daily horoscope

सोमवार 20.सप्टेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

सोमवार 20.सप्टेंबर  2021 चे दैनिक राशीभविष्य

सोमवार 20 सप्टेंबर चंद्ररास कुंभ 21:50 व नंतर मीन.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश

वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

चंद्रनक्षत्र धनिष्ठा 27 :20  पर्यंत व नंतर शततारका. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

आज शनिप्रदोष  आहे शिवाच्या उपासकांनी उपासना करावी.

चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा 28:01 पर्यंत व नंतर उत्तरा भाद्रपदा. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

प्रौष्ठपदी पौर्णिमा.

भागवत सप्ताह समाप्ती.

मेष :–मनातील इच्छा अपेक्षा पूर्ण करण्याचे मार्ग सापडतील. व्यवसायात झालेला तोटा भरून काढण्याचे मार्ग सापडतील.

वृषभ :– ज्या गोष्टी तुम्हाला जमत नाहीत असे वाटते त्या गोष्टी करण्याचा अट्टाहास करू नका. कौटुंबिक  गोष्टीना प्राधान्यक्रम द्याल.

मिथुन  :–तुमच्यावरील झालेले आर्थिक कर्ज फेडण्याचे नियोजन अंमलात आणण्याचे धाडस कराल. महत्वाच्या मुद्ध्यावरील चर्चा समाधान देईल.

कर्क :–कलाकार मंडळींच्या कलेला चांगले प्रोत्साहन मिळेल. लहान  मुलांच्या  प्रश्र्नांना प्राधान्य देऊन ते प्रश्र्न सोडवण्याचा प्रयत्न करा.

सिंह :–एखाद्या सुखवस्तुची खरेदी होऊन  कुटुंबात आनंदी आनंद होईल. वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी स्वखुषीने स्विकाराल.

कन्या :–हितशत्रूपासून चार हात दूरच रहा. नोकरीत तुमच्या हातात असलेल्या  कामकाजाच्या  दिशेत  तुम्हाला बदल कराव लागेल.

तूळ :–गुरूकृपेने व्यवसायातील शुक्लकाष्ठ कमी होतील. हातातील पैशाचा विनियोग  गुंतवणूकीच्या दृष्टीने  करा. वायफळ करू नका.

वृश्र्चिक :–कौटुंबिक वातावरण क्षुल्लक कारणावरून बिघडण्याचा धोका आहे. आज कुटुंबातील वयस्कर मंडळींची विशेष काळजी घ्यावी लागेल.

धनु :–बिघडलेल्या नोकरीचा प्रश्र्न पुन: मार्गी लागणार असल्याचा निरोप येईल. कुटुंबात अचानक स्थलांतराचे विषय सुरू होतील.

मकर :–आर्थिक प्राप्ती व समाधान यात समाधान महत्वाचे आहे याची प्रचिती येईल. जवळच्या  नातेवाईकांबरोबर मतभेद झाल्यामुळे मानसिक ताण वाढेल.

कुंभ :–तरूणांकडून अचानक बचतीचे धोरण स्वीकारल्याचे दिसेल. न्यायालयीन प्रश्र्न सहजपणे सुटणार असल्याचे जाणवेल.

मीन :–लहान मुलांच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. नियोजनाबरोबरच प्रत्यक्ष कृतीवर भर द्या. आर्थिक चिंता कमी होतील.

|| शुभं-भवतु ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *