daily horoscope

सोमवार 27 सप्टेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

सोमवार  27  सप्टेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

सोमवार 27  सप्टेंबर चंद्ररास वृषभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र रोहिणी 17 40 पर्यंत व नंतर मृगशीर्ष.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश

वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

रविचा हस्त नक्षत्रात प्रवेश  06:41. वाहन घोडा.

मेष :–पूर्वी तुमच्यावर रूसलेले नातेसंबंध पुन: जुळून येण्याचे योग आहेत व त्याची सुरूवात आजपासून होईल. मुलांच्या  शाळा प्रवेशासाठी ज्येष्ठांचा सल्ला उपयोगी पडेल.

वृषभ :– राजकीय क्षेत्रातील मातब्बर मंडळीना अचानक वरीष्ठांचा वरदहस्त लाभेल. व्यवसायातील प्रलंबित कामे  मार्गी लावण्याचा उपाय सापडेल.

मिथुन :–डाँक्टर व वैद्य मंडळीना आपल्या कामाची पोचपावती मिळेल व आनंद होईल. अचानक भावनिक प्रश्र्नात अडकण्याचे  संकेत मिळतील.

कर्क :–व्यवसायातील अडचणींवर सापडलेला उपाय लागू पडत असल्याचे जाणवेल. कुटुंबातील परस्परातील गैरसमज  तुमच्या प्रयत्नाने दूर  होतील. 

सिंह :–मैत्रीच्या नात्यातील दूरावा दूर झाल्याने मानसिक ताण कमी होईल.. बँकेच्या कर्ज प्रकरणातील अडचणीत भावंडाची मदत मिळेल. 

कन्या :–मानसिक ताणतणावावर मिळालेला उपाय लागू पडत  असल्याचे जाणवेल. अधिकारी वर्गाने आपला राग ताबडतोप  व्यक्त करू नये. 

तूळ :–वैवाहिक जीवनातील झालेला वाद संपुष्टात येऊन दिलजमाई होईल. व्यवसायातही तुमच्या योजना भागिदाराला  पटवून देण्यात यशस्वी व्हाल. 

वृश्र्चिक :–नोकरदारानी एकदा केलेल्या चुका पुन: पुन: करू नयेत. ज्येष्ठांनी तरूणांवर आपले मत न लादता पटवून देण्याचा प्रयत्न करावा. 

धनु :–तुमच्या स्वत:च्या हिमतीने यश मिळवणे शक्य होणार आहे. आत्ता या क्षणाला कोणाचीही मदत घेऊ नका. आत्मविश्वासाने कामाला लागा. 

मकर :–व्यवसायातील तुमच्या योग्य नियोजनामुळे  अडचणीचे प्रसंग फारसे जाणवणार नाहीत. हातातील यशाचा आनंद घ्या व पुढचा विचार नंतर करा. 

कुंभ :–शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा आता विचार करायला हरकत नाही. कुटुंबात आजी आजोबांना आनंद व समाधान मिळणार्‍या घटना घडतील. 

मीन :–राजकीय चर्चेमधील तुमचा सहभाग फारच महत्वाचा ठरेल. इतरांच्या मतांचा विचार करूनच निर्णय घेतल्यास तो सुखावह राहील व तुमचेही क्रेडिट वाढेल. 

||शुभं-भवतु ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *