Read in
मंगळवार 21 सप्टेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य
मंगळवार 21 सप्टेंबर चंद्ररास मीन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा 29:05 पर्यंत व नंतर रेवती.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज पितृपंधरवडा सुरू होत असल्याने महालयाचा आरंभ होत असून प्रतिपदेचे श्राद्ध करता येणार आहे.
मेष :–व्यवसायातील किंवा नवीन घराच्या कर्जासाठी ही प्रयत्न करत असाल तर आजच्या दिवशी चौकशीला सुरूवात करा. दवाखान्याचे शुक्लकाष्ठ संपण्याची चिन्हे दिसतील.
वृषभ :– आईवडील मुलांकडून नकळतपणे दुखावले जातील. नोकरीच्या ठिकाणी शक्यतो आज व्यक्त होण्याचे टाळा. मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टी मनाला लावून घेऊ नका.
मिथुन. :–प्रथम संततीच्या आजाराविषयी आजीआजोबांचा सल्ला उपयोगी पडेल. पतीपत्नीच्या एकत्र व्यवसायात आज तुम्हाला गप्प बसावे लागेल.
कर्क :–सेवाभावी वृत्तीने काम करणार्या व्यक्तींचे सामाजिक पातळीवर कौतुक केले जाईल. तरूण तरूणींना आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल.
सिंह :– वयस्कर मंडळींची औषध ठेवण्याची जागा बदलू नका जीवघेणी गडबड होईल. लहान मुलांच्या कडून झालेल्या चुकांबद्धल आज तुम्हाला सौम्यपणे वागावे लागेल.
कन्या :–व्यवसायातील भागिदारीबाबत मानसिक ताण येईल. आईच्या प्रकृतीबाबत नुसती काळजी करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीची गरज आहे हे लक्षात घ्या.
तूळ :–ओल्या, निसरड्या जागेवरून चालताना पाय घसरण्याची मोठी शक्यता आहे.उद्याचे काम आजच करण्यावर भर द्या.
वृश्र्चिक :–पूर्वीच्या घडलेल्या घटनांचा सद्धस्थितीशी संबंध लावू नका. कुटुंबाकरीता तुम्ही करत असलेल्या कर्तव्यातच आनंद लपलेला आहे हे जाणवेल.
धनु :–आज तुमच्या मनात सुरू असलेल्या विचारांना मोकळीक द्या. पगारातील मोठी रक्कम मित्रांच्या आर्थिक गरजेकरीता खर्च करावी लागेल.
मकर :– अध्यात्मिक उपासकांना दैवी शक्तीचा अनुभव येईल. प्रत्यक्ष गुरूमाऊली किंवा ज्येष्ठ मान्यवरांकडून मौल्यवान उपदेश मिळेल. गुरूमंत्राचा अनुभव येईल.
कुंभ :–दैवी उपासनेच्या बळावर आलेले संकट निभावून न्याल. महिलांवरील गृहकर्तव्याच्या जबाबदारीत अचानक वाढ होणार आहे.
मीन :– बर्याच दिवसापासूनची चमचमीत खाण्याची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या प्रकृतीच्या बाबतीत काळजी निर्माण करणार्या घटना घडतील.
||शुभं-भवतु ||