weekly-horoscope-2020

रविवार 26 सप्टेंबर 2021 ते शनिवार 02 आँक्टोबर 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य.

Read in

रविवार 26 सप्टेंबर 2021 ते शनिवार 02 आँक्टोबर 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य.

रविवार चंद्ररास वृषभ दिवस-रात्र व नंतर वृषभ आहे वृषभ रास आहे चंद्र नक्षत्र कृतिका 14:31 पर्यंत  27 सोमवार चंद्ररास वृषभ दिवस-रात्र व नंतरही वृषभ आहे. चंद्र नक्षत्र रोहिणी 17:40 पर्यंत व नंतर मृगशीर्ष.

weekly-horoscope-2020

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

रविवार चंद्ररास वृषभ दिवस-रात्र व नंतर वृषभ आहे वृषभ रास आहे चंद्र नक्षत्र कृतिका 14:31 पर्यंत  27 सोमवार चंद्ररास वृषभ दिवस-रात्र व नंतरही वृषभ आहे. चंद्र नक्षत्र रोहिणी 17:40 पर्यंत व नंतर मृगशीर्ष. 28 मंगळवार चंद्रदास वृषभ 07:13  पर्यंत व नंतर मिथुन, चंद्र नक्षत्र मृगशीर्ष 20:40 पर्यंत व नंतर आर्द्रा. 29 बुधवार चंद्र रास मिथुन दिवस-रात्र व चंद्र नक्षत्र आर्द्रा 23:24  पर्यंत व नंतर पुनर्वसु. 30 गुरुवार चंद्र रास मिथुन 19 :03 पर्यंत व नंतर कर्क. चंद्रनक्षत्र पुनर्वसु 25:32 पर्यंत व नंतर पुष्य. . 1 ऑक्टोबर शुक्रवार चंद्ररास कर्क दिवस-रात्र व नंतरही कर्क रासच आहे. चंद्रनक्षत्र पुष्य 26: 56 व नंतर आश्लेषा आहे. 2 ऑक्टोबर शनिवार चंद्र रास कर्क 27: 34 पर्यंत व नंतर सिंह असून चंद्रनक्षत्र आश्लेषा 27: 34 पर्यंत व  नंतर मघा आहे. 

वरील प्रत्येक दिवसाच्या राशी नक्षत्रानुसार व रोजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे. 

रविवार षष्ठी श्राद्धाचा दिवस आहे. 

मंगळवार सप्तमी श्राद्धाचा दिवस आहे. याच दिवशी गजगौरी व्रत म्हणजे हादगा  आहे. 

बुधवार कालाष्टमी असून मध्याष्टमी श्राद्धाचा दिवस आहे. 

गुरुवार अविधवा नवमी व नवमी श्राद्धाचा दिवस आहे. 

शुक्रवार दशमी श्राद्धाचा दिवस आहे. 

शनिवार इंदिरा एकादशी, एकादशी श्राद्धाचा दिवस आहे. 

मेष :– मनापासून केलेल्या संकल्पानुसार कामाला सुरुवात कराल. हा सप्ताह तुमच्यासाठी इच्छा, धाडस आणि पराक्रम यासाठी तुम्हाला चांगला आहे. नवीन धाडसासाठी वडील भावंडाचा सल्ला घ्या. संपादक, पत्रकार लोकांनी प्रक्षोभक लिखाणासाठी लोकांच्या रागाला सामोरे जावे लागेल. एखाद्या अफवेला तुम्हाला जबाबदार धरण्यात येण्याची दाट शक्यता आहे. हार्ट पेशंट असलेल्यानी योग्य ती काळजी घ्यावी व दुर्लक्ष करू नये हातापायाची बोटे बधीर झाल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क करावा. विद्यार्थ्यांचे सुंदर हस्ताक्षरासाठी कौतुक होईल. 

वृषभ:– आता मनातील इच्छा माराव्या लागणार नाहीत कोणतीही गोष्ट करताना फक्त नियोजनाचे आवश्यकता आहे. सेमिनार असो वा   वेबिनार असो बोलताना भान ठेवावे लागेल. महिलांना चेहऱ्याचे सौंदर्य टिकवण्याची ओढ निर्माण होईल. मुलांच्या शिक्षणासाठी व  घरासाठी  मिळणारे कर्जाची सोय मंजुरी होत असल्याचे  बँकेकडून कळवले जाईल. लेखकांच्या चाहत्यांकडून लेखकाच्या नवीन नवीन लेखनाबद्दल अतिशय कौतुक होईल सामाजिक आशयाच्या लेखनावर प्रचंड टिका होईल. 

मिथुन:– राजकीय क्षेत्रातील मंडळीनी त्यांच्या बोलण्याने कोणताही संघर्ष निर्माण होणार नाही याची दखल घ्यावी. नोकरदारानी हातातील आवक व खर्च यांचा विचार करावा. हॉस्पिटल्स मधील नोकरदारांना जीव  ओतून काम करावे लागेल. पुरुष व महिला दोघानाही सरकारी कामातील त्यांच्या शिस्तबद्ध कामाबद्दल कौतुक केले जाईल. कुटुंबातील ज्येष्ठांच्या प्रकृतीकडे लक्ष देताना तुम्हालाही काही प्रमाणात आजारपण येण्याची आहे शक्यता आहे. संततीच्या मागण्या पुरवण्या पूर्वी पैशाचा वापर कसा होणार आहे याची खात्री करून घ्या. 

कर्क:– ज्यांना दत्तक संततीचा लाभ घ्यावयाचा आहे त्याने या सप्ताहात विचार करायला हरकत नाही. नव्याने घर घेत असाल किंवा भाड्याने घेत असाल तरीही उंचावरील मजल्यावरील जागा तुम्हाला मिळणार आहे. तीव्र इच्छाशक्ती मुळे व अंत: प्रेरणेने कामे मार्गी लावाल. फौजदारी केसेस चालवणाऱ्या वकिलांना न्यायालयातील कामकाजात अचानक अडचणी निर्माण होतील तरी त्याने त्या दृष्टीने विशेष काळजी घ्यावी. हरवलेल्या वस्तूंची ओळख पटवल्या शिवाय तुम्हाला ती वस्तू ताब्यात मिळणार नाही.  त्यामुळे ओळखीने काम करण्याचा प्रयत्न करू नका. 

 सिंह:– सरकारी नोकरीतील उच्च अधिकाऱ्यांना कर्तव्य बजावताना जराही कसूर करून चालणार नाही. अचानक बदलीचे धोके निर्माण होतील. वडिलांच्या बाबतीतील बोनस आयुष्याचा विचार अतिशय चिकित्सक वृत्तीने करावा. कोणत्याही दुखण्यांकडे, आजारपणाकडे केलेले दुर्लक्ष त्रासदायक राहील. लहान मुलांच्या डोळ्याबाबत काळजी घ्या टोकदार वस्तूने जखम होण्याचा योग दिसतो. गुडघ्याचे ऑपरेशन झालेल्या ने अति आत्मविश्वासाने चालण्याचे प्रयोग करू नयेत. वडील भावंडांकडून अचानक धनलाभ होईल. 

कन्या:– उच्च शिक्षणाचे शिक्षण घेणाऱ्या तरुणांना मानसिक द्विधा मनस्थिती होईल. नोकरी करून शिकणाऱ्यानी शिक्षणा इतकेच नोकरीला महत्त्व द्यावे लागेल. मनामध्ये येणारी भीती खरी ठरेल संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्यांना उत्तम संधी प्राप्त होईल. आर्थिक चणचण असलेल्यांना नवीन नोकरीची संधी प्राप्त होईल. मागील येणे वसूल होऊन धनलाभ होईल. पूर्णतः आशा सोडलेल्या निराश झालेल्या ना त्यांच्या पूर्व पुण्याईने किंवा गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने नवीन संधी मिळेल व आयुष्य पुन्हा मार्गावर सुरू होईल.  

तूळ :–अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांना कडून तुम्हाला आवश्यक असणारे मार्गदर्शन मिळेल धार्मिक गोष्टींचे लेखन करणारे संत पुरुषांचे व महिलांचे कार्याचे वर्णनात्मक लेखन  लिहिणाऱ्यांचे सामाजिक स्तरावर खूपच कौतुक होईल. तीर्थक्षेत्री राहणाऱ्याना अति विलक्षण असा अध्यात्मिक अनुभव येईल. मूर्तिकार शिल्पकार व चित्रकार यांना ज्यांच्या निवृत्त नोकरदारांना त्यांचे प्रॉव्हिडंट फंड व पेन्शनचे काम लवकरच होणार असल्याचे कळवले. जाईल. बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांनी डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्यावा. 

