Read in
शुक्रवार 24 सप्टेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य
शुक्रवार 24 सप्टेंबर चंद्ररास मेष दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अश्र्विनी 08:53 पर्यंत व नंतर भरणी.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज संकष्ट चतुर्थी असून चंद्रोदय 20:48 चा आहे. (मुंबई)
चतुर्थी श्राद्ध व भरणी श्राद्धाचा दिवस आहे.
मेष :–तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात कार्यरत असाल तेथील कामाबाबतचा तुमचा उत्साह वाढेल. इतरांचा हस्तक्षेपही कमी होईल. राजकीय क्षेत्रातील मंडळीना आज विरोधक फारसा त्रास देणार नाहीत.
वृषभ :–पुन: पुन: मागिल गोष्टींचा विचार करत बसलात तर हातातील कामावर नकारात्मक परिणाम होणार आहे. प्रकृतीची ही विशेष काळजी घ्यावी लागेल.
मिथुन :–आजपर्यंत ज्या कामात तुम्ही धाडस दाखवले आहे तेथे यशाचा मार्ग सुरू होईल. आर्थिक कामकाजात पारदर्शकपणा ठेवल्यास कोणतीच अडचण उद्भवणार नाही.
कर्क :–व्यवसाय उद्योगधंद्यात कोणावरही विसंबून राहू का. राजकारण व त्यातील अधिकाराबाबत अतिशय जागरूक रहा. आईवडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
सिंह :–हातातील कामाला महत्व देऊन त्यानुसार विचार करावा व कामाचे नियोजन करा. कामात होणारी दगदग, कष्ट हे वाया न जाता उलट लाभाचे आकडे वाढणार आहेत.
कन्या :–आर्थिक बाबतीत काटेकोर राहिल्यास नुकसान होणार नाही. कोणत्याही प्रकारची लाँटरी किंवा कोणत्याही शेअर्समध्ये आज पैसे गुंतवू नका.
तूळ :–इतरांच्या कामात जराही हस्तक्षेप करू नका. व्यवसायातील त्रूटी वर लक्ष केंद्रीत करा. आर्थिक नोंदी ठेवताना कोणत्याही प्रकारची घाई करून काम उरकू नका.
वृश्र्चिक :–नवीन व्यवसायाच्या वाटा जरी सापडल्या असल्या तरी सल्ला न घेता घाईने काहीच करू नका. काका व आत्या यांजकडून तुमचे कौतुक होईल.
धनु :–कुटुंबासाठी अचानक खर्चाची प्रकरणे निघतील. प्रत्येकाच्या गरजा भागवताना तुमच्या नाकी नऊ येतील. नोकरदार मंडळीनी समंजसपणे विचार करूनच निर्णय घ्यावेत.
मकर :–आईवडिलांच्या समाधानासाठी तुम्ही तुमच्या मनाला मुरड घालाल. नोकरदारांनी आपल्या हातातील कामात केलेली दिरंगाई त्रासदायक ठरणार आहे.
कुंभ :– किरकोळ उद्योगातूनही चांगले उत्पन्न होत असल्याचे जाणवेल. घरगुती उद्योगातून मोठी उडी मारता येणार आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
मीन :–मोठमोठी स्वप्ने पाहणार्यानी मनात कोणतीही भिती न बाळगता आपले काम सुरू ठेवावे. हातातील प्रत्येक क्षणाचा वापर कामासाठी केल्यास मोठ्या यशाचा मार्ग सापडेल.
||शुभं-भवतु ||