताना त्यात काळे तीळ मिसळले जातात. पिण्ड म्हणजे शरीर. असे म्हंटले जाते कीं,प्रत्येक पिढीमधे जन्माला येणार्या बालकामधे  मातापित्याकडून दोघांच्याही शरिरातील गुणसूत्रे असतात. हीच गुणसुत्रे त्याच कुलातून उत्पन्न झालेल्या म्हणजेच श्राद्ध करणार्या व्यक्तीच्या अंगामधे असतात. व श्राद्धात अर्पण करणारे अन्नपदार्थ जल मागिल तिसर्‍या पिढीपर्यंत पोचते. म्हणूनचअन्वष्कासाठी नऊ पिंडांचे श्राद्ध केले जाते. पहिले पितृत्रयी नंतर मातृत्रयी व तिसरे मातामह त्रयी. पहिले पिता इत्यादिना   नंतर मातांना त्यानंतर मातामहाना द्यावे. भाद्रपदा तील अन्वष्टका पितृलोकात फार मोठी फलदायक आहे. सूर्य कन्येला असताना ( सध्या सूर्य कन्या राशीत दि. 16  सप्टेंबर पासून आहे.) या नवमीला सर्व मातांसाठी श्राद्ध करावे. ज्याची माता जीवंत आहे तरीही  सापत्नमातेसाठीही  हे पिंददान करता येते. या श्राद्धात प्रत्येक मातेचे नांव घेऊन करावयाचे आहे

पित्याच्या कुलांत मातेच्या कुलांत उत्पन्न झालेल्या ज्या स्त्रीया मृत असतील त्या सर्व मातांते  श्राद्ध करावे.

येथे सुवासिनीला भोजन देऊन यथाशक्ती  सौभाग्य अलंकार  देऊन मनापासून नमस्कार करावा. हा विधी स्री वा पुरूष या दोघांनाही करता येतो. तरी दोन्ही कुळातील मृत मातांसाठी  समस्त महिलांना जे शक्य आहे ते करावे संपुर्ण कुटुंबासाठी    त्यांच्याच नातवंडांसाठी  भरपूर आशिर्वाद घ्यावेत

देववाणी ज्योतिषालय

अनुराधा कोगेकर

27  सप्टेंबर 2021 

*******************************************************

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *