daily horoscope

गुरूवार 16  सप्टेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

गुरूवार 16  सप्टेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

गुरूवार 16 सप्टेंबर चंद्ररास धनु  10:42 पर्यंत व नंतर मकर.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश

चंद्रनक्षत्र उत्तराषाढा 28:08 पर्यंत व नंतर श्रवण. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

 रविचा कन्या राशीत प्रवेश 25 : 12.

मेष :– परदेशी जायच ठरवताय पण पुन्हा विचार करावा लागेल. उगाच आततायीपणा करू नका. नोकरीत वरिष्ठांबरोबरचे वादाचा प्रसंग निर्माण होईल.

वृषभ :–राजकीय क्षेत्रातील मंडळीनी आपल्या कामात इतरांना हस्तक्षेप करू देऊ नका. अचानक मनात आले म्हणून एखादे धाडसही  करू नका.

मिथुन :–वरिष्ठांबरोबर बोलताना भान ठेवून बोलावे, वादाचे विषय टाळावेत.कोणत्याही विषयावर बोलताना आत्मप्रौढी टाळावी अन्यथा लोकांकडून चेष्टा होईल.

कर्क :–आज कोणत्याच प्रकारची खरेदी करू नका. जोडीदाराबरोबर अचानक वाद निर्माण होईल. आज स्पर्धा परिक्षेच्या  अभ्यासात चांगली प्रगती होईल.

सिंह :–आज तुम्हाला जाणून बुजून ताणतणावापासून दूर रहावे लागेल. अचानक झालेल्या हवेतील बदलामुळे हात पाय दुखण्याचा त्रास होईल.

कन्या :–कोणत्याच गोष्टीत अतिचिकीत्सा करू नका. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळीना प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल. भावनेच्या भरात कोणताच निर्णयघेऊ नका.

तूळ :–तुमची हुषारी सिद्ध होईल. माहेरी आलेल्या मुलीचे आईबरोबर हितगुज होईल. वयस्कर मंडळीना आज अतिशय उत्साह वाढल्याचे जाणवेल. 

वृश्र्चिक :–लहान मुलांच्या मनात अचानक असुरक्षिततेची भावना बळावेल. मामाभाच्च्याच्या  हितगुजात अनेक गुपिते बाहेर येतील. वयस्करांना मानसिक ताण वाढेल. 

धनु :– किरकोळ फळ विक्रेत्यांना अचानक धनलाभ संभवतो. इतरांचा अपमान करण्याने तुम्हाला फार मनस्ताप होईल. स्वभावातील चंचलता वाढेल. 

मकर :– स्वभावातील तापटपणात वाढ होईल. मित्रांना आर्थिक मदत करताना वास्तवतेचे भान ठेवल्यास तुम्ही अडचणीत येणार नाही. 

कुंभ :–स्वभावातील तापटपणात वाढल्याने उच्च रक्तदाबाचा त्रास होईल. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कोणतीच दिशा सापडणार नाही. निर्णयासाठी ज्येष्ठांची मदत घ्यावी. 

मीन :–मित्रांना मदत करताना निस्वार्थी मनाने कराल. कलाकार मंडळींच्या कार्यक्रमाची आखणी होईल. महिलांनी आपल्यावर असलेल्या जबाबदार्या पूर्ण करण्याचा प्रयत्न  करावा. 

| शुभं-भवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *