Read in
शनिवार 25 सप्टेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य.
शनिवार 25 सप्टेंबर चंद्ररास मेष 18:15 पर्यंत व नंतर वृषभ. चंद्रनक्षत्र भरणी 11 :32 पर्यंत व नंतर कृतिका.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
पंचमी श्राद्धाचा दिवस आहे.
मेष :–नोकरी, धंद्यात तुमच्या मताचा आदर केला जाईल व महत्त्वही मिळेल. तुमच्या अंगी असलेल्या नेतृत्व गुणाला चांगला वाव मिळणार आहे.
वृषभ :–तुमच्या कडील कलागुणांना आज खूपच महत्व मिळेल व कौतुकही होईल. मनात दडलेल्या इच्छा, अपेक्षांना पूर्ण करण्याचे मार्ग सापडतील.
मिथुन :–शेजारच्यांसाठी अगदी जिवाचे रान करून मदत कराल. पतीपत्नीच्या व्यवसायात अचानक वृद्धी होणारे प्रसंग येतील व व्यवसाय दुपटीने चालणार असल्याचे संकेत मिळतील.
कर्क :–कोणत्याही कामाची तयारी करताना बिनचुक करावी लागेल नाहीतर इतरांकडून तुमचे हसू होईल. वयस्कर मंडळीना गुडघ्याच्या दुखण्यातून बरे होत असल्याचे जाणवेल.
सिंह :–संत पुरूषांची भेट होऊन चार उपदेशाचे धडे मिळणार आहेत. वयस्कर मंडळीना तिर्थ क्षेत्री जाण्याची ओढ लागेल. तुमच्या मनातील आनंदाच्या गोष्टी तुम्हाला इतरांना कधी सांगतो याची घाई होईल.
कन्या :–व्यवसायातील कर्जमुक्तीसाठी महिला आपल्या स्वकष्टार्जित धनाचा मनापासून वापर करण्यास तयार होतील. इंजिनीयर मंडळीना नवीन खाजगी कामासाठी विचारले जाईल.
तूळ :–तरूणांना विवाहाची बोलणी कधी होतील याची घाई लागेल. घरातील तुमच्या बाबतीतील गुप्त गोष्टींवरील चर्चा अती ताणली जाईल.
वृश्र्चिक :– आज दुपारनंतर एखादी दु:खद बातमी कानावर येईल. आईच्या प्रकृतीची काळजी मोठे रूप घेईल. घरगुती व्यवसायात आज नवीन भांडवल गुंतवाल.
धनु :–तुमच्यावर सोपवलेली रोजची कामे रोजच्या रोज मार्गी न लावल्याने नुकसान झाल्याचे जाणवेल. मुलांच्या आवडी निवडीत आपोआपच सकारात्मक बदल होईल.
मकर :–ज्यांच्या उजव्या गुडघ्याचा आँपरेशन करावयाचे आहे त्यांनी आज योग्य निर्णय घ्यावा. . निद्रानाश असलेल्यांना आज खूप शांतपणे झोप लागणार आहे.
कुंभ :–स्टेशनरीच्या दुकानदारांना अचानक आपली खात्रीची गिर्हाइके कमी झाल्याचे जाणवेल. घरगुती उद्योगासाठी राहत्या घराचा वापर करावा लागेल.
मीन :– घरी जवळच्या किंवा सासुरवाडीच्या मंडळींचे येणे होईल. लहान मुलांच्या समोर कौटुंबिक समस्यांची चर्चा करू नका. कुटुंबात अचानक आनंदाचे वातावरण राहील.
|| शुभं-भवतु ||