Read in
08 सप्टेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य
बुधवार 08 सप्टेंबर चंद्ररास कन्या दिवसरात्र व चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी 15:55:पर्यंत व नंतर हस्त.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
08 सप्टेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–बोलताना विचार करूनच बोला. मनात नसतानाही तुमच्याकडून कडक बोलले जाणार आहे. सरकारी काम करण्यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी एकदम उत्तम आहे.
वृषभ :–वयस्कर, ज्येष्ठांच्या मदतीने तुमच्या मनात कोंडी करून राहीलेले प्रश्र्न सुटतील. गुरूस्थानी असलेल्या अधिकारी व्यक्तींकडून मोलाचे मार्ग दर्शन मिळेल.
मिथुन :–सहज सुरू असलेल्या बोलाचाली अचानक वाद निर्माण करणार्या ठरतील तरी आज तुम्हाला अतिशय सावध रहावे लागेल. विरोधकांच्या विरोधाला फारसे महत्व देऊ नका.
कर्क :–प्रथम महत्वाचे आज अजिबात नवीन कोणतेही बेत ठरवू नका. कुटुंबातील नात्याची प्रत्येक कामात मदत मिळेल. भावंडांबरोबर म्हणावा तितका रेपो जमणार नाही.
सिंह :–नोकरीतील तुमच्यावर सोपवलेल्या महत्वाच्या कामातील प्रगतीवरवरीष्ठ खूष होतील. घरगुती व्यवसायात केलेला नव्याने विचार हितावह ठरेल.
कन्या :–मनाचा खंबीरपणा आज अचानक वाढल्याचे जाणवेल. अविचाराने टाकलेले पाऊल कामातील यशासाठी अडचणी निर्माण करेल. व्यवसायातील चर्चा आज करू नका.
तूळ :–मनातील महत्वाचा विषय कोणाबरोबरही शेअर करू नका. सरकारी नियमांपुढे तुमचे कांहीच चालणार नाही. ओढून ताणून कोणतेच काम करू नका.
वृश्र्चिक :– आज मौन पाळले तर मानसिक त्रास कमी होईल. संध्याकाळच्या भेटीगाठी फारशा फलद्रूप होणार नाहीत. कुटुंबात इतर नातेवाईकांच्या विषयावरून वाद निर्माण होतील.
धनु :–व्यवसायाच्या क्षेत्रातील तुमच्या मनातील योजनांचा आज नक्कीच विचार करा. महिलांच्या मदतीने अवघड कामे सोपी कराल. तरी आज कामाचा गुंता सोडवायचा प्रयत्न करा.
मकर :– आजची सकाळ फारशी आनंददायी राहणार नाही. पण दुपारनंतर मात्र हे चित्र पालटणार आहे. अचानक तरूणांच्या विवाहाबाबतची घडामोडी घडतील.
कुंभ :–अध्यात्मिक उपासकांना श्री गुरूमाऊलीकडून उपदेश मिळेल व सूचक स्वप्नांचा अर्थ लावावा लागेल. बेफिकीर राहू नका. तुमच्या सहवासाने इतरांचा उत्साह वाढवाल.
मीन :–नोकरीतील अडकलेली सरकारी कामे तुमच्या पुढाकाराने केल्यास नक्कीच त्यात प्रगती होईल. कुटुंबात मुलांसाठी नवीन खरेदी करून मुलांना गोड आश्चर्याचा धक्का द्याल.
| शुभं-भवतु ||