Read in
बुधवार 15 सप्टेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य
बुधवार 15 सप्टेंबर चंद्ररास धनु दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा
28:55:पर्यंत व नंतर उत्तराषाढा.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय
फलादेश देत आहे.
अदु:ख नवमी
मेष :–अध्यात्मिक उपासना करणार्यांना अचानक एखाद्या दैवी शक्तीचा
अनुभव येईल. कुटुंबातील ज्येष्ठांच्या सल्ल्याशिवाय कोणताही आर्थिक
व्यवहार करू नका.
वृषभ :–महिलांना त्याच्या नावावर घेतलेल्या कर्जातून मुक्त होण्याचे
नियोजन करता येणार आहे. कुटुंबात केलेल्या जून्या व्यवहारामुळे कांही
गैरसमज होणार आहे तरी सावध रहा.
मिथुन :–विवाहेच्छू तरूणींना वयात जास्त अंतर असलेले स्थळ येईल.
वयस्कर मंडळीनी व तरूणानीही दात काढण्याच्या बाबतीत घाई करू नका.
कर्क :–पाळीव प्राण्यांपासून लहान मुलांना त्रास होणार आहे तरी काळजी
घ्यावी लागेल.कामगार वर्गास आज कामाचे प्रेशर फारच वाढणार आहे.
सिंह :–शिक्षक प्राध्यापक मंडळीना आँन लाईन शिकवताना आज वेगळाच
अनुभव येईल. वयस्कर आज्जी आजोबांच्या मनातील राग काढून
टाकण्यासाठी तुम्हाला फारसा प्रयत्न करावा लागणार नाही.
कन्या :– शिक्षण संस्थेतील संस्थाचालक मंडळीना पालकांच्या रोषाला
सामोरे जावे लागेल. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी
कोणत्याही निर्णयात घाई करू नये.
तूळ :–तरूणांना अचानक कानदुखीचा त्रास होईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या
कर्तृत्वाचा आवाका वाढत असल्याचे जाणवेल. नोकरीतील समस्या आपोआप
दूर होत असल्याचे जाणवेल.
वृश्र्चिक :–कुटुंबात अचानक नातलगांचे येणे होऊन आजचा दिवस अतिशय
आनंदात जाईल. पायाची काळजी घेताना उगीचच भावूक व्हाल.
धनु :– आज तुमच्या आनंदाला पारावार राहणार नाही. वयस्कर मंडळींचा
शेजार्यांबरोबर गप्पा गोष्टीत वेळ आनंदात जाईल. तरूणांना आपल्यापेक्षा
लहान व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळेल
मकर :–व्यावहारिक दृष्टीने समोरील प्रश्र्न हाताळल्यास त्यातील गुंतागुंत
कमी होईल. गेल्या महिन्यात नव्याने झालेल्या ओळखीतून आजच्या
कामात मदत होईल.
कुंभ :–आज घडणार्या प्रसंगाचा उगीच अर्थ लावत बसू नका. घरातील
वयस्कर मंडळींना मोहाच्या मायाजालापासून दूर रहावेसे वाटेल.
मीन :– ज्या गोष्टींवर आपला हक्क नाहीय त्यांची अजिबात अपेक्षा करू
नका. राजकारणातील प्रतिस्पर्ध्यांच्या वागण्याचा अर्थ समजून घ्या
| शुभं-भवतु ||