Read in
रविवार 12 सप्टेंबर 2021 ते शनिवार 18 सप्टेंबर 2021 पर्यंतचे साप्ताहिक
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
12 रविवार चंद्ररास वृश्र्चिक दिवसरात्र व चंद्रनक्षत्र विशाखा 09:49 पर्यंत
व नंतर अनुराधा.
13 सोमवार चंद्ररास वृश्र्चिक दिवसरात्र व चंद्रनक्षत्र
अनुराधा 08:22 पर्यंत व नंतर ज्येष्ठा. 14 मंगळवार चंद्ररास वृश्र्चिक 07:44
पर्यंत व नंतर धनु. चंद्रनक्षत्र ज्येष्ठा 07:04 पर्यंत व नंतर मूळ. 15 बुधवार
चंद्ररास धनु दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा 28:55 पर्यंत व नंतर
उत्तराषाढा. 16 गुरूवार चंद्ररास धनु 10:42 पर्यंत व नंतर मकर. चंद्रनक्षत्र
उत्तराषाढा 28:08 पर्यंत व नंतर श्रवण. 17 शुक्रवार चंद्ररास मकर दिवसरात्र
व चंद्र नक्षत्र श्रवण 27:35 पर्यंत व नंतर धनिष्ठा. 18 शनिवार चंद्ररास मकर
15:25 पर्यंत व नंतर कु, भ. चंद्रनक्षत्र धनिष्ठा 27:20 पर्यंत व नंतर
शततारका.
रविवार गौरी आवाहन सकाळी 09:49 नंतर.
सोमवार ज्येष्ठा गौरी पूजन. 08:22 नंतर.
मंगळवार गौरी विसर्जन. सकाळी 07:04 ते 29:54 पर्यंत. दोरक धारण.
बुधवार अदु:खनवमी
शुक्रवार परिवर्तिनी एकादशी, वामन जयंती.
गुरूवार 16 रोजी रविचा कन्या राशीत प्रवेश 25:12.
शनिवार शनिप्रदोष उपवासाचा दिवस.
मेष :–13 च्या गौरीपूजनाच्या निमित्ताने तुम्हाला सासरच्या मंडळींकडून
एखादी गोड भेट मिळाल्याने सप्ताहाची सुरूवातच आनंद देणार आहे. गौरी
गणपतीचा उत्सव अगदी तुमच्या मनाप्रमाणे साजरा कराल. कोणतीही
कमतरता सोडणार नाही. कुटुंबात दादा परदादांच्या येण्याने आनंदीआनंद
होईल. ज्येष्ठ मंडळीमधील पूर्वीचे मतभेद संपवण्याची उत्तम संधी तुम्हाला
मिळणार आहे त्याचा उपयोग करून घ्या. कलाकारांना आपल्या कला सादर
करण्याची चांगली संधी मिळेल.
वृषभ :–व्यवसायाबाबतचा सकारात्मक दृष्टीने केलेला विचारच
प्रगतीपथावर नेत असल्याचे जाणवेल. या सप्ताहात तुम्ही विचारांपेक्षा फक्त
कृतीला भर देणार आहात. रेंगाळलेली, अडकलेली कामे मार्गी लागण्यासाठीचे
करत असलेले प्रयत्न फलद्रूप होतील. महिलांना पाठदुखीचा, मानेचा त्रास
जाणवेल विचारानेच कामही करा. भावनेच्या आहारी जाऊन अचानक मोठी
रक्कम उसनवारीने देऊ नका. वैयक्तीक आयुष्याकडे लक्ष द्यावे लागेल.
मिथुन :–व्यवसायातील बिघडलेल्या बाबींवर विशेष लक्ष द्यावे लागेल. पडून
राहिलेल्या कामांकडे लक्ष दिल्यास बाप्पा नक्कीच तुहाला मदत करणार
आहे. अनोळखी व्यत्तीकडून अचानक आवश्यक ती मदत मिळेल. पुरूषांना
पत्नीसाठी दवाखान्यात जावे लागेल. खरेदीची कामे उत्तम प्रकारे पार पाडाल
घरातील बाप्पासाठीचे मखरेचे काम कलात्मक पद्धतीने करून
घरच्यांकडून शाबासकी मिळवाल. आईवडिलांच्या समाधानासाठी स्वत:च्या
मनावर संयम राखण्यात यशस्वी व्हाल.
कर्क :–व्यवसायातील गुंतवणूक भरपूर लाभ करून देईल. इतरांच्या
सल्ल्याचा विचार करताना स्वानुभवालाही किंमत देऊनच विचार करा. नव्या
जागेच्या भानगडीत पडू नका. कपड्यांच्या घरगुती उद्योगातून चांगला
लाभ होईल. शाळकरी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मनाने न झेपणार्या गोष्टींची
जबाबदारी घेऊ नये. लहान मुलांना अन्न पचनाबाबतचा त्रास उद्भवेल.
वयस्कर मंडळीना आपले कानाचे दुखणे कमी झाल्याचे जाणवेल.
सिंह :–बांधकाम क्षेत्रात काम करणार्यांना नवीन कामाची कान्ट्रँक्टस
मिळतील. आईच्या आशिर्वादाने जमिनीचे व शेतीबाबतच्या व्यवहारांची
चर्चा सुरू होईल. ओळखीशिवाय जागांबाबतचा कोणताही व्यवहार करू नका.