वृश्चिक:– गर्भवती महिला तसेच गर्भाशय काढलेल्या महिलांनी त्याबाबतचा कोणताही त्रास दुर्लक्षित करू नये. गर्भवती महिलानी कोणत्याही प्रकारची दगदग करू नये. दिव्यांग असलेल्यांनी स्वतःच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी. जुन्या घराचे छत अचानक पडण्याचा धोका आहे. मोडकळीस आलेल्या पंख्याखाली झोपण्याचे धाडस करू नका. तसेच पाण्याच्या ठिकाणी गेल्यास विशेष काळजी घ्या अंतर्मनाने अचानक भविष्यकालीन गोष्टींची कल्पना येईल तरी त्याचा विचार करा. 

धनु :–न्यायालयातील वारसा हक्काच्या चाललेल्या केसमध्ये अचानक तुमच्या बाजूचे साक्षीदार घुमजाव करतील. कामगार वर्गांचे प्रश्न हाताळणाऱ्या वकिल महाशयांनी केसमधील खटल्यातील बारकाव्यांचा अभ्यास केल्यामुळे वकिलांचे महत्त्व वाढेल. मुठभर ज्ञान असलेल्यानी आत्मप्रौढी  मिरवू नये. वयस्कर मंडळीने तरुणांना न सांगता केलेला आर्थिक व्यवहार नुकसानीस कारणीभूत होईल. कोणत्याही कागदपत्रावर वाचल्याशिवाय सही करू नये. तरुणाने आपल्या विचारात सुधारणा केल्यामुळे  झालेला फायदा आश्चर्यकारक राहील. 

मकर:– मित्र मैत्रिणी मधील प्रेमात प्रेमाच्या व्यवहारात पारदर्शकता  ठेवल्यास व्यवहार स्वच्छपणे पुढे सरकतील. आई-वडिलांच्या जुन्या घराविषयी त्यांना न सांगता विक्रीच्या मोहात पडू नका. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठां बरोबर चर्चा करताना व तुमचे म्हणणे मांडताना आत्मविश्वासाने मांडाल. वरील या सप्ताहात तुम्ही आपल्या मर्यादा व क्षमता ओळखून अतिशय संयमाने वागाल व वरिष्ठांना जिंकला. महिलांनी तसेच तरुण मुलांनी आपल्या उतावळ्या स्वभावावर संयम ठेवावा राजकीय मंडळीनी दिलेल्या आश्वासनावर अवलंबून राहू नका.

 कुंभ:– तुमच्या मनाच्या अचानक पणे बदलणार्या अवस्थेचे कारण समजण्यासाठी शांतचित्ताने विचार करा. तुमच्या स्वभावातील हिशोबीपणे पुढे अव्यवहारीपणा चालणार नाही. बुद्धीला पटल्याशिवाय कोणतेही काम करू नका. व्यावसायिकानी आपल्या योजना योग्य प्रकारे आखल्यास भविष्यकालात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. तरुणानी सामाजिक पातळीवर आपली पतप्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न करावा. कोणत्याही प्रकारच्या वादात सहभागी होऊ नये. झाल्यास  आत्मविश्वासाने म्हणणे मांडा पण संपूर्ण विचाराशिवाय  मत व्यक्त करू नका. 

मीन :–घर बदलण्याचा किंवा घराचे नूतनीकरण करण्याचा बेत पुढे ढकलाल . राजकीय मंडळींनी कोणत्याही प्रकारची आश्वासने देऊ नयेत. तरुणानी विशेषतः नोकरीत रागावर नियंत्रण ठेवावे.  या सप्ताहात वरिष्ठांबरोबर वाद होण्याची शक्यता आहे. पौगंडावस्थेतील मुलांचे खोटे बोलण्याचे धाडस वाढेल. महिलांच्या दुसऱ्यास मदत करण्याच्या वृत्तीमुळे  महिलांविषयी आदर वाढेल. वयस्कर महिलांना दुसऱ्यांच्या मनातील गोष्टी ओळखता आल्याने  कुटुंबातील सदस्य अचंबित होतील. अचानक मनात आलेल्या गोष्टींना महत्त्व देऊन सुरू असलेल्या हातातील कामाकडे दुर्लक्ष कराल. 

|| शुभं-भवतु||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *