daily horoscope

सोमवार 06 सप्टेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

सोमवार 06.सप्टेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

सोमवार 06.सप्टेंबर चंद्ररास सिंह दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मघा 17:51 पर्यंत
व नंतर पूर्वा फाल्गुनी.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश

वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या
पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
देत आहे.
शेवटचा श्रावणी सोमवार शिवपूजन, शिवामूठ सातू.
पिठोरी अमावास्या, मातृदिन, व वृषभ पूजन.
आज सोमवती अमावास्या 07:38 ते 30:31 पर्यंत.
मेष :– आज मातृदिन व आज खरोखरच तुमचा चंद्र पंचमात. आजचा दिवस
तुम्हाला फक्त आपली मुले याशिवाय कांहीही दिसणार नाही. मुलांच्या
आनंदासाठी खूप कष्ट कराल.

वृषभ :–आईची भेट होईल किंवा आईकडे जाणे होईल व तिच्या सरबराईत
कांहीही कमी पडू देणार नाही. अत्यंत आनंदाचा समाधानाचा दिवस.

मिथुन :–शेजार्यांबरोबर गोडाधोडाचे सहभोजन कराल.सुंदर हस्ताक्षराच्या
मुलांच्या अक्षराचे कौतुक होईल. कँलिग्रँफीच्या शिक्षकांना मुलांच्या प्रगतीचा
आनंद मिळेल.

कर्क :–आजूबाजूला नकारात्मक गोष्टी घडूनही तुम्ही आज सकारात्मकतेने
वागाल. जोडीदाराकडून महिलांना आवडती वस्तू मिळेल.

सिंह :– इतरांच्या भल्यासाठी हाती घेतलेल्या कार्यात आज तुम्हाला बरीच
दगदग होणार आहे. स्वत:पेक्षा दुसर्यांच्या आनंदाला महत्व देऊन काम
कराल.

कन्या :–राजकीय क्षेत्रातील मंडळीनी आपण करत असलेल्या कार्याबद्दल
बढाईच्या गोष्टी करू नयेत आज तुम्हाला खच्ची करणारे, मानहानी करणारे
प्रसंग सोसायचे आहेत.

तूळ :–नोकरीत सहकारी वर्गाकडून अतिशय चांगली मदत होईल.
पतीपत्नीच्या एकविचाराने व्यवसायातील नवीन घडामोडी करण्याचा बेत
कराल.

वृश्र्चिक :–महिलांना विशेषत: सासरच्या मंडळींकडून धनलाभ होईल किंवा
आवडती वस्तू मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या अधिकारातील बाबींवर
जास्त लक्ष द्यावे लागेल.

धनु :–आज तुम्हाला तुमचा आवडता उद्योग मिळणार आहे “ इतरांना
उपदेश देण्याचा ”. मित्रांच्या संगतीत आजचा दिवस अतीव आनंदाचा
जाईल.

मकर :– स्त्रीयांना आपल्या जवळ असलेल्या स्त्री धनाविषयी अभिमान
वाटेल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या सल्याने घेतलेला निर्णय लाभदायक
झाल्याचे जाणवेल.

कुंभ :–विद्यार्थ्यानी आपला अर्धवट सोडलेला अभ्यास पुन: नव्याने सुरू
करण्याचा आजचा दिवस आहे. नोकरीतील राहिलेला पगार वा येणे मिळणार
असल्याचे सांगितले जाईल.

मीन :–वयस्कर मंडळीना पचनसंस्थेची तक्रार निर्माण होईल. भागिदाराच्या
बाबतीत कोणताही अंदाज मनात धरू नका तुमची फसगत होईल. तुम्ही न
मागता आज कांही गोष्टी पाँझिटीव्ह घडणार आहेत.

| शुभं-भवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *