Read in
मंगळवार 14 सप्टेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य
मंगळवार 14 सप्टेंबर चंद्ररास वृश्र्चिक 07:04 पर्यंत व नंतर धनु.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
चंद्रनक्षत्र ज्येष्ठा 07:04 पर्यंत व नंतर मूळ. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
दुर्गाष्टमी, गौरी विसर्जन सकाळी 07:04 नंतर. दोरक धारण विधी आजच करावयाचाच आहे.
मेष :– वडिलांच्या प्रकृतीची काळजी घेण्यात तुम्ही जराही कमी पडणार नाही याचा अभिमान वाटेल. घरातील धार्मिक विधीची पण जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडाल.
वृषभ :–मित्रांच्या मदतीने व जिद्धीने कालपर्यंतचे राहिलेले काम पूर्ण कराल. नोकरीतील तुमच्या कामाचे वरिष्ठांकडून कौतुक होईल.
मिथुन :–लहान मुलांच्या मनासारखे करायला जाल व चांगलेच अडचणीत येणार आहात. मानसिक बळाच्या जोरावर अवघड कामाना हात घालाल.
कर्क :– भावंडांबरोबर धार्मिक कार्याची घेतलेली जबाबदारी तुमच्याकडून उत्तम प्रकारे पार पड पडल्याची पोचपावती मिळेल. नाकाच्या दुखण्याने हैराण व्हाल.
सिंह :–आज अचानक खरेदी करण्याचा मोह आवरणार नाही. आज्जीची व नातवंडांची चांगली गट्टी जमेल. स्वेच्छा निवृत्ती घेण्याच्या विचारावर चर्चा करूनच निर्णय घ्या.
कन्या :–आई वडिलांबरोबर सुखदु:खाच्या चार गप्पागोष्टी होतील. नात्यातील बिघडलेले संबंध मनापासून सुधारण्याचा प्रयत्न कराल.
तूळ :– पायाची जखम वाढत नसल्याची खात्री करून घ्यावी लागेल. तरूणांनी नोकरीच्या ठिकाणची अतिचिकित्सेने हातातील संधी घालवू नये.
वृश्र्चिक :– वस्तू हरवणे वा चोरीला जाणे यापैकी एक अनुभव तुम्हाला आज येणार आहे. महिलांना हस्तकला व शिवणकलेच्या क्षेक्त्रात नाविन्यपूर्ण काम केल्याने प्रसिद्धी मिळेल.
धनु :–दवाखान्यात अँडमिट असलेल्या जवळच्या मित्रास भेटायला जावे लागेल व मानसिक त्रास होईल. विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणापुढे इतर गोष्टी गौण वाटतील.
मकर :– आज मित्रांकडून तुमच्या खिशाला चांगलीच कात्री लागेल. कलाकार व गायक मंडळीना आपली कला उत्तम प्रकारे सादरकरता येईल.
कुंभ :–व्यवसायातील तुमचे अंदाज खरे ठरतील. नात्यातील. जवळच्या व्यक्तीच्या घराच्या रजिस्ट्रेशनसाठी जावे लागेल. ( वेळ नसतानाही )
मीन :–पित्ताचा त्रास होण्याने आज तुमच्या, मनाची चिडचीड होईल. अतीविचाराने आज झोपेचे खोबरे होई. ब्लडप्रेशर चेक करा.
| शुभं-भवतु ||