बाप्पाच्या कृपेने विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या क्षेत्रात प्रवेश मिळण्याचे
मार्ग सोपे होतील. महिलांना हा सप्ताह अतिशय धावपळीचा पण लाभदायक
जाणार आहे. नोकरीतील प्रमोशनच्या विषयाबाबत आता विचारायला हरकत
नाही.
कन्या :–आईवडिलांना मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत बारकाईने लक्ष घालावे
लागेल. सरकारी क्षेत्रातील मंडळीना या सप्ताहात वेगवेगळ्या पातळीवर
काम करावे लागेल. तसेच जराही कामात हलगर्जीपणा करता येणार नाही.
मानसिक बळाच्या जोरावर व्यवसाय वाढवण्याचा विचार कराल व प्रसंगी
धाडसी पाऊलही उचलाल. लहान भावंडांच्या बाबतीत महत्वाची जबाबदारी
घ्यावी लागेल.बाप्पाच्या प्रसादाच्या निमित्ताने कुटुंबात तीन पिढ्या एकत्र
येतील.
तूळ :–नोकरी, व्यवसाय दोन्ही करणार्यांना या सप्ताहात तारेवरची कसरत
करावी लागणार आहे. गुंतवणूकीच्या बाबत मात्र सखोल विचार करूनच
व्यवहार करा. बाप्पाच्या कृपेने तुमच्या आरोग्याबाबत तुम्हाला चांगलाच
दिलासा मिळेल. महिलांना आपल्या व्यवसायातील फायद्याची गुपिते
कळतील. अध्यात्मिक उपासकांनी इतर कोणाच्या नादाने आपले विचार व
आपल्या अभ्यासात बदल करू नये.
वृश्र्चिक :–13 तारखेच्या गौरीपूजना पासून तुमचे कौटुंबिक प्रश्र्न कांही
प्रमाणात सुटू लागतील. जागेचा किंवा नवीन घराचा पूर्वनियोजित व्यवहार
सध्यातरी पुढे ढकलणे हिताचे ठरेल. 15 व 16 तारखेला कोणताही आर्थिक
व्यवहार करू नका. बाप्पाच्या कृपाप्रसादाने कुटुंबातील वातावरण आनंदी
ठेवण्यात तुम्हाला भरघोस यश येईल. प्रवासासाठी जाणार असाल तर मात्र
निदान 15 व 16 तारखेचा बेत रद्ध करा. मनातील विचार इतरांसमोर व्यक्त
करू नका.
धनु :–श्री गुरूमाऊलीच्या कृपेने दवाखान्यात असलेल्यांची लवकर सुटका
होऊन घरी येता येणार आहे. न्यायालयातील कामांच्या बोजामुळे मानसिक
दडपण येणार आहे. किरकोळ वस्तूंच्या विक्रेत्यांना हा सप्ताह चांगला
लाभदायक राहील. लहान मुलांच्या आरोग्याकडे बारकाईने लक्ष द्यावे लागेल.
वयस्कर तसेच जास्त वजन असलेल्यांना पाय घसरून पडण्याचा धोका आहे
तरी फरशीवरून, ओल्या जागेवरून चालताना काळजीपूर्वक चालावे.
मकर :– मित्रमंडळींच्या मदतीने व बाप्पाच्या कृपेने तुमच्या हातातील
कामाचा एक मोठा टप्पा पार पाडाल व कामाबाबतचे मानसिक प्रेशर कमी
होईल. जास्त वजन असलेल्यांनी आता खरोखरच व्यायामाचा किंवा जीम
जाँईन करण्याचा विचार करावा. महिलांना या सप्ताहात मायग्रेनचा व
डोकेदुखीचा चांगलाच त्रास होणार आहे तरी योग्य ती काळजी घ्यावी.
वडिलांच्या कामात तुम्हाला मदत करावी लागणार आहे. नोकरीच्या शोधात
असलेल्यांनी नाराज न होता शोध सुरू ठेवावा. व्यावहारिक दृष्टीने विचार
केल्यास आलेल्या संकटावर सहजपणे मात करू शकाल.
कुंभ :–कुटुंबातील प्रत्येकासाठी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल.
मौल्यवान खरेदी करताना वस्तूचा खरेपणा तपासून पहा कोणत्याही प्रकारची
घाई करू नका.बाप्पाच्या आशिर्वादाने तुमच्या स्वत:च्या उद्योगात लाभाचे
प्रमाण वाढेल व गिर्हाईक तुमच्या प्रामाणिकपणावर खूष होतील. महिलांना
अचानक मानसिक ताण जाणवेल व हूरहूर लागेल. परदेशी किंवा लांब
असलेल्यांची चौकशी करा.
मीन :–राहत्या घराच्या दुरूस्तीचे काम निघेल पण ते करून घेण्यामधे
चोखंदळ रहावे लागेल. सरकारी कामांमधील तुमची दिरंगाई झाल्याने दंड
भरावा लागेल. विवाहाच्या बाबतीतील कोणतीही बोलणी या सप्ताहात पूढे
सरकणार नाहीत तरी त्यासाठी प्रयत्न करू नका. कुटुंबातील प्रत्येकाबरोबर
तुमचे विचार जुळतील व बाप्पा दूरावा झालेल्या मधे समेटघडवून आणेल.
स्वाभिमानाच्या नावाखाली अहंपणा येऊ देऊ नका. आईवडिलांसाठी लहानसा
प्रवास करावा लागेल.
||शुभं-भवतु ||