daily horoscope

शनिवार 18 सप्टेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

शनिवार  18  सप्टेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

शनिवार 18 सप्टेंबर चंद्ररास मकर 15:25 पर्यंत व नंतर कुंभ.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश

वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

चंद्रनक्षत्र धनिष्ठा 27 :20  पर्यंत व नंतर शततारका. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

आज शनिप्रदोष  आहे शिवाच्या उपासकांनी उपासना करावी.

मेष :–आज तुमच्या जीवनात आनंददायी घटना घडणार आहेत. प्रवास करणार असाल तर वाहनांकडून त्रास होणार आहे. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखण्यात यशस्वी व्हाल.

वृषभ :–आर्थिक नियोजनाअभावी  कामाचे प्रेशर वाढणार आहे. विचार करत बसण्यापेक्षा आत्मचिंतन करा किंवा प्रत्यक्ष कृतीवर भर द्या. इतरांच्या वागण्याचा विचार करू नका.

मिथुन :–नोकरदारांसाठी आजचा दिवस अतिशय कौतुकाचा व सन्मानाचा राहील. कौटुंबिक वातावरण आनंदाचे  व समाधानाचे असणार आहे. महिलांना आज आराम मिळेल.

कर्क :– आज महत्वाच्या विषयावर तुम्हाला तुमचे विचार व्यक्त करण्याची संधी मिळेल. कुटुंबातील अडचणी सोडवण्यासाठी लागणारे पतीपत्नीमधील संवादाचे महत्व कळेल.

सिंह :– आज धनप्राप्तीचे योग येणार आहेत. व्यवसायातील घडामोडींवर लक्ष केंद्रित केल्यास त्यातील खाचाखोचांवर विचार करून त्यातील विषय योग्य प्रकारे हाताळतायेतील.

कन्या :–आज जून्या मित्रमंडळींबरोबर फोनवर संपर्क होऊन कांही महत्वाच्या कामात ओळख मिळेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रणाची आवश्यकता आहे.

तूळ :–नात्यातील जवळच्या व्यक्तींकडून चांगले व आवश्यक ते सहकार्य मिळेल. व्यवसायानिमित्ताने  प्रवास करावा लागेल. रेंगाळलेल्या प्रश्र्नांना मार्ग मिळेल.

वृश्र्चिक :–अतिविचारांमुळे मनस्वास्थ्य बिघडणार आहे तरी आज मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. रागावर पण नियंत्रणाची आवश्यकता आहे.

मकर :–अतिकष्दायक प्रसंगाला आज समजून घ्यावे लागेल. महत्वाच्या कामामधे भावंडाकडून मदत होईल. वृद्धांनी जवळची नाती  बोलण्याने बिघडणार नाहीत याची काळजी घ्यावी. 

कुंभ :–चुकीचे औषध घेतल्यामुळे त्रास होईल तरी जागरूक रहा. राजकीय मंडळीना  त्यांच्याकडून न झालेल्या कामाबद्दल लोकांकडून अपमानास्पद बोलले जाईल.

मीन :–तुमच्या व्यवसायात तुम्हाला स्पर्धक त्रास देण्याची जोरदार शक्यता आहे. आज खर्चाचे प्रमाण वाढणार आहे तरी चिडचिड न करता समाधानाने व विचाराने  खर्च करा. 

||शुभं-भवतु ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *