daily horoscope

शुक्रवार  17  सप्टेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

शुक्रवार  17  सप्टेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

शुक्रवार 17  सप्टेंबर  चंद्ररास मकर दिवसरात्र व चंद्र नक्षत्र श्रवण 27:35 पर्यंत व नंतर धनिष्ठा.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश

वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

वामन जयंती  व परिवर्तिनी एकादशी.

मेष :– आज उठल्यापासून व्यवसायाचे विचार मनात येतील. न्यायालयातील वाद न्यायालयाच्या बाहेर सुटणार असल्याने त्यासाठीचा तुम्ही पुढाकार घ्या.

वृषभ :–परंपरावादावर तुमचे विचार स्पष्ट करण्यास तुम्हाला चांगली संधी मिळेल. लेखकांना व वक्त्यांना आवडत्या विषयावर व्यक्त होण्याची संधी मिळणार आहे.

मिथुन :–आज होणारा मानसिक त्रास हा फक्त तुमच्यातील नकारात्मक विचारामुळे होणार आहे. वडिलांकडील नात्याची घरी वर्दळ वाढेल व वातावरण आनंददायक राहील.

कर्क :–व्यवसायातील नव्याने स्विकारलेल्या गोष्टींबाबत पुनर्विचार करा. नोकरीतील बदलाच्या विचारात असाल तर सध्यातरी विचार पुढे ढकला.

सिंह :– युनियनच्या कामातील तुमचा सहभाग युनियनला फायदेशीर राहील. ज्येष्ठांना दिलेला शब्द पाळताना तुमची गडबड होणार आहे. प्रेमाच्या व्यवहारात अडचणी निर्माण होण्याचे संकेत मिळतील.

कन्या :– मनातील संशयाचे भूत तुम्हाला आज कशातही आनंद घेऊ देणार नाही. अत्यंत प्रयत्नाने केलेल्या कामाचे  वरिष्ठांकडून खूपच कौतुक होईल.

तूळ :–मनातील नवनवीन योजनांच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात मोठे पाऊल टाकणार आहात. राजकीय मंडळींची चांगली मदत होईल. कोणत्याही कामात घाई करू नका.

वृश्र्चिक :–लहानशा प्रवासाच्या निमित्ताने बाहेर पडाल  आणि मोठ्या प्रवासाचे नियोजन कराल. मित्रांच्या संगतीने चांगल्या प्रकारचा  व सकारात्मक विचार कराल.

धनु :– देवाच्या अस्तित्वाच्या  बाबतीतील तुमचा विचार अचानक आज बदलणार  आहे. मनाची चलबिचलता वाढल्याने हातातील कामाकडे लक्ष लागणार नाही.

मकर :– आजपर्यंत ज्या कामात, कार्यात अपार कष्ट घातले आहेत त्याचा सकारात्मक निकाल मिळेल. विवाहेच्छूंनी आपल्या अटी शिथील केल्यास चांगला अनुभव येईल.

कुंभ :–कोणत्याही बाबतीत प्रतिक्रीया देताना विचारांत बदल करावा लागेल किंवा सावधानता बाळगावी लागेल. सरकारी कामातून डोकेदुखी होईल.

मीन :– आज प्रत्येक कामात आत्मविश्वास वाढेल. अपरिचित व्यक्तीबरोबर बोलताना तुमचे स्पष्ट विचार व्यक्त करू नका. कुटुंबातील चर्चा कुटुंबातच ठेवा.

| शुभं-भवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *