Read in
बुधवार 22 सप्टेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य
बुधवार 22 सप्टेंबर चंद्ररास मीन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र रेवती अहोरात्र व नंतरही रेवती आहे.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
द्वितीया श्राद्ध करण्याचा दिवस आहे.
मेष :–आत्मशक्ती, मेडीटेशनचा अभ्यास करणार्यांनी त्याना घालून दिलेल्या नियमाच्या बाहेर जाऊ नये. डोकेदुखीचा त्रास वाटत असल्यास मार्गदर्शन घ्यावे किंवा अती अभ्यासाचा मारा करू नये.
वृषभ :–पैसा, श्रीमंती आणि ऐंश्र्वर्य बाबतचे तुमचे विचार इतरांना आदर्शवत वाटणार आहेत. न्यायालयातील तुमच्या रखडलेल्या कामाबाबत चौकशी करा.
मिथुन :–सासूबाईंच्या समाजातील प्रतिष्ठेचा आज तुमच्या कार्यात उपयोग होणार आहे. औषधी क्षेत्रातील वैद्य मंडळींकडून कौतुकास्पद काम होईल.
कर्क :–धार्मिक गोष्टी वाचण्याची ओढ वाढेल व त्याच्यावरील विश्र्वासातही वाढ होईल. मनातील अनुत्तरीत प्रश्र्नांचा विचार केल्यास योग्य उत्तर सापडेल.
सिंह :–घरातील बाथरूम संडासमधे पाणी तुंबण्याचा त्रास होईल. तरी काळजी घ्यावी लागेल. पेन्शनच्या बाबतीत झालेला गोंधळ निस्तरावा लागणार आहे.
कन्या :–महिला व पुरूष दोघांनाही युरीन इन्फेक्शनचा त्रास होण्याचा धोका आहे. किडनी प्राँब्लेम असणार्यांनी विशेष काळजी घ्यावी. एखाद्या ठिकाणी जात असाल तर इन्फेक्शन बाबत काळजी घ्या.
तूळ:– चार माणसांच्या गर्दीत महिलांचे मोहक रूप आज उठून दिसेल. पुरूष मंडळीना आपल्या स्वभावातील प्रेमळपणा पेक्षा व रागीटपणावर मर्यादा घालावी लागेल.
वृश्र्चिक :– कुटुंबियांना तुमच्याविषयी अतीव प्रेम निर्माण होईल तुमच्या अतीस्पष्टपणाचाही अभिमान वाटेल. कामगार वर्गाचे कामातील सचोटीबद्धल कौतुक केले जाईल.
धनु :–व्यायामाच्या विषयीची तुमच्यातील जिद्द वाखाणण्याजोगी राहील. आरोग्याच्या दृष्टीने तरूणांनी अतिशय काळजी घ्यावी. मानसिक आनंद देणार्या घटना घडतील.
मकर :–नाटक, सिनेमावर लिहीलेल्या तुमच्या लेखांना अचानक रात्रीत प्रसिद्धी मिळेल. आज प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष भेटणाऱ्या मान्यवरांकडून तुमचे फारच कौतुक होईल.
कुंभ :–पोलिस , होमगार्ड यांना गुंतागुंतीच्या कामासाठी निवडले जाईल. कुटुंबात गोड पाहुण्याचे आगमन होणार असल्याची गोड बातमी मिळेल.
मीन :– रस्त्यावर साचलेल्या ज्या खड्डे, पाण्याविषयी तुम्हाला माहिती नाही तेथे सांभाळून जावे लागेल अपघाताचा धोका आहे. वयस्कर मंडळीनी आज घराबाहेर पडूच नये.
||शुभं-भवतु ||