Read in
रविवार 19 सप्टेंबर 2021 ते शनिवार 25 सप्टेंबर पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
रविवार 19 चंद्ररास कुंभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र शततारका 27:27 पर्यंत व नंतर पूर्वाभाद्रपदा. सोमवार 20 चंद्ररास कुंभ 21:50 पर्यंत व नंतर मीन. चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा 28:01 पर्यंत व नंतर उत्तरा भाद्रपदा. मंगळवार 21 चंद्ररास मीन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा 29:05 पर्यंत व नंतर रेवती. बुधवार 22 चंद्ररास मीन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र रेवती अहोरात्र व नंतरही रेवती आहे. गुरूवार 23मीन 06:43 पर्यंत व नंतर मेष चंद्रनक्षत्र रेवती 06:43 पर्यंत व नंतर अश्र्विनी. शुक्रवार 24 चंद्ररास मेष दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अश्र्विनी 08 53 पर्यंत व नंतर भरणी. शनिवार 25 चंद्ररास मेष 18:15 पर्यंत व नंतर वृषभ. चंद्रनक्षत्र भरणी 11:32 पर्यंत व नंतर कृतिका.
19 रविवार अनंत चतुर्दशी. अनंताची पूजा.
20 सोमवार प्रौष्ठपदी पौर्णिमा, भागवत सप्ताह समाप्ती.
( पौर्णिमेचा महालय 24, 28 29 किंवा 03, 06 आँक्टोबर यापैकी कोणत्याही दिवशी करावा.)
21 मंगळवार महालयारंभ, प्रतिपदा श्राद्ध.
22 बुधवार द्वितीया श्राद्ध.
23 गुरूवार तृतीया श्राद्ध.
24 शुक्रवार संकष्ट चतुर्थी चंद्रोदय 20:48. चतुर्थी श्राद्ध, भरणी श्राद्ध.
25 शनिवार पंचमी श्राद्ध.
मेष :– मित्रमंडळींच्या मदतीने तुमच्या मनातील प्रश्र्नांना सोडवणे सोपे जाईल. कलाकार मंडळीना आपल्या कलेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात मोठे काम करण्याची संधी मिळेल. वडिल भावंडांकरीता तुमच्या कडून फार मोठी मदत करण्याची तयारी दाखवाल. काका व आत्याच्या मदतीने एका रेंगाळलेल्या क्लिष्ट कामाला सुरूवात कराल. मानसिक ताण तणाव असलेल्याना योग्य औषध उपचारांचा मार्ग मिळेल. या सप्ताहात तुमच्या अहंपणाला खतपाणी घालणाऱ्या घटना घडतील. उच्चशिक्षित मंडळीना त्याच्या क्षेत्रात मानाचे स्थान मिळेल.
वृषभ :–हा सप्ताह तुम्हाला अचानक धनलाभाचा आहे. ज्या क्षेत्रातून लाभ होऊ शकतो त्या क्षेत्राकडे विशेष लक्ष केंद्रीत करा. व्यवसायातील गुंता सोडवण्यासाठी अतिप्रमाणात धावपळ करावी लागेल व त्याचा उपयोगही होईल. हातातील अधिकाराचा उपयोग कर्तव्य भावनेने केल्यामुळे तुमचा मानसन्मान वाढेल. राजकारणी लोकांना मात्र गुप्तशत्रूंचा त्रास होणार आहे तरी त्यांनी सावध रहावे.
मिथुन :–पूर्वपुण्याईमुळे तुमच्यावर आलेले संकट तीव्र स्वरूप दाखवणार नाही. आईवडिलांच्या आशिर्वादाने तुम्ही मनातील इच्छा पूर्ण करू शकाल. ज्या गोष्टी तिर्थ क्षेत्राला होतात त्याच विधीचा तुम्हाला लाभ होईल. अध्यात्मिक उपासकांनी आपल्या ऊपासनेस मार्गस्थ करण्याकरीता मान्यवर गुरूंचा सल्ला घ्यावा. परदेशी जाऊ इछ्छिणार्यांना आता तयारी करायला हरकत नाही. पितृसौख्याचा अनुभव येईल व महिलांना सासूबाईंकडून इच्छापूर्तीचाही अनुभव मिळेल.
कर्क :–हा सप्ताह तुम्हाला अचानक पित्ताचा त्रास सुरू होईल तरी पित्तकारक पदार्थ खाणे टाळा. मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टी मनाला लावून घेऊ नका. मानसिक त्रास झाला तरी आर्थिक लाभामुळे मनावरचे दडपण कमी होईल. संध्याकाळच्या ठरलेल्या कार्यक्रमासाठी जीवाचे रान कराल. कलाकारांना सामाजिक पातळीवर आपली कला सादर करण्याची संधी मिळेल व चांगली प्रसिद्धीही मिळेल. विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणापुढे इतर कोणत्याही गोष्टीचे महत्व वाटणार नाही.
सिंह :–वकील मंडळीना अचानक मानहानीला सामोरे जावे लागेल तरी काळजी घ्यावी. दत्तक संततीच्या विचारात असलेल्यांनी आता या सप्ताहात निर्णय घेण्यास हरकत नाही. पण आय व्ही. एफ. ची मदत मात्र या सप्ताहात घेऊ नये. हा सप्ताह तुम्हाला रेडीमेड सर्वच गोष्टींसाठी चांगला आहे. मग त्या मूर्त अमूर्त कोणत्याही असोत. जोडीदाराबरोबरचे सुसंवाद फलद्रूप होतील. चर्चेने सुटणारे विषयांना महत्व द्या. कृतिशीलतेवर फार भर देऊ नका.
कन्या :–स्पर्धात्मक परिक्षेचा अभ्यास करणार्यांनी योग्य नियोजनाने अभ्यासास सुरूवात करावी. मागिल महिन्यापासून नोकरीतील सतावणारा प्रश्र्न तुम्हाला वरिष्ठांच्या कृपेले मार्गी लावता येईल. सामाजिक स्तरावर तुमच्या कतृत्वाचे कौतुक होईल पण त्याने लगेच फुशारून जाऊ नका. नात्यांमधील मागिल गोष्टी सोडून देऊन एकोपा करण्याचा तुमचा प्रयत्न यशस्वी होईल. तुम्हाला नोकरीमधे आलेली लहानशी संधीही खूप कांही देईल.
तूळ :–समोरच्या व्यक्तीकडून आज तुमचा अपेक्षाभंग होणार आहे त्यामुळे मानसिक शांती टिकवावी लागेल. व्यवसायिक गोष्टीतील नवीन धोरण राबवण्यासाठी कौशल्य आत्मसात करण्यास हा सप्ताह लाभदायक आहे. शिक्षक व प्राध्यापकांना नव्याने काम करताना कामाबरोबर अडचणींना ही सामोरे जावे लागेल. तरूण वर्गाला अति धाडस करण्याची इच्छा होईल. दुसर्यांच्या सांगण्यावरून कोणतेही निर्णय घेऊ नका स्वत: पडताळून पहा.
वृश्र्चिक :–शाळा, काँलेजमधील नवीन वर्षाच्या प्रवेशाचा प्रश्र्न सहजासहजी सुटणार नाही आहे. तरी तुम्ही बेफिकीर राहू नका. नव्याने झालेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमात होण्याची दाट शक्यता आहे तरी सावध रहा. दवाख्न्याशी संबंधीत असलेल्या नोकरदारांनी आपल्या क्षमता ओळखून काम करावे अन्यथा कामात चुका होतील. महिलांनी आपल्या मोनोपाँजचा विषयी कोणतीही गोष्ट वा त्रास लपवून ठेवू नये.
धनु :–लेखक मंडळींच्या नवीन साहित्याविषयी वाचक आक्रमकतेने चर्चा करतील. लेखक व वाचक दोघांनीही शांततेने व संयमाने वागावे. बांधकाम खात्यातील तुमच्या अर्जावर योग्य तर्हेने विचार होण्यासाठी कोणताही मध्यस्थी न घेता स्वत: जातीने काम करावे. इतरांवर विसंबून राहू नये. वयस्कर मंडळीनी पायाला झालेली जखम चिघळणार नाही याची काळजी घ्यावी.हा सप्ताह दवाखान्याची ट्रिटमेंट घेण्यासाठी एकदम चांगला आहे… ॼ.
मकर :–परगावी असलेल्या आईवडिलांबाबतची चिंता फार सतावणार आहे. मुलांनी आपल्यावरील जबाबदारी काटेकोरपणे पाळण्याचा प्रयत्न करावा. तरूणांनी आपला पगार व खर्च याचा ताळमेळ बसवणे महत्वाचे आहे. सरकारी तत्त्वावरील चालवलेला उद्योग इतरांच्या जबाबदारीवर सोपवल्याने झालेला गोंधळ निस्तरावा लागणार आहे. संततीकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण न झाल्यास त्यांना तशी कल्पना द्या पण डायरेक्ट आरोप करू नका. अपत्यप्राप्तीच्या इच्छूकांनी डाँक्टरांच्या सल्ल्याचा विचार करूनच निर्णय घ्यावेत.
कुंभ :–आईच्या सल्ल्यानेच आर्थिक व्यवहार करावा. तरूणांना जे क्षेत्र निवडायचे आहे ते कोणीतरी मदत करणार आहे या विचाराने करू नका. सध्याच्या परिस्थितीचा विचार करून व तुमच्या स्वत:च्या क्षमता तपासूनच ठरवा. तरूणांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये. भविष्यकाळातील योजना ठरवून त्याना पण महत्व द्यावे लागेल. रेंगाळलेल्या प्रश्र्नांतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही अफवांवर विश्र्वास ठेवू नका व त्याच बातम्या तुम्ही पसरवू नका अन्यथा अडचणीत याल.
मीन :–स्वभावातील आळशीपणा दूर करणे अतिशय महत्वाचे आहे हे लक्षांत घ्या. गेल्या महिन्यात झालेले नुकसान हे फक्त तुमच्या विसराळूपणामुळे झालेले आहे याची दखल घ्या. खुल्या मनाने गोष्टी स्विकारल्यास सर्वच बाबी सोप्या होतील. व्यवहारातील घाई गडबड नुकसानीस कारणीभूत होईल. भाड्याने दिलेल्या जागेबद्दल जागरूक रहा अतिविश्र्वास ठेवून निर्धास्त राहू नका. ब्राँकायटीस, अस्थमाचा त्रास असलेल्यांनी जराही बेफिकीर राहू नये. काळजी घ्यावी.
||शुभं-भवतु ||