daily horoscope

शुक्रवार 10 सप्टेंबर व शनिवार 11 सप्टेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

शुक्रवार 10 सप्टेंबर व शनिवार 11 सप्टेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

शुक्रवार 10 सप्टेंबर चंद्ररास तूळ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र चित्रा 12:57 पर्यंत व
नंतर स्वाती.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश

शनिवार 11 सप्टेंबर चंद्ररास तूळ 28:12 पर्यंत व नंतर वृश्चिक, चंद्रनक्षत्र
स्वाती 11:22 पर्यंत व नंतर विशाखा.
वरील दोन्ही दिवसांच्या राशी नक्षत्रांचा विचार करून व पहाटेच्या 05:30
च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
शुक्रवार :–श्री गणेश चतुर्थी, पार्थिव गणपती पूजनाचा दिवस. चतुर्थी तिथी
रात्री 09:58 असली तरी चित्रा नक्षत्र12:57 पर्यंतच असल्याने श्री गणेश
पूजन दुपारी 12:57 पर्यंतच करावयाचे आहे.
शनिवार :–ऋषिपंचमीचा दिवस. ( महिलांचा उपवासाचा दिवस )

मेष :– तुमची आवडती वस्तू समोर दिसत असूनही तिचा लाभ घेता येणार
नाही. व्यवसायाबाबत आज नव्याने घेतलेला निर्णयात बाप्पाचा आशिर्वाद
मिळेल.

वृषभ :–विद्यार्थ्यांना अवघड वाटणार्‍या विषयासाठी मार्गदर्शनाची गरज
भासेल. महिलांना आपल्या नातवंडांबरोबर आजचा दिवस अगदी आनंदात
घालवता येणार आहे. नोकरीतील अडचणी बाप्पाच्या कृपेने सुसह्य होतील.

मिथुन :–वयस्कर मंडळी नवीन विचारसरणी पटल्याचे मुलांजवळ कबूल
करतील. प्रवासात अती सावधपणे वागावे लागेल. वैवाहिक जीवनातील
अडचणींवर मात करण्याचा मार्ग सापडेल. मुलांना आईवडिलांकडून प्रेम
मिळेल.

कर्क :–कुटुंबातील वरीष्ठांना अजिबात नाराज करू नका. तरूणांना आज काम
करताना अतिशय उत्साह वाटेल. मित्रांबरोबरची चर्चा मनाला आनंद देईल
तरी त्यांना टाळू नका. बाप्पाच्या आशिर्वादाने नवीन धाडस कराल.

सिंह :–लहान बहिणीबरोबर संवाद साधल्यास तुमच्या अपेक्षांना वेगळीच
दिशा मिळेल. महिलांना अध्यात्मिक क्षेत्राविषयी कुतूहल निर्माण होईल.
लहानशा प्रवास घडेल.

कन्या :–महिलांना आज घरातील कामाचा ताण खूपच जाणवेल.
कोणत्याही वायफळ गोष्टीत अडकू नका. लहान मुलांसाठी अचानक खर्चाची
बाब निघेल. आरोग्यातील सुधारणेसाठी बाप्पाला शरण जा.

तूळ :–वैवाहिक जोडिदाराला समजून घ्यावे लागेल नाहीतर विनाकारण वाद
निर्माण होतील. महिलांना नोकरीतील वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य

मिळेल. बाप्पाच्या कृपाप्रसादाने मनातील इच्छा पूर्ण करण्याचे मार्ग
सापडतील.

वृश्र्चिक :– कालच्यापेक्षा आजचा दिवस समाधानात व आनंदात जाणार
आहे. कुटुंबासाठी आज होणारी दगदग सुद्धा आनंददायी वाटेल.
न्यायालयातील कामाविषयी मयोग्य माहिती मिळेल.

धनु :– लहान मुले जेवताना त्यांच्याकडे लक्ष द्यावे लागेल जोराचा ठसका
लागेल. सरकारी क्षेत्रातील मंडळीना त्यांच्या हातातील कामात अडथळे
आल्याचे लक्षात येईल. मित्रमंडळींच्या सहकार्याने मानसिक बळ मिळेल.
बाप्पाची उपासना आवश्यक आहे.

मकर :–महत्वाच्या कामासाठी कुटुंबासमवेत चर्चा करूनच निर्णय घ्या.
कोणत्याही कामात आज केलेल्या घाई मुळे आर्थिक नुकसान होणार आहे.
व्यवसायासाठी अचानक तज्ञांचे मार्गदर्शन मिळेल व बाप्पा प्रसन्न होईल.

कुंभ :–माहिती नसलेल्या गोष्टीबाबत तुम्ही तुमचा अभिप्राय देऊ नका.
महिलांकरीता एखादा मौल्यवान दागिना खरेदी केला जाईल. पूर्वजांनी
घालून दिलेल्या रितीरिवाजाप्रमाणे बाप्पाची उपासना व सेवा केल्यास बर्याच
अडचणी दूर होतील.

मीन :–आज घरच्या माणसांच्या मदतीचे महत्व कळेल. कुटुंबातील
वरिष्ठांसाठी महागड्या वस्तूची खरेदी कराल. अचानक प्रवासाचा योग येईल.
नोकरीताल अडचणींवर बाप्पाच्या कृपेने सहजपणे मार्ग सापडेल.

| शुभं-भवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *