daily horoscope

गुरूवार 23 सप्टेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

गुरूवार 23  सप्टेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

गुरूवार 23 सप्टेंबर चंद्ररास मीन 06:43 पर्यंत व नंतर मेष. चंद्र नक्षत्र रेवती 06:43 पर्यंत व नंतर अश्र्विनी.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश

वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

तृतीया श्राद्धाचा दिवस. 

मेष :–स्वत:चेच म्हणणे खरे करण्याचा प्रयत्न करू नका. कुटुंबातील इतरांच्या मतांचाही आदर करा. शेजारच्यांसाठी आर्थिक मदत करावी लागेल. 

वृषभ :–व्यवसाय उद्योगातील तांत्रिक बाबींकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. आध्यात्मिक गोष्टींविषयी चे कुतूहल वाढेल. आवडीच्या विषयात लक्ष घालता येणार आहे. 

मिथुन  :–मित्रमंडळींच्याबरोबर आज अचानक आनंददायक अनुभव येणार आहेत. भावंडांच्या मदतीने व्यवसायातील मोठी उडी मारण्याचे पक्के ठरवाल. 

कर्क :–तरूणांना स्वत:च्या पायावर उभे  राहण्याची  संधी मिळेल. स्वत:च्या कलेविषयी अभिमान वाटणार्‍या गोष्टी घडतील. आज कोठेही बाहेरच्या प्रवासाचे ठरवू नका. 

सिंह :– कित्येक कामे आपण न बोलताही होतात याचा अनुभव येईल. कुटुंबातील महत्वाच्या मुद्ध्यावरील चर्चा करताना तुमच्याकडून तडजोडीची भाषा महत्वाची ठरेल. 

कन्या :–आज तुम्ही करत असलेली धावपळ वाया जाणार नाही. कुटुंबियांना व नातेवाईकांना बर्याच दिवसानंतर वेळ द्याल व मानसिक आनंद देणार्‍या गप्पा होतील. 

तूळ :–नोकरदारांनी व कामगार वर्गाने वरिष्ठांचे आदेश न पाळल्याने अडचणीत याल. मेडीकल क्षेत्रातील कर्मचारी व अधिकारी यांना गुंतागुंतीच्या कामाचा त्रास होईल. 

वृश्र्चिक :–आर्थिक व्यवहारात तुम्हाला विचार न करता एक पाउलही उचलणे त्रासदायक ठरेल. ट्रेडिंग करणार्‍यांनी सल्ल्याशिवाय गुंतवणूक करू नये. 

धनु :–विद्यार्थ्यांना मेहनतीचे महत्व कळेल. अचानक मित्राच्या नादाने खरेदी करताना तूमचा आज मानसिक गोंधळ उडेल. राजकीय क्षेत्रात संकटाची चाहूल लागेल. 

मकर :– खर्चावरती नियंत्रण  ठेवल्यास नंतर रडावे लागणार नाही. मोठ्या भावंडांबरोबर झालेले मतभेद विसरून एकोपा निर्माण होईल. 

कुंभ :–बँकेच्या कर्जाबाबतीत बेफिकीर राहू नका. सामाजिक क्षेत्रात काम करणार्यांनी  स्वत:चा हेका चालवू नये. उपासना करणार्यांनी मार्गदर्शन घ्यावे. 

मीन :– वैवाहिक जीवनात आज वातावरण आनंदाचे राहील. नोकरीत अधिकारी वर्गाला कामगारांच्या बाबतीत निर्णय घेणे अवघड जाईल. तरूणांची संवेदनशीलता वाढेल. 

||शुभं-भवतु ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *