daily horoscope

सोमवार  13  सप्टेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

सोमवार  13  सप्टेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

सोमवार  13  सप्टेंबर चंद्ररास वृश्र्चिक दिवसरात्र व चंद्र नक्षत्र अनुराधा  08:22 पर्यंत वनंतर ज्येष्ठा

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश

सोमवार  13  सप्टेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

कृष्णमूर्तीपद्धतीने नक्षत्रीयफलादेश

वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडलीनुसार कृष्णमूर्तीपद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :–पती पत्नीच्या व्यवसायात आज वृद्धी होणार असल्याचे दिसून येईल. किरकोळ विक्रेत्यानाही चांगला लाभ होईल. खाजगी नोकरीत आपण बदली मागावी अशी संधी निर्माण होईल.

 

वृषभ :–व्यवसाय धंद्यातील जूनी येणी वसूल होऊ लागतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी मिळवण्यासाठी अतिशय कठीण कामाची जबाबदारी स्विकारावी लागेल.

 

मिथुन :–आज वाहने सुरक्षित जागी पार्क करावी लागतील नाही तर हरवण्याचा धोका आहे. पती पत्नीमधील मतभेद दूर होऊन प्रेमभावना वाढेल.

 

कर्क :–नोकरीच्या शोधात असणार्‍यांना अपेक्षित नोकरीचा शोध लागेल. व्यवसायातील गुंतवणूक वाढवण्यासाठीचे प्रयत्न फलद्रूप होतील.

 

सिंह :–शेयर मार्केटमधे नव्याने गुंतवणूक करताना घाई करू नका. आजचा दिवस आईच्या सल्ल्याने जाल तर अचंबित करणार्या घटना घडतील व समाधान मिळेल.

 

कन्या :–हातातील काम वेळेत पूर्ण करण्याकरीता वेळेचे योग्य नियोजन करा. कोणत्याही गाँसिपींग मधे सहभाग घेऊ नका. घरातील वयस्कर मंडळीना प्रकृतीचा त्रास जाणवेल.

 

तूळ :–राजकीय मंडळीना प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवता येणार आहे. महिलांनी वादविवाद टाळावा. वाहनाच्या वेगावर नियंत्रण आवश्यक राहील.

 

वृश्र्चिक :– आज मनातील विचारांना मोकळी वाट करून द्या. नात्यातील काही व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे कुटुंबात वाद निर्माण होईल.

 

धनु :–शुभ व मनाला आनंद देणारी घटना घडेल कलाकारांना आपल्या आवडीप्रमाणे कलेचा अनुभव घेता येईल. वडिलोपार्जित संपत्ती बद्धलचा वाद मिूटु लागेल.

 

मकर :–खाजगी नोकरीत वेतनात वाढ होणार आहे. कुटुंबातील ज्येष्ठ  मंडळींच्या मनातील विचार ओळखून त्यांची इच्छा पूर्ण कराल. कुटुंबात आनंद निर्माण होईल.

 

 

 

कुंभ :–नोकरी बाबत नवीन नोकरीची संधी उपलब्ध होईल. मुलांकडून वडिलांना आवडीच्या वस्तूची भेट मिळेल.  मुलांनी आपल्या आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवावे.

 

मीन :–नोकरीच्या ठिकाणी तडजोड स्विकारावी लागेल. साहित्यिक, लेखकयांना वाचकांकडून भरभरून दाद मिळेल. विद्यार्थ्यांचे उच्चशिक्षणाचे प्रयत्न सफल होतील.

| शुभं-भवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *